श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम म्हणजे जालन्याची स्वारी
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम म्हणजे जालन्याची स्वारी. या स्वारीत जालना शहर चार दिवस मराठ्यांनी लुटले आणि प्रचंड संपत्ती मिळवली. ही लूट घेऊन परत जात असताना मुघल सरदार रणमस्तखान याने मराठ्यांच्या पिछाडीवर हल्ला केला. धावपळीत बरीच लूट शत्रूच्या हाती पडली. चार हजार घोडेस्वार धारातीर्थी पडले. हंबीरराव सेनापतीही जखमी झाले. सिधोजी निंबाळकर धारातीर्थी पडले. यावेळी लढाई करताना उतावळीपणा केला म्हणून संताजी घोरपडे व मानाजी मोरे यांना शिवाजी महाराजांनी मुजरा करण्यासाठी येऊ दिले नाही.
मुजर्याला येण्यापासून रोखणे ते त्यांना #ममलकतमदार या पदवीपर्यंतचा संताजी घोरपडे यांचा प्रवास हा अविस्मरणीय आहे,
ही गोष्ट साधी सरळ नव्हती पराक्रम ,एकनिष्ठा , गनीमी कावा ,छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज , पिता म्हाळोजी बाबा घोरपडे यांचे विचार त्यांनी दिलेली शिकवण, सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवली आणि करून दाखवल,
ममलकतमदार म्हणजे ( राज्याचा आधार )
लेखक - रवि शिवाजी मोरे यांच्या अभ्यासपूर्ण लेखनातून साकारलेली कादंबरी ( पुस्तक ) ममलकतमदार संताजी घोरपडे नक्की वाचा,, 🙏🚩❣️
#ममलकतमदार #सरसेनापती #संताजीराव
@sarsenapati_santaji_ghorpade
Comments
Post a Comment