१२ नोव्हेंबर १६५९*छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ नोव्हेंबर १६५९*
छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ नोव्हेंबर १६६७*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ नोव्हेंबर १६८३*
किल्ले फोंड्यावर प्रचंड पराभव सहन करून पोर्तुगीज सैन्य जीव वाचवण्यासाठी दुर्भाट सोडून गोव्यात पळाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ नोव्हेंबर १६८४*
कोथळागडाची मोहिम
मोगल अधिकाऱ्यांनी कोथळागडाच्या परिसरातील जमीनदार रामाजीशी संगनमत करुन बंदुकधार्यांना कोथळागडावरती पाठविले. अब्दुल कादिराने आपले सैन्य पायथ्याशी झाडीत लपवून ठेवले व किल्ल्यांच्या दरवाज्याजवळ त्याने ओरडा केला ' दरवाजा उघडा. लोकांनी धान्य आणले आहे.' आपलीच माणसे समजून आतील लोकांनी दरवाजा उघडला. अब्दुल कादीरचे लोक आत गेले. लढाई झाली. माणकोजी मांढरे व त्याचे लोक मोगल सैन्याच्या मदतीस आले आणि किल्ल्याचा ताबा मिळवला. अशा तर्हेने तळकोकणावरती आधिपत्य गाजविणारा किल्ला मोगलांच्या हाती पडला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ नोव्हेंबर १६९३*
औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला, तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला, त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ नोव्हेंबर १७६२*
"माधवराव पेशवे" यांच्याविरूद्ध राघोबादादांची घोडनदी येथे लढाई. १२ नोव्हेंबर रोजी राघोबादादा "आळेगाव" येथे संपूर्ण शरणागती पत्करून पेशव्यांना शरण गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ नोव्हेंबर १८८०*
सेनापती बापट जन्मदिन
(मृत्यू - २८नोव्हेंबर १९६७)
स्वदेशी 'बॉम्ब'विद्येचे जनक, सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट यांची आज जयंती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४