७ सप्टेंबर १६६१*छत्रपती शिवरायांना कन्यारत्न (शिवरायांची पत्नी सगुणाबाई शिर्के) झाले, नाव ठेवले "राजकुंवर" उर्फ "नानीबाई".

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १६६१*
छत्रपती शिवरायांना कन्यारत्न (शिवरायांची पत्नी सगुणाबाई शिर्के) झाले, नाव ठेवले "राजकुंवर" उर्फ "नानीबाई".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*सप्टेंबर १६७५*
"छत्रपती शिवाजी महाराज" आणि इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची किल्ले रायगडवर भेट.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १६८१*
छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध कट
अण्णाजी दत्तो, सोयराबाई, हिरोजी फर्जंद यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराशी संधान बांधले व संभाजीराजांना गादीवरून काढण्याचा व राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रचला. त्यांनी अकबरास पत्र पाठवून त्याच्या मदितीची अपेक्षा केली . त्या बदल्यात अकबरास स्वराज्यातील हिस्सा देण्याचे मान्य केले. परंतु अकबराचा मंत्री दुर्गादास याने अकबरास संभाजी महराजांकडे ते पत्र सोपवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अकबराने संभाजी महाराजांस सदर घटना कळवली. सदर कट उघडकीस आल्यावर संभाजी महाराजांनी कटात सामील लोकांस कैद करून कडक शिक्षा केली व हत्तीच्या पायी दिले. याच दरम्यान सोयराबाई यांनीदेखील आत्महत्या केल्याच्या नोंदी आढळून येतात. सदर कटाच्या प्रकरणाची माहिती आपणास ७ सप्टेंबर १६८१ च्या इंग्रजांच्या पत्रात तसेच, निकोलाय मनुची, रॉबर्ट ऑर्म व पंतप्रतिनिधीच्या बखरीत आढळते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १६९५*
सर्वात मोठी समुद्री लूट
औरंगजेब याचे 'गंज-ए-सवाई' (in english 'Gunsway') नावाचे शस्त्र आणि व्यापारी सामान (खजिना) वाहून नेणारे जहाज 'Henry Every' या नावाच्या इंग्लिश समुद्री लुटारु ने मोखा (येमेन) ते सुरत या व्यापारी समुद्री मार्गावर लुटले. हे जहाज 'फतेह मोहम्मद' याच्या देख-रेखीखाली आणले जात होते. जेव्हा हे जहाज लुटण्यात आले, तेव्हा फतेह मुहम्मद काही सैन्य सोबत घेऊन, खजिना आणि जहाजावरील लोक तसेच टाकून लपत लपत पळून गेला. जहाजावर असणाऱ्या लोकांवर हेनरी ने खजाना कुठे ठेवलाय हे माहीत करू घेण्यासाठी जबरदस्ती केली, भयानक अत्याचार केले. जेव्हा त्याला खजाना सापडला,तेव्हा त्याची किंमत ही ३,२५,०००-६,००,००० 'यूरो' इतकी भरली. निव्वळ सोने आणि चांदी यांची असणारी संख्या (नाणी आणि इतर घण रुपात) मिळून ५,००,००० इतकी होती. ही आजवर भारताच्या समुद्री लुटीमधे झालेली सर्वात मोठी लूट.
यामुळे मात्र औरंगजेब चिडला आणि त्याने इंग्रजांना दिलेल्या व्यापाराच्या सर्व सवलती आणि परवाने काढून घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १७४०*
इंग्रजांचा मराठ्यांशी तह
मराठ्यांच्या वसई मोहिमेच्या विजयाने मुंबईकर इंग्रजांच्या छातीत धडकी भरली. मराठ्यांशी दोस्ती न राखल्यास मुंबईची वसई व्हावयाची अशी शंका त्यास जाचू लागली. म्हणून त्यांनी कॅ. इंचबर्ड यास जून १७३९ त चिमाजी अप्पांच्या भेटीस पाठविले. दोघांनी इंग्रज मराठे याजमधील शांततेचा तह होण्यासंबंधी बोलणी केली. ह्या बोलण्यातून विशेष फलनिष्पत्ती न दिसल्यामुळे इंग्रजांनी कॅ. गॉर्डान यास शाहू महाराजांकडे तहाची बोलणी करण्यासाठी पाठविले. तो साताऱ्यास शाहू महाराजांपाशीं ८ जून ते ३०
जूनपर्यंत होता. त्याने शाहू महाराजांस हिरे, मोती, माणके आदि मौल्यवान वस्तू भेटीदाखल दिल्या. आपल्या सातारच्या मुक्कामात त्याने अनेक सरदारांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा त्यास श्रीमंत बाजीराव ही एकच अद्वितीय पराक्रमी व्यक्ती मराठी राज्यात आहे असे आपले मत इंग्रजांस कळविले. तेव्हा बाजीरावांची मर्जी संपादून मराठ्यांशी शांततेचा तह करून मुंबईस धोका देणार नाही असे कबूल करून घ्यावे हा हेतू धरून इंग्रजांनी बाजीरावांच्या भेटीस कॅ. इंचबर्डची रवानगी केली. इंचबर्ड बाजीरावांस १४ जानेवारी १७४० रोजी गोदावरी काठी भेटला. बाजीरावांनी तहाच्या कलमास मान्यता दिली. दरम्यान नासिरजंगावर स्वारी होऊन श्रीमंत बाजीराव पेशवे रावेर गांवी १७४० त निवर्तले. इंग्रजांनी नानासाहेब पेशव्यांशी हा तह ७ सप्टेंबर १७४० रोजी पूर्ण केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १७४१*
माळव्याची सनद
माळवा हा मध्ययुगीन भारतातला एक अत्यंत महत्वाचा प्रांत होता. तत्कालीन माळवा सुभ्याच्या सीमा ह्या ढोबळमनाने आजच्या मध्य प्रदेश राज्याशी जुळतात. हा प्रांत १६व्या शतकात मुघलांनी जिकून घेतला. मोक्याच्या जागी असल्यामुळे अनेक व्यापारी व लष्करी मार्ग इथून जायचे. शिवाय माळव्यातल्या वस्त्रोद्योगामुळे ह्या प्रांताची भरभराट झाली होती. इथे चालणारी अफूची शेती देखिल उत्पन्नात भर टाकायची. १७व्या शतकाच्या शेवटच्या वर्षांमधे मुघलांना ह्या सुभ्यातून सुमारे १ कोटी रुपये उत्पन्न मिळल्याच्या नोंदी सापडतात.
राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांनी माळव्यावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली. १६९९ साली नर्मदा ओलांडून माळव्यावर स्वारी करणारे पहिले मराठा सरदार म्हणजे कृष्णाजी सावंत. ह्यावर जदुनाथ सरकार म्हणतात, "The path thus opened was never again closed until it (Malwa) passed into Maratha possesion". ताराबाईंच्या काळात ह्या स्वाऱ्यांचं प्रमाण वाढू लागलं. परंतु ह्यांनी खरा वेग पकडला तो १७२०च्या दशकात. १८व्या शतकातल्या हिशोबाच्या कागदपत्रांवरून माळव्याच्या राजकीय आणि आर्थिक इतिहासावर प्रकाश पडतो. १७२०च्या दशकात मराठे खेड्यांमधून खंडण्या वसूल करायला लागले होते. हळूहळू ह्यातला नियमीतपणा वाढला आणि त्याला महसूलाचं रूप येत गेलं. १७३०च्या दशकात गावाखेड्यांसोबत शहरं आणि शिबंद्यांमधून नियमीतपणे महसूल गोळा केला जाऊ लागला. माळव्यात मराठा सरदारांची नियुक्ती होयला सुरुवात झाली. १७३०च्या दशकाच्या अंतापर्यंत दक्षिण माळव्यावर मराठ्यांचा जम चांगलाच बसला होता. १७३७ला भोपाळच्या लढाईत मराठ्यांनी मुघलांचा पराभव केल्यावर माळवा आपल्या हातून कायमचं निसटलं हे मुघलांना समजून चुकल. तेव्हा झालेल्या तहानुसार मराठ्यांना माळवा प्रांत कबूल करण्यात आला. परंतु मधल्या काळात नादीर शाहनी दिल्लीवर केलेल्या हल्ल्यामुळे व बाजीराव पेशवे आणि चिमाजीअप्पा पेशवे ह्यांच्या अकाली मृत्यूंमुळे माळवा अधिकृतपणे हातात यायला १७४१ साल उजाडलं. बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर १७४० साली नानासाहेब पेशवेपदावर आले व पुन्हा वाटाघाटी सुरु झाल्या. नानासाहेब फौजा घेऊन माळव्यात दाखल झाले. मुघलांच्या वतीने सवाई जयसिंग बोलणी करायला आला होता. जयसिंगनी बादशाह कडून सनद मिळवण्याची जबाबदारी स्वीकारली. ७ सप्टेंबर १७४१ला ही सनद मिळाली व सुमारे २ दशकांच्या प्रयत्नांनंतर अखेर माळव्याचा सुभा मराठ्यांच्या ताब्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १७६९*
माधवराव पेशव्यांवर खूनी हल्ला
माधवराव पर्वतीवरून शनिवारवाड्यात येत असताना गारद्याने वार केला. माधवराव हुशार असल्याने त्यांनी तो वार सफाईदारपणे चुकवला. बुधवारी साधारण तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारची जेवणं झाल्यानंतर माधवराव पर्वतीवर दर्शनाला गेले होते. तिथून येताना सोबतच्याच एका गारद्याने अचानक तलवार उपसून माधवरावांवर चालवला. माधवराव घोड्यावर बसले होते. त्यांचं पटकन लक्ष गेलं आणि त्यांनी घोडा एका बाजूला झुकवला त्यामुळे ते वाचले. एवढ्यात आजूबाजूच्या पंधरा-वीस जणांनी त्या गारद्याला जमिनीवर लोळवून पकडून ठेवलं. मोरोबादादा तेवढ्यात तिथे आले आणि गारद्याला मारू न देता त्यांनी त्याला अंधारकोठीत घालायला सांगितलं. चौकशी सुरु होती, पण पुढे त्याचं काय झालं ते समजत नाही. हा हल्ला कोणी करवला याचं ठोस कारण कुठेही सापडलं नसलं तरी हे काम रघुनाथरावांनी अथवा सखारामबापूंनी केलं नसेल असं सांगता येत नाही. कारण माधवरावांवर सखारामबापू राघोबासाठी खुनी हल्लाही करू शकतो असं काही वर्षांपूर्वी गोपाळराव पटवर्धनांनी गोपिकाबाईंना सांगितलं होतं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १७७९*
दुसऱ्या बाजीरावाने "पांडुरंग कोल्हटकर" यांच्या मार्फत "उंदेरी" व "खांदेरी" चा ताबा पुन्हा मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ सप्टेंबर १७९१*
उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४