#वीरगळ-

#वीरगळ

   #अश्मयुगीन काळा पासून आज पर्यत मनुष्य रहवास असलेले घोडनदी किनारी असणारे इनामगाव ता.शिरूर जि पुणे जे भिमानदी व घोडनदी यांचे संगमपासून ८/१० किमी अंतरावर अष्टविनायक मार्गावर आहे. या गावात महादेव मंदिर समोर #वैशिष्ट्यपुर्ण_५_वीरगळ आहेत या वीरगळी चे वैशिष्ट्य म्हणजे या वीरगळी मोठ्या योद्धाच्या किंवा राजा समान दर्जा असणार्या वीरांच्या आहेत यातील एका वीरगळी तील वीराचे डोक्यावर 👑 मुकुट आहे, यातील बाकीचे ४ वीरगळ मधील वीरांकडे पशुधन दाखवले आहे पैकी एक वीरगळ मधे हत्ती दल युद्ध करताना दाखवले आहे दुसरे दोन वीरगळ मधे घोडदल युद्ध करताना दाखवले आहे ४थी वीरगळ मधे पायदळ लढाई करताना दाखवले आहे या वैशिष्ट्यपूर्ण वीरगळी फक्त भिमतटीच्या गावातच आणि ते ही संगमाच्या ठिकाणी असणार्या गावामधे सापडतात. वीरगळ व शिलालेख अभ्यासक मा Anil Dudhane  सर यांचे माहीती नुसार या वैशिष्ट्यपूर्ण वीरगळी भिमतटीचा भागा व्यतिरिक्त आजपर्यंत फक्त सातारा जिल्ह्यामधे फक्त ३च सापडल्या आहेत .
#विशेष_मार्गदर्शन #अनिल_दुधाने_सर
      
#इनामगाव_बद्दल_थोडक्यात_माहिती 
           भारतीय पुरातत्व विभागाला इनामगाव येथे अश्मयुगीन हत्यारे सापडली आहे , इतकेच नव्हे तर हडप्पा संस्कृती समकालीन नागरी वसाहती चे वस्तू, मातीची भांडी, घरांचे अवशेष सापडले आहेत .९ व्या शतकात हा भाग चालुक्य ,राष्ट्रकूट या राजवटीत होता . नंतर हा भाग देवगिरी चे यादव नंतर अहमदनगर ची निजामशाही व काही काळ निजामशाही मधे  मालोजीराजे भोसले यांचे नियंत्रण मधे ही असावा १६वे शतकातील कागदपत्रे ,भौगोलिक स्थान वाचून लक्षात येते. भोसले घराण्याची कर्मभुमी असणाऱ्या भिमानदी हा भाग पुढील काळात म्हणजे शहाजीराजे भोसले व शरीफजी राजे भोसले यांचा काळ हा या भिमतटी च्या भागाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहला यासाठीचा पाया ठरला हा भाग काही काळ शहाजीराजे भोसले यांनी तीन वर्षे पेमगीरी वरून चालवलेल्या स्वराज्य चा भाग होता . १६३० चे आसपास शहाजीराजे भोसले, मुघल बादशहा जहांगीर व आदिलशहा यांच्या करार नुसार भिमानदी उत्तरेकडील भाग मुघलांन कडे गेला . शिवाजी महाराज यांचे सरसेनापती नेताजी पालकर हे शेजारील तांदळी गावचे , पेडगाव श्रीगोंदा जिथुन संभाजीराजे यांना औरंगजेबाने वढु बुद्रुक - तुळापूर येथे नेले ते याच भागातून हा भाग शंभुपुत्र शाहू महाराज यांनी १७११ नंतर मुघल मुक्त करण्यास सुरुवात केली. हिंदनृपती शाहू महाराज यांचे बडोदा चे सुभेदार गायकवाड यांच्या घराण्याची इनामगाव येथील राजे घाडगे घराण्यासोबत सोयरिक आहे . इनामगाव जवळच असणाऱ्या कर्डे निमोणे ही दोन गावे छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा साम्राज्याचे प्रधान सेवक  थोरले बाजीराव बल्लाळ भट  यांचे रक्षणासाठी नेमलेल्या सैन्याचा पगार देण्यासाठी बाजीराव प्रधान यांना इनाम दिले होते
#राहुल_दोरगे_पाटील
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid036JCxTVzy45LNZpBpMge5ZBJnCTjuqU91GqA1dWUN2iH61DzyZuLZuWRs9Dd2wj68l&id=100015189858480&mibextid=9R9pXO

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४