४ मार्च १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय "हैदराबाद" शहरातील "गोवळकोंडा" किल्ल्याजवळ दाखल.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
४ मार्च १६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवराय "हैदराबाद" शहरातील "गोवळकोंडा" किल्ल्याजवळ दाखल.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
४ मार्च १६८०
राजपुतांचे बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपली तीन मुलं शहाआलम, आझमशाह आणि अकबर ह्यांना पाठविले.
४ मार्च १६८० रोजी अकबराला चितोडची बाजू सांभाळण्यासाठी पाठविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अकबराचा सारखा पराभवाचं होत होता. अकबराने राजपुतांविरोधात लढण्यात पाच महिने असेच फुकट घालविले. राजपुतांपुढे आता काही आपला निभाव लागत नाही असे पाहून अकबराने आपल्या बापास औरंगजेबास हे युद्ध बंद करण्याची विनंती केली. ह्या विनंतीने औरंगजेब भयंकर चिडला. आणि त्याने रागाने अकबराची चांगलीच कानउघडणी केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
४ मार्च १७०६
छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करून दिलं. सेनापती धनाजींनी रतनपुरच्या लढाईत मोगलांचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
४ मार्च १७३९
मराठ्यांनी कारंजा (उरण) बेट जिंकले
मानाजी आंग्रे ४ मार्च १७३९ रोजी आपल्या आरमारातील ४० गलबतां मधून २००० हजार शिबंदी सह फिरंगी प्रतिकार मोडून काढत कारंजा बेटावर उतरले. बेटावर अदीच आपले माणसे पेरून मराठ्यांनी जवळ जवळ ७००-८०० स्थानिक आंग्र्यांना आपल्या बाजूस वळवले होते.
हा सर्व प्रकार पाहून पोर्तुगीज कप्तान जोसे लुई द सिल्वा ह्याच्या पाचावरच धारण बसली. बघता बघता पूर्ण कारंजा बेट ताब्यात घेत लगेच दुसऱ्या दिवशी मराठे द्रोणागिरी गडास बिलगले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
४ मार्च १८१८
इंग्रजांनी विसापूर जिंकला
जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment