आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२३ सप्टेंबर १६३३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १६३३*
मुरार जगदेव हे विजापूर दरबारचे सरदार, या दिवशी सूर्यग्रहण होते, हा योग साधून त्यांनी आपले सोन्यारुपाने तुलादान केले. हे तुलादान पुण्यापासून १० कोसावर भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमात वसलेला नांगरगावास झाले, तेथे संगमेश्वराचे मंदिर बांधले त्यामुळे या गावाचे नामकरण होऊन तुळापुर झाले. ३०० वर्षांपूर्वी यादवांचे राज्य बुडाल्यानंतर एवढा मोठा तुळादान विधी झाला नव्हता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १६४३*
अदिलशहाने पोर्तुगीजांना पत्र पाठवले, त्यांच्या चौल किल्ल्याच्या परिसरात याकुतशहा व फत्तेखान हे २ बंडखोर आणि ज्याला ते मलिक म्हणतात असा १ मुलगा अशा तिघांना आश्रय दिला आहे, त्यांना पोर्तुगीजांनी आपल्या मुलखातून हाकलून द्यावे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १६७३*
इ.स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार लुटली होती, तिची भरपाई मिळावी अशा मागणीचा अनेकवेळा अयशस्वी प्रयत्न इंग्रजांनी केला. हे प्रलंबित प्रकरण मिटवण्याकरिता छत्रपती शिवाजीराजांशी बोलणीकरिता इंग्रजांनी 'नारायण शेणवी' यास २३ सप्टेंबर १६७३ रोजी पाठवले. या भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः राजापूर लुटीचा तपशील असलेली वही नारायण शेणवी यांस दाखवली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १६८०*
छत्रपती संभाजीराजांनी तुळजाभवानीस श्रुन्गारलेला हत्ती व २० सहस्त्र होणांचे दान म्हणून देऊ केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १६८३*
छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजाना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या ताब्यातील उत्तर कोकणातील चौलवर हल्ला केला,चौल मराठ्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने मराठ्यांच्या ताब्यातील दक्षिण कोकणातील फोंडा किल्ल्यावर हल्ला करायचे व मराठी मुलखात लूटमार करायचे ठरवले. कारवारकर इंग्रजांच्या नोंदीनुसार सप्टेंबर महिन्यात व्हाइसरॉय मराठ्यांचे मुलाखत लूटमार करत होता इंग्रजांच्या दुसऱ्या एका नोंदीनुसार पोर्तुगीज अमानुष कृत्य करत असून ते जिवंत माणसे जाळतात व देवळेही पाडत असल्याचे लिहिले आहे. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे त्या भागात त्यांच्या पोर्तुगीजशी सतत चकमकी सुरू होत्या. यासंदर्भातील इंग्रजांची नोंद," लढाया तर जोरात व घोर रक्तपात होऊन चालत आहेत आणि रोजच्या रोज काहीना काही खटके उडतच आहेत". कारवारकर इंग्रजांनी पाठवलेल्या या पत्राची तारीख होती २३ सप्टेंबर १६८३.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १७७४*
नाना आहे तर पेशवाई आहे  - छत्रपती रामराजा माहाराज
नारायणराव यांच्या खुनानंतर मराठेशाहीचा कारभार नाना फडणवीस यांनी समर्थपणे पेलला. मुत्सद्दीपणाचे जोरावर तब्बल पंचवीस वर्षे राज्य राखले. दरम्यानच्या काळात नानांना अस्तनीतही शत्रू निर्माण न झाले असते तर नवलच.. 

छत्रपतींचे राज्यावर किती बारीक लक्ष होते व नाना फडणवीस यांच्यावर किती भिस्त होती ते या पत्रातून समजते. छत्रपती रामराजा माहाराज बाबुराव कृष्ण यांचेमार्फत नानांना सतर्कतेने राहावे याबद्दल दिनांक २३ सप्टेंबर सन १७७४ रोजीच्या पत्राने कळवीत आहेत. 

"माझ्या पेशव्याचे अनाचे सार्थक नानाही केले.." 
"नाना आहे तर पेशवाई आहे.." असे छत्रपती रामराजा माहाराज गौरवाने म्हणत आहेत. यावरूनच नानांची महती आणि मराठेशाहीतील स्थान लक्षात येते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १८०३*
मराठे व इंग्रजांची दुसरी लढाई
इंग्रजांनी सबंध भारतावर राज्य केले.
सुरुवात कुठुन केली हो...?
कशी केली.....?
का बर मराठेच दिसले...?
देशात शुरत्वाचा वारसा सांगणारी इतर राज्ये नव्हती का...?
"इंग्रज जाणुन होते अटकेपार झेंडे लावणारे शिव-शंभूंचा शुरत्वाचा वारसा उरात घेऊन फीरणारे मराठेच आपल्याला पराभूत करु शकतात......"
एव्हाना इंग्रजांनी महाराष्ट्रात आपलेच लोक सैन्यात भरती करुन आपल्याच विरोधात पाळेमुळे रोवली.......
मराठे व इंग्रजांची दुसरी लढाई झाली ती २३ सप्टेंबर १८०३ मध्ये जालना जिल्ह्यातील आष्टी या ठीकाणी यावेळी मात्र त्या गोर्या आर्थर वेलेस्ली याने सेनापती रंगोजी शिंदे अर्थात मराठ्यांचा पराभव केला....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ सप्टेंबर १९३२*
भारतीय स्वतंत्र लढ्यात शहीद होणारी पहिली महिला…

२१ वर्ष वयाच्या मुलीने इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली तिचं नाव आहे “प्रीतीलता वड्डेदार.” प्रीतीलता वड्डेदार चा जन्म बंगाल मधील चिटगाव येथे ५ मे १९११ रोजी झाला. ती लहानपणापासून अत्यंत हुशार होती, तिने फिलॉसॉफी विषयामध्ये पदवी प्राप्त केली.तिने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याच गावातील एका शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. पण त्यांना देशासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती.
१९३२ च्या दरम्यान त्या सुर्यसेन यांना भेटल्या. त्यावेळेस सुर्यसेन हे क्रांतिकरकांचे प्रेरणास्थान बनले होते, ब्रिटिशांकडून शस्त्र लुटण्याचे त्यांचे किस्से लोकांच्या ओठावरच होते. सुर्यसेन यांना भेटल्यानंतर त्यानीं आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतला,पण त्या महिला असल्या कारणाने त्यांना विरोध सुद्धा करण्यात आला. पण त्यांच्या मनात देशभक्ती उसळत होती. अशाप्रकारे त्या क्रांतिकारी गटातील सदस्य बनल्या. क्रांतिकारी गटात असतांना त्यांनी बरेच कारनामे सुद्धा केले होते जसे-टेलिग्राम ऑफिस वरील हल्ला,रिजर्व पोलिस लाईन ताब्यात घेणे अशा कामात त्या नेहमी पुढे असायच्या.
जलालाबाद येथील क्रांतिकारी हमल्या दरम्यान त्यांनी स्फोटके नेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच सोपविण्यात आली होती.
हल्ल्यासाठी २३ सप्टेंबर १९३२ हा दिवस ठरवण्यात आला होता. हल्ल्यासाठी निवडलेल्या क्रांतीकारकांना पोटॅशिअम सायनाईड देण्यात आलं होतं कारण कुणीही जिवंत पकडल्या जाऊ नये म्हणून. प्रीतीलताने हल्ल्यासाठी एका पंजाबी माणसा सारखी वेशभूषा केली होती. २३ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता यांनी त्या क्लब वर हल्ला केला. हल्ल्याच्यावेळेस क्लब मध्ये ४० इंग्रज अधिकारी आणि काही इंग्रज पोलीस उपस्थित होते. आग लागल्याने पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि एक गोळी प्रीतीलता ला लागली,इंग्रजांनी त्यांना घेरले.
पण प्रीतीलता वड्डेदार यांनी एका क्षणाचाही विचार न करता सायनाईड ची गोळी घेतली आणि इंग्रजांना फक्त तिचा मृतदेह मिळाला. अशा प्रकारे फक्त २१व्या वर्षी अद्वितीय साहस दाखवत या भारत मातेच्या वीर मुलीने देशासाठी बलिदान दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४