दाभाडे सरकार घराण्याचा ईतिहास :

दाभाडे सरकार घराण्याचा ईतिहास :

 



दाभाडे सरकार घराण्याचा ईतिहास :

महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे. मराठी अंमलात या घराण्यातील पुरूषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळविली. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी दाभाडे पुण्याजवळील तळेगावचे पाटील. यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांचा हुजऱ्या म्हणून काम करीत होते. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी त्यांना रायगडावर ठेवले. पुढे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर ते राजाराम महाराजांसोबत जिंजीस गेले. त्यांच्या सोबत त्याची दोन मुले खंडोजी आणि शिवाजी हे होते. पैकी खंडोजी हे पुढे सेनापती म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांची जिंजी येथील एकनिष्ठ सेवा लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी त्यांना दाभाडे गाव इनाम दिले. जिंजीहून परत येताना राजाराम महाराजांचा कबिला ह्यांनी महत्प्रयत्नाने पन्हाळ्यास पोहोचविला. या कामगिरीबद्दल राजाराम महाराजांनी त्यांना ‘सेनाखासखेल’ ही पदवी आणि काही गावे इनाम दिली.
१७१६ मध्ये शाहूंनी खंडेरावांस सेनापतीपद देऊन चाकण आणि पारनेर येथे दोन मोठ्या जहागिऱ्या दिल्या. खंडेरावांनी बाळाजी विश्वनाथांना सहाय्य केले. उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर नजर ठेवावयास त्यांस नेमले होते.
खंडेरावांच्या मृत्युनंतर शाहूंनी त्रिंबकरावांस सेनापतीपद दिले. परंतु बाजीरावांच्या काळात (त्रिंबकराव) दाभाडे हे नेमून दिलेल्या कामगिरीपासून थोडे निराळेपणाने वागू लागले. त्यांचे आणि बाजीरावांचे फारसे सूत जमले नाही. त्रिंबकरावांचा निजामास जाऊन मिळण्याचा विचार होता. तेव्हा बाजीरावास त्रिंबकरावांशी लढाई करणे भाग पडले त्यात त्रिंबकराव मारले गेले. ही डभईची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.
त्रिंबकरावांच्या मृत्युनंतर उमाबाई दाभाडेंना फार दु:ख झाले तेव्हा शाहू महाराज १७३१ मध्ये बाजीरावांसह उमाबाईंना भेटण्यासाठी तळेगावास गेले आणि उमाबाईची समजूत काढून त्रिंबकरावांचा भाऊ यशवंतराव यास त्यांनी सेनापतिपदाची वस्त्रे दिली. तसेच पिलाजी गायकवाडास दाभाड्यांचा कारभारी म्हणून नेमण्यात आले.
उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदेत ठेवली. परंतु उमाबाईने पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.
यशवंतरावाचे लग्न १२ मे १७५२ या दिवशी शितोळे देशमुखांच्या मुलीशी झाले. त्या वेळी दाभाड्यांचे आणि पेशव्यांचे सलोख्याचे संबंध दिसून आले. नोव्हेंबर १७५३ मध्ये उमाबाई कालवश झाल्या आणि पुढे १७५४ मध्ये यशवंतराव मरण पावले. यशवंतराव हे व्यसनाधीन असल्यामुळे गायकवाडास राज्यकारभारात पुढे येण्यास वाव मिळाला. यशवंतरावांचा मुलगा दुसरा त्रिंबकराव यांस सेनापतिपद देण्यात आले. परंतु आता या पदाचे फारसे महत्त्व उरले नव्हते. १७६६ मध्ये वेरूळ मुक्कामी त्रिंबकराव मरण पावले.
दाभाड्यांचा आणि पेशव्यांचा मुख्य झगडा होता तो गुजरात प्रांताच्या मोकाशासंबंधी. गुजरातेत सेनापती दाभाड्यांची स्थापना झाली, तेव्हा शाहूंनी गुजरात प्रांताची निम्मी मोकासबाब चिमणाजी बल्लाळ यांजकडे व निम्मी त्रिंबकराव दाभाडे यांच्याकडे पाठवावी, असा ठराव करून दिला. परंतु पुढे सेनापतीनी तो पाळला नाही. गुजरातवरील निम्मा हक्क पेशव्यांनी कधीही सोडला नाही. त्यामुळे वाद निर्माण होऊन त्यात दाभाड्यांना अपयश आले. त्रिंबकराव दाभाड्यांनंतर फारसा कर्तबगार पुरूषही त्या घराण्यात निपजला नाही. अशा तऱ्हेने दुसऱ्या त्रिंबकरावाच्या मृत्युनंतर हे घराणे पेशवाईत अथवा मराठ्यांच्या इतिहासात पुन्हा उर्जितावस्थेस आले नाही.
मध्यंतरी चंद्रसेनानें खंडेरावांस ताराबाईंकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता.
पुढें १७१७ त खंडेरावांस सेनापतीचे पद शाहुछत्रपतीने दिले, ते पुढे त्याच्या कुटुंबांत कायम झालें.
याच वेळीं दिल्लीच्या बादशहाने दख्खनचा सुभेदार हुसेनअल्ली याच्याविरुद्ध उठण्यास शाहूमहाराजांस कळविलें असतां,
त्यांनी ते काम खंडेरावावर सोंपविले. त्यांनी खानदेश गुजरातवर स्वार्या करून हुसेनचा रस्ता अडविला, तेव्हा त्याने झुल्फिकारबेग यास त्यांच्यावर पाठविले. खंडेरावांनी त्याची सारी फौज (झुल्फिकारसुद्धां) अडचणीत गाठून कापून काढली. तेव्हा हुसेनने आपले दिवाण मोहकमसिंग व चंद्रसेन जाधव यांना रवाना केले. त्यांची लढाई नगरजवळ झाली व पुढें खंडेरावांनी निंबाळकर व सोमवंशी यांच्या मदतीने मोंगलांचा पुरता मोड केला.
यापुढे खंडेरावांनी गुजरात काठेवाडकडे मराठी अंमल बसवावा असा हुकूम छत्रपतींनी त्यांना केला व श्रावणमासची दक्षिणा आणि कोटिलिंगार्चन विधी सेनापतीने करावा असे ठरविले (१७१७) पुढे सय्यद बंधूंच्या मदतीस जी मंडळी दिल्लीस गेली त्यात खंडेराव हे सेनापती म्हणून गेले होते (१७१९).
दिल्लीहून परत आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांनी जी सरंजामी पद्धत निर्माण केली,
त्यात खंडेरावांना खानदेश देऊन गुजरात काबीज केल्यास तीही जहागीर देऊन टाकू म्हणून त्याला आश्वासन दिलें.
सय्यदांचा हस्तक अलमअल्ली व निजाम यांच्यांत (१७२०) बाळापूरची जी लढाई झाली, त्यात सय्यदांच्या विनंतीवरून खंडेरावांना लढण्यासाठी म्हणून छत्रपतींनी पाठविले होते. यानंतर फत्तेसिंग भोसल्यांच्या अधिपत्याखाली कर्नाटकांत (१७२५-२६) झालेल्या स्वारींत खंडेराव हे हजर होते.
बाळाजी विश्वनाथ व खंडेराव यांचे एकमत असे. त्यामुळें बाळाजीपंतांनीं ठरविलेल्या राज्यव्यवस्थेस अमलांत आणण्याचे लष्करी काम खंडेराव करीत. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर राहून ते खानदेश, वर्हाड व गुजरात
या तिन्ही प्रांतावर नजर ठेवीत. यानंतर ते वृद्ध झाल्यामुळे त्यांचा मुलगा त्रिंबकराव हे मोहिमेवर निघू लागले.
खंडेरावांनी वसई ते सुरतपर्यंतचे कोंकण काबीज केलें होतें. त्यांच्याबद्दल `बडे सरदार, मातबर, कामकरी हुषार होते’
असा उल्लेख आहे (शाहु म. बखर). शाहूछत्रपतींची मर्जी त्यांच्यावर पुष्कळ होती.
ते एकदा पोटशुळाने आजारी पडले असता महाराजांनी त्यांची विचारपुस केली होती.
थोरले बाजीराव यांच्या वेळी खंडेराव वृद्ध झाल्याने व खुद्द श्रीमंतांनी सेनानायकाचे काम हाती घेतल्याने त्यांची विशेष अशी माहीती आढळत नाही.
मात्र त्याबद्दल शाहुमहाराजांनीं त्याला समजुतीचीं पत्रें अनेकदां पाठविलीं होतीं.
अखेर १७२९ त खंडेराव मूतखड्याच्या विकाराने मरण पावले.
इतिहासप्रसिद्ध उमाबाई दाभाडे ही याची बायको होय.
याला त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव असे तीन पुत्र होते.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...