२ एप्रिल १७२०छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ एप्रिल १६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला
आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय? असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय ?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्‍या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
शेख हमदानीने लिहिलेल्या "जसीरात-ए-मुल्क" प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.
१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.
२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.
३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.
४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.
५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.
६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.
७) त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.
८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.
९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.
१०) अंगठी वापरू नये.
११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.
१२) त्यांनी जुना पोषाख बदलू नये.
१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.
१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.
१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये.
१६) त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.
१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.
यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्‍याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ एप्रिल १६७९
दिलेरखान व छत्रपती संभाजी राजांचा भूपालगडावर कब्जा. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ एप्रिल १७२०
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ एप्रिल १७५५
इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ एप्रिल १८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४