१५ नोव्हेंबर १६६४*छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला पहिला जलदुर्ग "सिंधुदुर्ग" या गडाचा पाया घातला.
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ नोव्हेंबर १६६४*
छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला
पहिला जलदुर्ग "सिंधुदुर्ग" या गडाचा पाया घातला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ नोव्हेंबर १६६७*
"छत्रपती शिवराय" डिचोली (बिचोलिम), गोवा येथे मुक्कामी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ नोव्हेंबर १६७१*
चौल सुभ्यामधले वतनदार, देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत.
"उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही. तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होइल. काही मुलाहिजा होणार नाही" असे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात रोखठोकपणे म्हटले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ नोव्हेंबर १६७९*
१५ नोव्हेंबर १६७९ रोजी संगमनेर येथे झालेल्या लढाई नंतर छत्रपती शिवरायांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी अगदी अल्पकाळ पट्टा या दुर्गावर वास्तव्य केले तेव्हापासून आजतागायत या दुर्गाचे नांवच विश्रामगड म्हणूनच रुढ झालेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ नोव्हेंबर १६७९*
गव्हर्नर आंतोनिक बाइश-द-सांद याने पोर्तुगीजांच्या राजास लिहिलेले पत्र...!
छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याला लागून असलेल्या दमणपर्यंतचा सर्व प्रदेश जिंकला आहे. या शहरापासून ५ दिवसांच्या अंतरावर त्याचे मुघल फौजेशी युध्द चालु आहे. तसेच चौलपासुन २ कोसांवर असलेल्या खांदेरी उंदेरी बेटाची तटबंदी ही तो करीत आहे. त्यांचा शेजार आम्हाला चांगला नाही. इंग्रजांनी त्यांना विरोध करायचे ठरवले असून आमचे सहकार्य या कामी मागितले आहे. आमच्या उत्तरेकडील प्रदेशाच्या सेनापतीस कळविले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांशी आमचा शांततेचा करार झाला असल्याने त्या कराराचा भंग करून त्यांच्याशी आम्हाला युध्द करता येत नाही असे इंग्रजांना कळवावे. ही सबब सांगण्याचे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा इंग्रजांचा शेजार वाईट आहे. असे आमचे मत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ नोव्हेंबर १६८३*
व्हाईसरॉय सेंट स्टीफेन (Santa Esteva - कुंभार जुवे) वर चढला. व्हॉईसराय सकाळी ७ वाजता सेंट स्टीफेन (santa Esteva - कुंभार जुवे) वर चढला. वर छत्रपती संभाजी महाराजांचे ४० लोक होते. पोर्तुगिजांचे १५० लोक व बरेच खाली बंदुकधारी लोक पाहून छत्रपती संभाजी महाराजांचे लोक पळाले. इतक्यात छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे सैन्य पायथ्यावर आले. घोडेस्वार मदतीस आले. पळालेले ४० लोक स्वारांनिशी परतले. थोडे गोळीबाराला बळी पडले. परंतु शत्रूचे सर्वच लोक मारले गेले. व्हाईसरॉय व जनरल घोड्यावर होते व ४ बारी पिस्तुलातील बार काढीत गेले म्हणून वाचले. व्हाईसराय व जनरल आपले घोडे सोडून देऊन छातीभर पाण्यात जाऊन होडीत चढले व पैलतीराला गेले. व्हॉईसरायच्या आज्ञेनुसार दोन बॅटलीअन्स त्याचे मदतीस आली होती. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे सैन्य घसरले. त्याचा पुरा मोड केला. बहुतेक मारले गेले काही चिखलात रुतून मेले, काही रुतलेल्या स्थितीत भरती आल्याने पाण्यात बुडून मेले. काही पोहणीस लागुन मेले या पाण उताराच्या जागी पोर्तुगीजांच्या अडकलेल्या सैन्याची धुळदान उडवताना छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यातील काही लोक ही चिखलात रुतले व पाण्याच्या ओघात सापडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ नोव्हेंबर, १८७५*
आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म
भारतीय स्वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पत्याच्या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याला तोड नाही.
त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment