२६ एप्रिल १६७५दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी "कारवार"वर स्वारी केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ एप्रिल १६७५
दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी "कारवार"वर स्वारी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ एप्रिल १६८४
छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी
केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले. त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणाऱ्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.
छत्रपती संभाजी राजांचे केग्विनला पत्र :- "वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्याता पाठवली. तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच. तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे. आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.... कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे. तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत. तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो. अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते,
"वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
मुंबईसाठी दिलेल्या कलमामध्ये एक कलम असे होते की, :- "माझे आणि मुघलांची गलबते समुद्रात वावरतात तरी मुघलांचे एखादे जहाज माझ्या लोकांनी धरले आणि त्यात जर इंग्रजांचा माल असला व त्याच्यावर त्यांच्या खुणा वगैरे असल्यास आणि त्या पटवून दिल्यास त्यांना त्यांचा माल परत मिळेल. इंग्रजांनी धरलेल्या जहाजात माझ्या प्रजेचा माल आढळल्यास तो त्यांनी परत करावा."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ एप्रिल १७४०
पेशवेबाजीरावांची अचानक तब्येत बिघडली. दिनांक ५ एप्रिल रोजी बाजीराव रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले. बातमी कळताच काशीबाई आपला नुकताच मुंज झालेला मुलगा जनार्दन याला बरोबर घेऊन रावेरखेडी निघाल्या. महादजीपंत पुरंदरेही त्यांच्याबरोबर होते.काशीबाई २६ एप्रिल रोजी रावेरखेडी पोहोचल्या. त्यादिवशी बाजीराव साहेब बेशुध्द अवस्थेत होते. काशीबाईंनी रामेश्वराच्या (रावेरखेडी येथील जे त्यांनी बांधायला लावले) मंदिरात ब्राह्मणांना मृत्युंजय जपासाठी बसण्यास सांगितले. पण त्याचा काही फरक पडला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ एप्रिल १७५१
छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी राजसबाइंचे निधन
राजाराम महाराजांना जानकीबाई, ताराबाई, राजसबाई व अहल्याबाई अशा चार भार्या होत्या. राजसबाई हि कागलकर घाटगे घराण्यातील असून छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर इ.स.१६८७ साली तिचा आपले धाकटे बंधू राजाराम यांजबरोबर विवाह लावून दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...