*१३ नोव्हेंबर १६५९*छत्रपती शिवरायांनी मायणी निमसोड, खटाव जिंकले
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १६५९*
छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १६६८*
छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १६७३*
मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात:
"सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत."
सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'
"शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.
फ्रेंचानी नुकताच त्यास दारुगोळा पुरविल्याबद्दल दरबाराकडे तक्रारी गेल्या आहेत.
शिवाजीला बेटावरुन अन्नसामुग्री मिळते याचाच त्यांना संताप येतो. मग त्याला युध्दसामुग्री पुरविली तर त्यांना वैषम्य वाटणारच. बरे मुंबईच्या रक्षणाच्या दृष्टीने मोठ्या तोफा फक्त १३ च आहेत. त्या व पितळी तोफाही तेथे आवश्यक आहेत...शिवाजीला आपण धान्य पुरवितो अशी बहादुरखानाने व इतर अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे....पितळी तोफांचा समुद्रावर चांगला मारा होतो. त्यांना खर्च मोठा लागत असला तथापि शिवाजी किंवा दुसरा कोणी त्यांचा मालक होणे आम्हांला लाज आणणारे आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १६८१*
औरंगजेब बुऱ्हानपूर येथे पोचला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १६८१*
शहजादा अकबरावर विश्वास बसल्यामुळे रविवार दि.१३ नोव्हेंबर १६८१ रोजी पालीस जाऊन संभाजी महाराजांनी
अकबराची भेट घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १६८३*
निळोपंत यांनी चेंबूर, तळोजे, कोळव हि ठाणी जिंकली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १६९९*
राजाराम महाराजांसोबत मराठे सुरतेच्या रोखाने
जात असल्याची खबर मोगल सरदारास भेटताच बेदरबख्त, चिन किलीज खान, झुल्फिकारखान, नस्त्रतजंग हे त्यांच्या पाठलागावर दौडत आले व परिंदयाजवळ बेदरबख्ताने यास गाठले. थोडी चकमक होऊन मराठे अहमदनगरच्या दिशेने वळाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ नोव्हेंबर १७८०*
महाराजा रणजितसिंग यांचा जन्म
ज्यावेळी सारा भारत मुघल फौजांनी आपल्या टाचेखाली चिरडला होता त्यावेळी त्यांचा मुकाबला करून स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची हिम्मत भारतात ज्या हिम्मतवान राजांनी केली त्यात अग्रेसर होते आपल्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यांच्या मराठा साम्राज्याची दहशत दिल्लीत औरंगझेबाने देखील घेतलेली होती आणि दुसरे होते पंजाब प्रांतातील शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीतसिंग.
महाराजा रणजितसिंग यांचे नाव आज इतिहासात राजा शिवछत्रपतीं इतकेच आदराने घेतले जाते. तरीही त्यांच्या जीवनचरित्राबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पंजाबएतर लोकांना फारशी माहीत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment