१२_एप्रिल_१६६३शिवरायांनी पुण्यातील लाल महालात केलेल्या शाहिस्तेखानावरील आकस्मिक हल्ल्यानंतर शिवाजीराजे पुन्हा गोवा मोहिमेसाठी रवाना...

🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_एप्रिल_१६६३
शिवरायांनी पुण्यातील लाल महालात केलेल्या शाहिस्तेखानावरील आकस्मिक हल्ल्यानंतर शिवाजीराजे पुन्हा गोवा मोहिमेसाठी रवाना...🏇
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_एप्रिल_१७०३
मुघल फौजांचा सिंहगडावर तोफांचा मारा सुरु.
औरंगजेब स्वतः जातीने सिंहगड जिंकून घेण्यास हजर.
महाराजांनंतर औरंगजेब दक्षिणेत स्वारीवर आला.
त्याने किल्ला घेतला;
पण १६९३ मध्ये नावजी बलकवडे या मराठ्यांच्या सरदाराने तानाजीप्रमाणेच पराकम करुन तो जिंकून
पुन्हा मराठ्यांच्या सत्तेखाली आणला.
त्यानंतर एखादा अपवाद वगळता तो प्रायः १७५०
पर्यंत सचिवांच्या ताब्यात होता.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_एप्रिल_१७३७
मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला.
पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला....
पोर्तुगिजांनी १५३६ ते १६०० पर्यंत हा डोंगर तासून दगडाचे अखंड चिरे काढले व त्याच चीऱ्यांनी
'वसईचा किल्ला', 'गोव्याचे चर्च' या वास्तु बांधल्या होत्या.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_एप्रिल_१७५२
१७५२ साल हे मराठ्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने
फार महत्वाचे होते.
१२ एप्रिल १७५२ रोजी सफदरजंगाने बादशहाच्या वतीने मराठी सरदारांशी करार (अहमदनामा) केला.
त्यानुसार इथल्या व परकीय आक्रमणांपासून मोगल बादशहाचे रक्षण करण्याची जबाबदारी पेश्व्यावर पडली.
१७५२ मध्ये अब्दालीने केलेल्या स्वारीमुळे तो करार
झाला होता त्या करारामुळे मराठे आता मोगल हिंदुस्थानाचे संरक्षक बनले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड
#सहयाद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र_राज्य
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता
#history_maharashtra hashtag वापरून
➖➖➖➖➖➖➖➖➖
@history_maharashtra
#ओळख_महाराष्ट्राची
#शिवरायांच्या_इतिहासाची
➖➖➖➖➖➖➖➖➖
सोशल मीडियाच्या इतिहासातील एक 
ऐतिहासिक पेज जे तुम्हाला ओळख
करून देईल महाराष्ट्राच्या अभूतपूर्व इतिहासाची इथल्या पराक्रमाची☝
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
गडकोट, संस्कृती, युद्धनीती,
शिव-शंभुछत्रपतींचा इतिहास, जाणून घ्या
आणि शेयर करा☝️
@history_maharashtra
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...