आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१ डिसेंबर १६६१*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६१* छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६३* छत्रपती शिवरायांच्या भीतीने व दहशतीने घाबरून मुघल सरदार शाहीस्तेखान औरंगाबाद सोडून बंगालकडे रवाना झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६४* छत्रपती शिवरायांनी कोकणातील राजापूर व दाभोळ जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६७५* छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसेंबर-जानेवारीम