७ एप्रिल १८१८दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्वच किल्ल्यांची तोडफोड केली, यात ७ एप्रिल रोजी देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ एप्रिल १६३३
फतेहखान देवगिरी किल्ल्यामधून मुघलांवर छुपे हल्ले करत होता. ७ एप्रिल १६३३ ला त्याने मुघलांवर छापा मारण्यासाठी त्याची टोळी धाडली. पण मुघलांनी त्यांना परतवून लावले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ एप्रिल १७३७
वसईच्या मोहिमे वेळी ७ एप्रिल १७३७ साली मराठ्यांचे सरदार शंकराजी केशव फडके हे चिमाजी अप्पांना लिहितात, "शहरात सिरते समयी आम्ही लोकास ताकीद केली की, रयेतीचे काडीस येकंदर हाथ न लावणे."
अशी असंख्य उदाहरण आपल्याला भेटतील की, कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते कसे घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता !

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ एप्रिल १८१७
त्रिंबकजी डेंगळेला इकडे पकडायला सैन्य पाठवावे तर भलतीकडेच त्रिंबकजीचे सैन्य छापा मारून जायचे. ह्यावर काय उपाय करावा हे इंग्रजांना अजिबात सुचत नव्हते. पण ते त्रिंबकजींना पकडायचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत असे रिपोर्ट्स मात्र ते वेळोवेळी कंपनीच्या डायरेक्टरांना कळवायचे. उदाहरणार्थ हा रिपोर्ट म्हणतो की त्रिंबकजी धारवाडकडे पळून गेलाय पण तरीही त्याच्या फौजा विजापूर - पंढरपूर भागात आहेत - त्याचबरोबर खान्देशात पण त्याच्या फौजा वाढतच चालल्या आहेत!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

७ एप्रिल १८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्वच किल्ल्यांची तोडफोड केली, यात ७ एप्रिल रोजी देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...