११ एप्रिल १६७४राज्यभिषेकापुर्वी ३ एप्रिलला छत्रपती शिवरायांनी कोकणातील लष्करी अधिकार्यांना पत्र पाठवले व ११ एप्रिलला चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ एप्रिल १६७४
राज्यभिषेकापुर्वी ३ एप्रिलला छत्रपती शिवरायांनी कोकणातील लष्करी अधिकार्यांना पत्र पाठवले व ११ एप्रिलला चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ एप्रिल १६८०
राजापूरकर इंग्रजांनी सुरतला पाठवलेल्या पत्रात म्हणतात. "छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले, त्यांच्या मरणामुळे या भागात पुष्कळ घोटाळा माजेल असे दिसते."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ एप्रिल १७०३
सिंहगडचा रणसंग्राम
मराठ्यांकडून बाळाजी विश्वनाथ व मोगलांकडून तोफखाण्याचा प्रमुख तरबीयतखान व त्याचा भाऊ कमियाबखान ह्यांच्या नेतृत्वात सिंहगड हस्तांतरणाची चर्चा झाली. १३ एप्रिल रोजी मोगलांनी ५० हजार रुपयेच्या बदल्यात सिंहगड किल्ला ताब्यात घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ एप्रिल १७३८
वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ एप्रिल १८२७
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिली शिवजंयती
साजरी करणाऱ्या... क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची आज जयंती
अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या !
ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे.
महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले.
जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीरशिक्षणही घेतले.
लहूजीबुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पुरे केल्यावर १८४० मध्ये जोतीरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून ५ किमी.वर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला.
सावित्रीबाईचे शिक्षण जोतीरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने जोतीरावांच्या समाजसुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या. शालेय शिक्षण चालू असताना जोतीरावांनी अनेक मित्र मिळविले.
सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले. जगाचा, पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment