८ एप्रिल १६७८दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १६५७
२७ वर्षीय छत्रपती शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १६६६
छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १६६७
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा.
त्यातील मुख्य विषय असा की, ‘मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो, याचे मला वाईट वाटते. मी पूर्वीप्रमाणेच आपल्याशी नम्र आहे.‘
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.
सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १६७४
चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १६७५
छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंड्याला वेढा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १६७८
दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १६८३
मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १८१८
८ एप्रिल १८१८ चं एक कागदपत्र. मराठेशाही संपून सत्ता इंग्रजांच्या ताब्यात जाण्याचा हा कालावधी. राजकारण करताना समाजाची मानसिकता अचूक ओळखणे हे फार महत्त्वाचे असते आणि त्या वेळी इंग्रजांनी ती तशी ओळखली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १८५७
क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबरदस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते.
बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ एप्रिल १९२९
भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बाँब फेकले
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत केलेल्या बॉम्बस्फोटामुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला. या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला. अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४