आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*४ सप्टेंबर १४६१*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १४६१*
४ सप्टेंबर १४६१ रोजी हुमायूनचा खून झाला. क्रूरकर्मा म्हणून त्याची इतिहासात ख्याती आहे. त्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा निजामुद्दीन (कार. ४ सप्टेंबर १४६१-३० जुलै १४६३) गादीवर आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १६५६*
४ सप्टेंबर १६५६ या दिवशी शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचे नवीन नामकरण केल्याची नोंद आहे. याचवेळी रायरीचे रायगड, तोरण्याचे प्रचंडगड, रोहिड्याचे विचित्रगड व चाकणच्या भुईकोट किल्ल्याचे संग्रामदुर्ग असे नाव ठेवण्यात आले असावे.
तसेच काही महिन्यांपूर्वी जावळीतील भोरप्याच्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम चालु झाले होते त्याला महाराजांनी नाव दिले प्रतापगड!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १६६०*
महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन निसटुन विशाळगडावर आले (जुलै १६६०), त्याच सुमारास किंवा लवकरच कान्होजींची प्रकृती ढासळत होती. दुर्दैवाने त्याच सुमारास कान्होजींच्या सहा मुलांमधे वाटणीवरून वाद सुरू होते. शिवाजीराजांना कान्होजींच्या आजारपणाची बातमी कळताच त्यांना एक मोठे पत्र लिहिले. त्यात ते कान्होजींना औषध व उपचार वेळच्यावेळी घेण्यास सांगतात. तसेच, तुमच्या मुलांचा, स्वारांचा व देशमुखीचा आम्ही योग्य सांभाळ करू असे लिहिले आहे. या पत्रावरून महाराजांची कान्होजींविषयीची काळजी दिसुन येते.
या पत्रानंतर कान्होजींनी दोनच दिवसांनी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी मुलांसाठी वाटणीपत्र तयार केले. मात्र तरीही त्यांच्या मुलांतील वाद संपले नाहीत. अर्थात बाजी सर्जेराव जेधे पुढे स्वराज्यातच होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १६७८*
स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजीराजे व त्यांच्या पत्नी येसूबाई यांना "शृंगारपूर" येथे "भवानीबाई" नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. शिर्केंच्या वाड्यातील बाळंतिनीच्या दालनात बालबोल फुटला, कन्यारत्न आलं येसूबाई मासाहेब झाल्या! संभाजीराजे आबासाहेब झाले!
राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १६७९*
इंग्रजांचा "खांदेरी" ला वेढा पडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १७३९*
पराक्रमी चिमाजीअप्पा...
४ सप्टेंबरला अप्पा मोठा विजय घेऊन पुण्यात पोचले. लूट तर होतीच मात्र आपले शब्द खरे करत त्यांनी वसईतील चर्चमधल्या घंटा काढून आणल्या होत्या. वसईच्या मोहिमेतून आणलेल्या या अजस्त्र घंटा नाशिक, पुणे, सातारा परिसरातील अनेक मंदिरातून आजही पाहायला मिळतात. त्यांच्या त्या विजयाची तीच आज जिवंत आठवण.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १७८९*
भाद्रपद शु. १५ - गोवध-बंदीचे फर्मान !
शके १७११ च्या भाद्रपद शु. १५ रोजी मराठेशाहीतील प्रसिद्ध शूर, मुत्सद्दी महादजी शिंदे यांनी समग्र हिंदुस्थानांत गोवध मनाई करण्यासंबंधीचे फर्मान बादशहापासून मिळविले.
मराठी साम्राज्याचा विस्तार धर्म व संस्कृति यांच्या रक्षणासाठीच होता. यावनी आक्रमणांत भ्रष्ट झालेली देवस्थाने सोडविणे हे एक कर्तव्यकर्म मराव्यांना होऊन बसले होते. काशी, प्रयाग, मथुरा, अयोध्या ही पवित्र स्थाने स्वतःच्या ताब्यात असावीत, इस्लामी शत्रूचा उपद्रव यांना मुळीच होऊ नये यासाठी मराठे नेहमी दक्ष असत. मथुरा शहरी महादजी शिंद्यांचा सात वर्षांचा काळ गेल्यामुळे त्यांचे ते आवडतें शहर झाले होते. खुद्द महादजी हेहि धार्मिक मनोवृत्तीचे होते. त्यामुळे मथुरा आपल्या ताब्यात असावी अशी खटपट त्यांची होतीच. 'मथुरा-वृंदावन' ही दोनहि स्थळे सरकारचे नांवें पातशहाकडून करून घ्यावीत असा आग्रह दक्षिणेतून नाना फडणीसहि धरीत होते. पुढे महादजींनी मोठा प्रयत्न करून शके १७१२ मध्ये बादशहापासून मथुरा-वृंदावनच्या सनदा मिळविल्या. त्यापूर्वीच शिंदे यांनी गोवधबंदीचे फर्मानहि बादशहापासून भाद्रपद शु. १५ ला मिळविले होते. गोवधाविरुद्ध शिवाजीमहाराज किती कष्ट करीत होते हे प्रसिद्धच आहे. गाय हा हिंदूंचा मानबिंदु समजला जातो. पैगंबरानेसुद्धां चार पापकर्मात गोवेध हे प्रमुख पापकर्म म्हणून सांगितले आहे. महादजींच्या आग्रहावरून यादशहानें गोवधबंदीचा हुकूम काढला., त्याचा सारांश याप्रमाणे आहे: “पशु सुद्धा विधात्याच्या सृष्टीतील जीव असून ते निरुपयोगी होत असे समजू नये. त्यांतहि विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यंत जरूरी आहे आणि गाईवरच मनुष्यांचे व पशुंचे जीवन अवलंबून आहे म्हणून आम्ही आपल्या उदार अंतःकरणाने व हर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्यभूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गोहत्येचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहोत."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर १८३९*
एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहाविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५-३८) याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली. शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब (शहाजी) यास नामधारी छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे प्रतापसिंह स्थानबद्धतेत मरण पावले.
आप्पासाहेबाच्या मृत्यूनंतर सातारा संस्थान दत्तक वारस नामंजूर करून खालसा करण्यात आले (१८४८).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment