७ मार्च १६४७इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ मार्च १६४७
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ मार्च १६४७
शहाजीराजे यांचे सेवक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ मार्च १६६५
सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करीत बसला होता. त्याने छत्रपती छत्रपती शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंतसिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ मार्च १६८०
आजच्या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ मार्च १७६०
मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास 
काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी, पेशव्यांनी (नानासाहेबांनी), एक मोहीम आखली, आणि या मोहिमेच नेतृत्व शूरवीर व राजनीतीधुरंधर श्रीमान सदाशिवरावभाऊ यांना दिलं. दि. ७ मार्च १७६० ला, सदाशिवरावभाऊ ४८ हजार फौझेसह, फ्रेंच्याच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या संरक्षणासाठी निघाले. मार्गात सैन्य जमा होत होतं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...