आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२८ नोव्हेंबर १६५७*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १६५७*
छत्रपती शिवरायांनी चौल काबिज केले.
महाराज स्वत: जातीने कोकणात उतरले, ३ ओक्टोबर १६५७ रोजी महाराज कल्याणला पोहचले. कल्याण-भिवंडी एकाच दिवशी म्हणजे २४ ओक्टो १६५७ या दिवशी काबिज झाली. त्यानंतर महाराजांनी लगेचच एका महिन्याच्या आत २८ नोव्हेंबर १६५७ या दिवशी चौल काबिज केले. चौल पाठोपाठ माहूलीचा किल्ला राजांनी घेतला

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १६५९*
शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विशाळगड ठेवले.
अफझलखान वधानंतर अवघ्या १८ दिवसांत छत्रपती शिवरायांवी "वाई" ते "कोल्हापूर" हा प्रदेश स्वराज्यात आणला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १६७०*
३००० फौज सोबत घेऊन छत्रपती शिवरायांची दुर्ग बांधणी संदर्भात "खांदेरी" बेटाची पाहणी.
पुढे लवकरच या ठीकाणी दुर्ग बांधणी सुरू झाली, त्यामुळे सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १६७९*
इंग्रजांचे खांदेरीचा ताबा मिळवण्यासाठी पत्र
इंग्रजांना ज्याप्रमाणे मराठे मुंबईच्या जवळ नको होते त्याप्रमाणे त्यांना हा जंगली सिद्दी देखील नको होता. म्हणून केग्विनने मुंबईला अनुकूल तह करावा असा पाठपुरावा मुंबईला केला. केग्विनने कळवले होतेच की मराठ्यांचे पाणी आणि रसद संपत आहे तेव्हा ते कारण पुढे करून आपण तहासाठी घाई करावी व बेट मिळवण्याचा प्रयत्न करावा. या वेळीच २३ नोव्हेंबर रोजी सुरतेहून आलेले बंगाल मर्चंट व ‘Anne’ ही जहाजे ताफ्यात सामील झाली, पैकी ‘Anne’ चा उपयोग होणार होता परंतु बंगाल मर्चंट अत्यंत मोठे शिबाड असून त्याचा उपयोग तसा कमीच होता. मुंबईकरांनी २८ नोव्हेंबर रोजी पेशवा मोरोपंतांना पत्र लिहिले व बेट सोडण्याबाबत विचारले व त्यात इंग्रजांनी रसद पाण्याची परिस्थिती कळवली तेव्हा मोरोपंतांनी आपण बेट कधीही सोडणार नाही व इंग्रजांना मिळालेली माहिती चुकीची असून आमचे सैन्य व्यवस्थित आहे व ते युद्धासाठी तयार आहे असे कळवले. याने इंग्रज आता अगदीच जेरीस आले आणि त्यांनी सुरतेला तहासाठी काय करावे याचे विचार मागितले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १७०३*
औरंगजेब राजगडाच्या पायथ्याशी पोहचला
सन १७०३ मध्ये मोगली सेनेने राजगडास वेढा घातला त्यावेळी मोगली सेनेबरोबर स्वता औरंगजेबही होता. राजगडाच्या पायथ्याशी पोहोचण्यास मोगली सेनेस प्रचंड कष्ट लागले याचे वर्णन साकी मुस्तैदखानाने पुढीलप्रमाणे केले आहे, साकी मुस्तैदरखाव हा त्यावेळी औरंगजेबसोबत होता. १०नोव्हेंबर १७०३ राजगड जिंकण्यास सिंहगडावरून निघाले, राजगडचा पायथा गाठण्यास मोगलांना प्रचंड कष्ट पडले. घाट रस्ता, भयंकर चढ उतार यामुळे तोफांची वाहतूक करण्यास मोगली सैन्यास कष्ट पडले. २८ नोव्हेंबर १७०३ रोजी, म्हणजे तब्बल १८ दिवसांनी तो राजगडास पोहचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १७५३*
हिंदवी स्वराज्याची एकमेव महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १७८०*
इंग्रजांचा वसईवर हल्ला 
१७८० मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यात सुरुवात केली. त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता. सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. समुद्रमार्ग आणि भूमार्ग या दोन्ही बाजुंनी किल्ल्यावर हल्ला करायचे सिद्ध झाले. कर्नल हार्टले कल्याणवरून हल्ला करणार होता. तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता. वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून शत्रूला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली होती. नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या आठ कि.मी. गोखरावा या गावी धाडले. २३ ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे, भवानी शिवराम यांची फौज तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली.

खजिना पण रिता झाला होता. लोक गावे सोडून गेले होत. गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. २८ नोव्हेंबरला तोफांची गोळीबारी सुरू झाली. मराठ्यांनी सुद्धा बुरुजावरून गोळीबारी सुरु केली. इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १८९०*
महात्मा जोतिबा फुले यांचा मृत्यू
(जन्म : ११ एप्रिल १८२७).
भारतातील मुलींची पहली शाळा सुरु करणारे, भारतीय स्त्रीयां व बहुजन समाजाचे उद्धारक महात्मा जोतिबा फुले  यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.

महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
इ.स. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ नोव्हेंबर १९६७*
स्मृतिदिन सेनापती बापट
(जन्म - १२ नोव्हेंबर)
स्वदेशी 'बॉम्ब'विद्येचे जनक, सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट ह्यांची आज पुण्यतिथी !
त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकऱ्यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला.त्यामध्ये महाराष्ट्रातील जे शेकडो सत्याग्रही सामील झाले त्यांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे ‘सेनापती बापट’ या शब्दावलीने ते ओळखले जाऊ लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४