Posts

Showing posts from September, 2023

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास भाग 2#क्षत्रिय_मराठा_सातवाहन_राजवंश----------------------------------------------

Image
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास भाग 2 #क्षत्रिय_मराठा_सातवाहन_राजवंश ---------------------------------------------- सातवाहन हा महाराष्ट्रावर शासन करणारा पहिला ज्ञात क्षत्रिय मराठा राजवंश आहे. सातवाहनांचा शासन काळ हा इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 असा होता म्हणजे 450 वर्ष इतक्या प्रदीर्घकाळ सातवाहन राजवंशाने महाराष्ट्रावर एक छत्र शासन केले.  काही विद्वानांच्या मते सातवाहन शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो भगवान सूर्य देवाच्या रथाला सात घोडे असतात म्हणजे सात - वाहन म्हणून या वंशाला सातवाहन म्हटले गेले सातवाहन हे सूर्यवंशी होते. सातवाहनांची सत्ता आधी फक्त पुणे मावळ प्रांतात होती. ते मूळचे #आंद्रा_नदी किनारी वसलेल्या #अंदर_मावळचे होते. म्हणून त्यांना अंदर सातवाहन म्हटले गेले त्याचा अपभ्रंश नंतर अंदर सातवाहन चा आंध्र सातवाहन झाला. (आंध्रप्रदेश शी त्याचा काही संबंध नाही.)  सातवाहन पहिले मौर्य काळात मौर्य साम्राज्याचे सामंत होते. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जेव्हा कण्व वंशाला सुरुवात झाली तेव्हा सातवाहन कण्व राजांचे सामंत होते. नंतर कण्व वंशातील शेवटचा राजा सुसर्मन ला सिमुक सातवाहन यांनी हरवले व स

वढू बुद्रुक येथील शिक्षक संभाजी शिवले यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवताना शिवले परिवाराने छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख असणारा ब्रिटिश कालीन कागद सादर केला आहे.* या कागदावरील मजकूर असा..

Image
*वढू बुद्रुक येथील शिक्षक संभाजी शिवले यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवताना शिवले परिवाराने छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख असणारा ब्रिटिश कालीन कागद सादर केला आहे.* या कागदावरील मजकूर असा...  _श्री_  _सीमगच्यापोलीला नारो सिवले यांनी वारता आणली गोरया सरकारनी जमीनजुमल्याचे कागद इनामहुकूम करनेसाठी सरकारात जमा करण्याचे आदेस केला मनून नक्कल केला अवरंग पातसहा सिवाजी राजाचा पोरगा संबाजीराजा तेचा मैतर कबजीबावा तेचा कबिला जाळीत टाकून गावात आला. तेच हाल हाल करिता गुडी पाडव्याला जीव मारविले नागर गावातून बापूजी सिवलेने पदूबाई व बवानीबाईच्या जोडीने सीरका मनोन कड तोडल सिदे व गोतानी काडून दिले तुरकाचया वगलीला_ _संबाजीराजाचा सीर सापाडल ते उचलून गावाचया येसीवर येचनात दडाच तुकड दोतरात ववचल_ _कजालाच सरान चेतावल देहाला मूठमाती दिली अवरंग पातसहाला वारता गेली तेने गावात हायदोस केला मानस परागंदा जाली चिचवडचया गोसायाने जी व राकिले पानकळा गावात काडून अवरंग पातसहा गाव सोडून गेला गावची पार राक जाली गावाची पांढरी ओकीबोकी जाली_ _मोरोजी सिवले नी  (नांगराचे चित्र)_ _(डाव्या बाजू

*३० सप्टेंबर १६६५*औरंगजेबने पाठवलेले आग्रा भेटीचे फर्मान छत्रपती शिवरायांनी स्विकारले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० सप्टेंबर १६५९* स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार "अफझलखान" याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे "कान्होजी जेधे" त्यांचे सुपुत्र व छत्रपती शिवरायांचे बालमित्र "बाजी जेधे" यांना स्वराज्यविरोधी जाण्यासाठी पत्र पाठविले. पण "बाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरा करावयास हजर झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० सप्टेंबर १६६४* १६६४-६५ वर्षाच्या मध्यान्हात औरंगजेबाचा अनेक वर्षाचा स्वराज्यावरील क्रोध चालून आला. हा क्रोध, कधीकाळचे जयपुरचे राजे मिर्झाराजे जयसिंग ह्या सरदाराच्या रूपाने चालून आला. धूर्त राजकारणी, चाणाक्ष मुत्सद्दी, महापराक्रमी आणि बुद्धिने तल्लख असलेल्या मिर्झाराजांचे हे गुणविशेष मात्र परकियांच्या पुढे झुकत होते, आणि हेच शल्य इतिहासात त्यांच्यावर दिसते. अर्थात त्यांना यात कसलाही कमीपणा वाटत नसे. तर असे हे मिर्झाराजे दख्खन मोहिमेकरीता ३० सप्टेंबर १६६४ रोजी मुक्रर झाले. दिल्ली दरबारातील मोठ्या-मोठ्या सरदारांसह द

करवीर छत्रपती शिवाजीराजे ( दुसरे ) करवीर छत्रपती संभाजी राजे दुसरे यांच्या निधनानंतर (१७५९) खानवटकर भोसले घराण्यातून दत्तक.

Image
🚩 करवीर छत्रपती शिवाजीराजे (  दुसरे  ) करवीर छत्रपती संभाजी राजे दुसरे यांच्या निधनानंतर (१७५९) खानवटकर भोसले घराण्यातून दत्तक.  १७६२ ते १८१३ राज्य कालखंड ५१ वर्षे          म्रुत्यु २४ एप्रिल १८१३           शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे दुसरे पुत्र छत्रपतीं संभाजी राजे यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजीराजे दुसरे (खानवटकर भोसले )या घराण्यातून सन १७६२ मधे दत्तक आले. कोल्हापूरचे  छत्रपती घराणे सुरक्षित ठेवण्याची सर्व जबाबदारी छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी जिजाबाई यांच्यावरच पडली होती. आणि त्यांनी ती सुमारे बारा वर्ष मोठ्या  जिद्दीने पार पाडली, वस्तुतः  जिजाबाईंना राज्यकारभारात  त्यापूर्वीपासूनच लक्ष घालावे लागले होते. छत्रपतीं संभाजीराजे यांच्या मातोश्री राजसबाई यांनी संभाजीराजे गादीवर बसल्यानंतर काही दिवस कारभार केला होता. जिजाबाई या १७५१ साली निधन पावल्या. जिजाबाईं या संभाजीराजे यांना केवळ सल्लाच देत असत असे नव्हे तर सरदारांना आणि कारभाऱ्यांना प्रत्यक्ष आज्ञा ही देत असत.             संभाजीराजे यांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी जिजाबाईं यांच्यावर येऊन होती. त्यातच त्या

२७ सप्टेंबर १६६५*औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तहाचे फर्मान व शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान येऊन दाखल.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ सप्टेंबर १६६५* औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तहाचे फर्मान व शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान येऊन दाखल. मिर्झाराजांच्या हुकुमाने छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणातून येऊन मिर्झाच्या छावणीत दाखल. ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी सुरु. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ सप्टेंबर १७०७* शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले.  रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने प

#क्षत्रिय_मराठा_निकुंभ_राजवंश----------–----------------------------

Image
#क्षत्रिय_मराठा_निकुंभ_राजवंश ----------–---------------------------- राजा निकुंभ यांच्यापासून निकुंभ राजवंशाची सुरुवात झाली. राजा निकुंभ हे आयोध्याचे सूर्यवंशी राजा इक्ष्वाकु यांचे 13 वे वंशज होते. निकुंभ वंशी राजा #बाहुमान आणि मध्य भारतात नर्मदा नदी किनारी राज्य करत असलेल्या हैहैय वंशी राजा #तालजंग यांच्यात घनघोर युद्ध झाले या युद्धात राजा बाहुमान यांचा पराभव होऊन मृत्यू झाला. त्यानंतर राजा बाहुमान यांचे पुत्र राजा #सगर यांनी आपल्या पित्याच्या पराभवाचा बदला घेतला व राजा तालजंग यांचा पराभव केला. याचवेळी निकुंभ वंशी राजांचा राज्यविस्तार दक्षिण भारतामध्ये झाला. त्यानंतर भगवान श्रीराम यांचे छोटे बंधू राजा शत्रुघ्न यांचे द्वितीय पुत्र #सुबाहु यांना देखील दक्षिण भारताचे राज्य मिळाले. त्यानंतर राजा सुबाहु यांचे वंशज देखील निकुंभ वंशीय क्षत्रियांमध्ये मिसळले व एकाच वंशाचे असल्यामुळे राजा सुबाहु यांचे वंशज देखील स्वतःला निकुंभवंशीय म्हणू लागले. तर हा झाला निकुंभ वंशाचा अयोध्ये वरून दक्षिण भारतापर्यंतच्या राज्य विस्ताराचा पौराणिक इतिहास. ऐतिहासिक इतिहासाचा विचार केला तर निकुंभ राजवंशाचे राज्य

महाराजा सयाजीराव आणि पाली भाषा*

*महाराजा सयाजीराव आणि पाली भाषा* *- दिनेश पाटील, वारणानगर* Dinesh Patil  (९६२३८५८१०४)     पाली भाषा ही मगध राज्याची लोकभाषा होती. तिला मागधी असेही म्हणत.  ती इंडो-आर्यन भाषा गटात मोडते. ती मुळची भारतीय उपखंडातील भाषा आहे. बौद्ध धर्मशास्त्राची भाषा असल्यामुळे ती जगभर मोठ्या प्रमाणात अभ्यासली जाते. या भाषेबाबतचा सर्वात प्राचीन पुरातत्वीय पुरावा ब्रह्मदेशातील प्यु (Pyu) शहरात सापडलेल्या शिलालेखात आढळतो. व्युत्पत्तीशास्त्रानुसार पाली या शब्दाचा अर्थ *‘ओळ किंवा सर्वसामान्य तत्व’* असा होतो. ख्रिस्तपूर्व ७ व्या शतकात उत्तर भारतातील लोक दैनंदिन जीवनात पाली भाषेचा उपयोग करत. पुढे संपूर्ण भारतात पाली भाषा वापरली जाऊ लागली. सुमारे १ हजार वर्षे पाली ही साहित्याची भाषा म्हणून ओळखली जात होती. इंग्लंड देशापेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या मध्ययुगीन कोसला साम्राज्याची राजधानी सावत्थी येथील न्यायालयात पाली भाषा वापरली जात असे. कोसला साम्राज्यात जन्मलेल्या गौतम बुद्धांनी धार्मिक सुधारणा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पाली भाषेची निवड केली. आपल्या साम्राज्यात आधीपासूनच लोकांमध्ये रुजलेल्या पाली भाष

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२३ सप्टेंबर १६३३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ सप्टेंबर १६३३* मुरार जगदेव हे विजापूर दरबारचे सरदार, या दिवशी सूर्यग्रहण होते, हा योग साधून त्यांनी आपले सोन्यारुपाने तुलादान केले. हे तुलादान पुण्यापासून १० कोसावर भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमात वसलेला नांगरगावास झाले, तेथे संगमेश्वराचे मंदिर बांधले त्यामुळे या गावाचे नामकरण होऊन तुळापुर झाले. ३०० वर्षांपूर्वी यादवांचे राज्य बुडाल्यानंतर एवढा मोठा तुळादान विधी झाला नव्हता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ सप्टेंबर १६४३* अदिलशहाने पोर्तुगीजांना पत्र पाठवले, त्यांच्या चौल किल्ल्याच्या परिसरात याकुतशहा व फत्तेखान हे २ बंडखोर आणि ज्याला ते मलिक म्हणतात असा १ मुलगा अशा तिघांना आश्रय दिला आहे, त्यांना पोर्तुगीजांनी आपल्या मुलखातून हाकलून द्यावे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ सप्टेंबर १६७३* इ.स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार लुटली होती, तिची भरपाई मिळावी अशा मागणीचा अनेकवेळा अयशस्वी प्रयत्न इंग्रजांनी केला. हे प्रलंबित प्रकरण मिटवण्याकरिता छत्रपती शिवाजीराजांशी बोलणीकरिता इंग्रजांनी 'नारायण शेणवी' यास २३ सप

भक्ति म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम.एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरू लागतात.

२२ सप्टेंबर: भक्ति म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरू लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे. मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्तीदेखील हालचाल करू लागतात. मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे. ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे. पारा समोर टाकला तर दिसतो, पण काठीने मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे, मन आहे हे समजते, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण जावे, आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला. अंतःकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते. मिरच्या, मिरे, मीठ, इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात, त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे. शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण, या त्या तीन गोष्टी आहेत. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे, द्वेषमत्सर नसणे, आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे. भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा क

२१ सप्टेंबर १६६५*"छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ सप्टेंबर १६६५* "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ सप्टेबर १६८४* औरंगजेबाने "छत्रपती शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ सप्टेंबर १६८७* औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ सप्टेंबर १७४३* जयपूरचा राजा सवाई जयसिंगाचा मृत्यू  जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा !  हा अंबेरच्या विष्णुसिंह कच्छवाहाचा मुलगा. १७०० मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले. बहादूरशाह व नंतरचा मुहम्मदशाह यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे १७२०-१७२२ व १७३२ मध्ये त

घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?" हे आवश्य वाचा

घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?" हे आवश्य वाचा  कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत  ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये : (१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता  वेगवेगळे आहेत. (२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. (३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. (४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. (५) यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. (६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया १) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |  प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |  भावे ओवाळीन म्हणे नामा | वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या श

आरतीच्या वेळी टाळ्या वाजवण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे?*

*आरतीच्या वेळी टाळ्या वाजवण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे?* 👏 *टाळी वाजवण्याचं धार्मिक महत्व* धार्मिक दृष्टीने विचार केला तर आपल्या समाजात असं मानलं जातं की टाळी वाजवून तुम्ही देवाला तुमची गाऱ्हाणी ऐकायला बोलावतात. असं केल्याने देवाचं लक्ष वेधलं जातं असं लोक मानतात. याशिवाय आरती, भजन, किर्तन करतेवेळी टाळी वाजवल्याने पापांचा समूळ नाश होतो अशी आख्यायिका आहे. तसेच टाळी वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.  🙏 *वैज्ञानिक महत्व* आरतीच्या वेळेस टाळी वाजवण्याचा आपण वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब पडतो, तसेच याव्यतिरिक्त हृदय आणि फुफ्फुसासंदर्भातील आजारांना दूर ठेवण्यास देखील मदत होते. यामुळे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहतं. टाळी वाजवण्याला एक योग्य समजलं गेलं असल्याने या पद्धतीने अनेक रोगांपासून दूर राहण्यास देखील मदत होते.

पंत प्रतिनिधी... औंध. सातारा

Image
पंत प्रतिनिधी... औंध. सातारा

पण तुम्हाला माहिती आहे का की, श्रावणात केस का कापू नये किंवा दाढी का करू नये?

श्रावण महिना हा पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात शंकराची पूजा-आराधना केली जाते. श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अनेक भाविक उपवास करतात आणि श्रावणाच्या महिनाभरात अनेक गोष्टी पाळतात. जसे की मांसाहार न करणे, केस न कापणे किंवा दाढी न करणे इत्यादी. पण तुम्हाला माहिती आहे का की, श्रावणात केस का कापू नये किंवा दाढी का करू नये? यामागे आध्यात्मिक कारण असू शकते. अनेकांना असे वाटेल; पण यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. वैज्ञानिक कारण जुन्या काळापासून श्रावण महिन्यात केस कापू नये, असे सांगितले जाते. पूर्वी केस कापायला चांगली उपकरणे नसायची आणि उपलब्ध उपकरणे लोह धातूपासून बनवलेली असायची. त्या काळात वीज नसल्यामुळे अशा उपकरणांपासून दुखापत होण्याची भीती जास्त असायची. त्यात श्रावण महिन्यात पावसाचे वातावरण असल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीतीही असायची आणि जर एखादी दुखापत झाली, तर या महिन्यात जास्त ऊन नसल्यामुळे जखम लवकर भरायची नाही. त्यामुळे डोके आणि चेहऱ्यावर कोणतीही जखम होऊ नये म्हणून श्रावणात केस कापू नये, असे म्हटले जायचे. श्रावणात केस न कापण्या

१५ सप्टेंबर १६७८*छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी सनद लिहून दिली.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ सप्टेंबर १६७५* खांदेरी व इतर ठिकाणी इंग्रजांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन छत्रपती शिवराय व इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची रायगडावर पुन्हा भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ सप्टेंबर १६७८* छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी सनद लिहून दिली. ही सनद छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी अर्पण केल्याचा स्पष्ट उल्लेख सनदेत आहे, सनदेत आजुबाजुची काही गावे सुद्धा इनाम दिल्याचा उल्लेख आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ सप्टेंबर १६७९* मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून खांदेरी बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी ‘रिवेंज’ नामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली. मिन्चीन पोचताच ह्युजेसने ताबा मिन्चीन कडे सोपवला व तो लाकुडफाटा व इतर सामान मिळवण्याकरिता काही काळ मुंबईला परतला. ह्या कालावधीत मिन्चीन गस्त सांभाळीत होता परंतु मराठ्यांच्या छोट्या होड्या मोठ्या जहाजास चकव

१४ सप्टेंबर १६७८*"दक्षिण दिग्विजय मोहीम"कर्नाटक, तमिळनाडू येथे दीर्घकाळ चाललेली दक्षिण दिग्विजय मोहीम आटोपून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवराय "नागापट्टण" येथे मुक्कामी.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ सप्टेंबर १६७८* "दक्षिण दिग्विजय मोहीम" कर्नाटक, तमिळनाडू येथे दीर्घकाळ चाललेली दक्षिण दिग्विजय मोहीम आटोपून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवराय "नागापट्टण" येथे मुक्कामी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ सप्टेंबर १७६१* पानिपतच्या पराजयामुळे मराठ्यांच्या राज्यात चोहोकडे दंगेखोर संस्थानिक प्रबळ होऊन बखेडे करू लागले. त्यांत इंग्रजांनीही आपला भाग उचलला. सन १७६१ मध्ये निजामअल्ली पुण्यावर चालून येत आहे असे पाहून रघुनाथरावाने मुंबईकरांकडून दारूगोळा व सैनिक कुमक मागितली. मुंबईकर इंग्रजांनी ही चालून आलेली संधी न दवडता १४ सप्टेंबर १७६१ रोजी मराठ्यांशी एक व्यापारी करार केला. त्यात सहा कलमे असून व्यापाऱ्यास व जहाजास मराठ्यांच्या मुलखात त्रास होता कामा नये; जे मराठे अधिकारी इंग्रजी व्यापाऱ्यास त्रास देतील त्यांना शिक्षा व्हावी; मराठ्यांकडे जे युरोपियन सैनिक असतील त्यास त्यांनी इंग्रजांच्या स्वाधीन करावे; मराठे सैनिक फितूर होऊन इंग्रजांच्या आश्रयास गेले असतील त्यांना इंग्रजांनी मराठ्यांच्या स्वाधीन करावे; रामजीपंताने सिद्दीचा घ

#वीरगळ-

Image
#वीरगळ    #अश्मयुगीन काळा पासून आज पर्यत मनुष्य रहवास असलेले घोडनदी किनारी असणारे इनामगाव ता.शिरूर जि पुणे जे भिमानदी व घोडनदी यांचे संगमपासून ८/१० किमी अंतरावर अष्टविनायक मार्गावर आहे. या गावात महादेव मंदिर समोर #वैशिष्ट्यपुर्ण_५_वीरगळ आहेत या वीरगळी चे वैशिष्ट्य म्हणजे या वीरगळी मोठ्या योद्धाच्या किंवा राजा समान दर्जा असणार्या वीरांच्या आहेत यातील एका वीरगळी तील वीराचे डोक्यावर 👑 मुकुट आहे, यातील बाकीचे ४ वीरगळ मधील वीरांकडे पशुधन दाखवले आहे पैकी एक वीरगळ मधे हत्ती दल युद्ध करताना दाखवले आहे दुसरे दोन वीरगळ मधे घोडदल युद्ध करताना दाखवले आहे ४थी वीरगळ मधे पायदळ लढाई करताना दाखवले आहे या वैशिष्ट्यपूर्ण वीरगळी फक्त भिमतटीच्या गावातच आणि ते ही संगमाच्या ठिकाणी असणार्या गावामधे सापडतात. वीरगळ व शिलालेख अभ्यासक मा Anil Dudhane  सर यांचे माहीती नुसार या वैशिष्ट्यपूर्ण वीरगळी भिमतटीचा भागा व्यतिरिक्त आजपर्यंत फक्त सातारा जिल्ह्यामधे फक्त ३च सापडल्या आहेत . #विशेष_मार्गदर्शन #अनिल_दुधाने_सर        #इनामगाव_बद्दल_थोडक्यात_माहिती             भारतीय पुरातत्व विभागाला इनामगाव येथे अश्मयुगीन हत्य

७ सप्टेंबर १६६१*छत्रपती शिवरायांना कन्यारत्न (शिवरायांची पत्नी सगुणाबाई शिर्के) झाले, नाव ठेवले "राजकुंवर" उर्फ "नानीबाई".

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ सप्टेंबर १६६१* छत्रपती शिवरायांना कन्यारत्न (शिवरायांची पत्नी सगुणाबाई शिर्के) झाले, नाव ठेवले "राजकुंवर" उर्फ "नानीबाई". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *सप्टेंबर १६७५* "छत्रपती शिवाजी महाराज" आणि इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची किल्ले रायगडवर भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ सप्टेंबर १६८१* छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध कट अण्णाजी दत्तो, सोयराबाई, हिरोजी फर्जंद यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराशी संधान बांधले व संभाजीराजांना गादीवरून काढण्याचा व राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रचला. त्यांनी अकबरास पत्र पाठवून त्याच्या मदितीची अपेक्षा केली . त्या बदल्यात अकबरास स्वराज्यातील हिस्सा देण्याचे मान्य केले. परंतु अकबराचा मंत्री दुर्गादास याने अकबरास संभाजी महराजांकडे ते पत्र सोपवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अकबराने संभाजी महाराजांस सदर घटना कळवली. सदर कट उघडकीस आल्यावर संभाजी महाराजांनी कटात सामील लोकांस कैद करून कडक शिक्षा केली व हत्तीच्या पायी दिले. याच दरम्यान सोयराबाई यांनीदेखील आत्महत्या केल

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*४ सप्टेंबर १४६१*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ सप्टेंबर १४६१* ४ सप्टेंबर १४६१ रोजी हुमायूनचा खून झाला. क्रूरकर्मा म्हणून त्याची इतिहासात ख्याती आहे. त्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा निजामुद्दीन (कार. ४ सप्टेंबर १४६१-३० जुलै १४६३) गादीवर आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ सप्टेंबर १६५६* ४ सप्टेंबर १६५६ या दिवशी शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचे नवीन नामकरण केल्याची नोंद आहे. याचवेळी रायरीचे रायगड, तोरण्याचे प्रचंडगड, रोहिड्याचे विचित्रगड व चाकणच्या भुईकोट किल्ल्याचे संग्रामदुर्ग असे नाव ठेवण्यात आले असावे. तसेच काही महिन्यांपूर्वी जावळीतील भोरप्याच्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम चालु झाले होते त्याला महाराजांनी नाव दिले प्रतापगड!  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ सप्टेंबर १६६०* महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन निसटुन विशाळगडावर आले (जुलै १६६०), त्याच सुमारास किंवा लवकरच कान्होजींची प्रकृती ढासळत होती. दुर्दैवाने त्याच सुमारास कान्होजींच्या सहा मुलांमधे वाटणीवरून वाद सुरू होते. शिवाजीराजांना कान्होजींच्या आजारपणाची बातमी कळताच त्यांना एक मोठे पत्र लिहिले. त्यात ते कान्होजींना औषध