आज शिवरायांचा स्मृतिदिन* चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६०२ अर्थात ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या स्वराज्याला पोरकं करून अनंतात विलीन झाले
*आज शिवरायांचा स्मृतिदिन*
चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६०२ अर्थात ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या स्वराज्याला पोरकं करून अनंतात विलीन झाले. या दिवशी स्वराज्यातील हाडामासाच्या माणसांनी तर टाहो फोडला असेलच पण सह्याद्रीतील दगडधोंड्याला देखील अश्रूंचा पाझर फुटला असेल.
शिवछत्रपतींनी येणाऱ्या अवघ्या पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्जा दिली, स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, ताठ मानेने जगण्यासाठीचा स्वाभिमान जागृत केला. अशा या लोककल्याणकारी, रयतेचे-शेतकऱ्यांचे राजे, शककर्ते, स्वराज्य संस्थापक, क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏
*
Comments
Post a Comment