*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १६५८*
छत्रपती शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १६७९*
मराठ्यांनी खांदेरी बेटाच्या सर्वात उंच टेकडीवर एक पांढरा ध्वज फडकावला. इंग्रज व सिद्दी या दोघांनी ते पहिले सिद्दी थळच्या जवळ नांगरून होता तर इंग्रज नागावच्या खाडीजवळ नांगरून होते. त्यांना वाटले की ही शरणागतीची खून आहे म्हणून दोघांनी दोन छोटे मचवे वेगवेगळ्या वेळी बेटाकडे पाठवले. इंग्रजांना मराठ्यांनी काहीच उत्तर दिले नाही व त्या माच्याकडे दुर्लक्ष केले. इंग्रजांनी मग मराठ्यांना परिचित असणारा सार्जंट कली या डच माणसाला मराठ्यांकडे पाठवले. मराठ्यांनी त्याला सांगितले की ही सांकेतिक खूण आमच्या किनाऱ्यावरील माणसांकरिता आहे तेव्हा आपण जावे. कलीने या वेळी आपण मायनाक भंडारींसाठी मुंबईहून एक पत्र आणले आहे व त्याने ते येऊन घेऊन जावे असा एक निरोप दिला यावर मराठ्यांनी त्याला ते आणून द्यावे असे सांगितले व मायनाकही त्याला उत्तर देईल असे सांगितले. त्यांने कलीला हे देखील सांगितले की तुम्ही बारा महिने इथे ताल देऊन राहिले तरी आम्ही इथून हलणार नाही कारण आम्हाला तसा हुकुम आहे. कली तेथून निघुन गेला. त्याने सांगितलेले पत्र कधी आलेच नाही. सिद्द्याची माणसे गेली असता मराठ्यांनी त्यांना अपमानित करून हाकलले व जाणार नसल्यास तोफ डागू असे सांगितले, तसे सिद्दी लोक निघुन गेले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १६८१*
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर बादशहा औरंगजेबवर दहशत राखण्यासाठी मराठा फौजांनी अहमदनगरच्या किल्ल्याभोवती छापे घातले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १६८५*
औरंगजेबाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्या काळात स्वराज्यातील देशमुखांना सांभाळणे महत्वाचे होते. त्यामुळे संभाजीराजेंनी देशमुखांशी चांगले संबध ठेवले होते. देशमुखांना आपल्या भागातील जमीन कसणारी कुळे फुटू न देता ती गावी स्थिर कशी राहतील हे पाहावे लागे. वाई प्रांताचा देशाधिकारी अंताजी सबदेव हा तेथील मूलखाचा तहरह लावणी संचणी तेथील देशमुखांच्या मताने करत नव्हता. त्यामुळे रयतेलाही दिलासा मिळत नव्हता. त्यामुळे संभाजीराजेंनी अंताजी सबदेवला पत्र पाठवून जो तहरह करणे तो देशमुखांच्या मताने करत जाणे, गैरफायद्याची गोष्ट करु नये असे लिहिले होते. यावरून शंभुराजे देशमुखांना नाराज न करता शेतीचेही नुकसान न होण्याची काळजी घेताना दिसतात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १६९३*
विक्रमदळ्ळी येथे झालेल्या पराभवानंतर संताजी व अमृतराव निंबाळकर यांनी सैन्याच्या २ तुकड्या करून अमृतराव वऱ्हाडच्या बाजूस व संताजी हैद्राबादकडे याप्रमाणे मोगली मुलखातून चौथाई वसूल करीत असतांना २१ नोव्हेंबर १६९३ रोजी मालखेड जवळ संताजी व हिम्मतखान यांची पुन्हा गाठ पडून लढाई झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १७५३*
मुगल बादशाह आणि मराठ्यांच्यात झालेल्या करारानुसार सर्वप्रथम मराठा मित्र जाट राजा सुरमजलवर आक्रमणाची योजना झाली, सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर ४००० सैनिक आणि दिवाण गंगाधर चंद्रचूडला सोबत घेऊन जाटांच्या प्रदेशांमधून २१ नोव्हेंबर १७५३ ला दिल्लीला पोहोचले आणि किशनदास तलावावर डेरे दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १७६३*
छ्त्रपती शिवरायांच्या हाताचा ठसा व पायाचा ठसा
सिंधुदुर्ग किल्याचे बांधकाम चालू असताना छ्त्रपती शिवाजी महाराज स्वत:किल्याची पाहणी करण्यासाठी आले असताना चुकुन त्यांचा पायचूनखडीच्या ओल्या मिश्रणावर पडला. त्यातून बाजूला होताना महाराजांनी भिंतीचा आधार घेतला, पण भिंत नुकतीच बनविली असल्याने ती सुद्धा ओलीचं होती. बांधकाम करणार्या अभियंत्याने त्यांच्या पायाचे व हाताचे निशाण न मिटविता अत्यंत हुशारीने चुनखडीच्या मिश्रणाचा तेवढाच भाग उचलून हा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे.
प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर डाव्या बाजूस असणार्या पायर्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात. त्यातील खालच्या घुमटीत महाराज्यांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे. त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या. २१ नोव्हेंबर १७६३ ला महाराणी ताराबाई आणि छत्रपती राजाराम यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात या ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती.

श्री  शंभू प्रा ||

        श्री मन्माहाराज मातुश्री ------- आईसाहेब याणी चिरंजीव राजश्री येसाजी सिंदे सुभेदार यासी आज्ञा केली केली यैसीजे. सु|| आर्बा सितैन मया व अलफ. तुम्ही विनंतीपत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण जाहला. साहेबाची आज्ञा घेऊन निघालो ते गुरुवारी तडीस राहोन जंजिरातील कारभारी व नाइकवडी भृगुवारी येऊन जंजिरा घेऊन गेले म्हणोन लिहिले. त्यावरून संतोष जाहला. फिरंगी गोमंतकाहून आरमारसुद्धा येऊन जंजिरासी मातवर युध केले. साहेबाच्या सेवक लोकींही त्याचा मार सोसून आपणाकडील जंजिराकडील तोफानी मारगिरी करून पाचच्यारसेहे फिरंगी मारून नेस्तनाबूद केला. तन्मुले फिरंगी कांही लबडी (?) मार न सोसे यास्तव हतधैर्य होत्साता पलायेन संपादिले जंजिऱ्याच्या लोकास येश आले. मदुर्मिची सर्त जाहली. असा आकस्मात दंगा कधीही न जाहला. आणि या प्रमाणेंं गलिमाचे पारिपत्येही केले नाही. साहेबी दोनी हजार स्वर व पाच हजार हशम तयार करून खासा स्वारी सित्ध जाहाली. तो भवानजी कदम यासमागमे किलाची खुशालीची विनंती पत्रे आली. त्यावरून स्वारी तहकुब जाहली. पुढे फौजे रवाना केली आहे ती ही येऊन पावली असल. तीर्थरूप कैलासवासी माहाराज राजश्री-छेत्रपती याचा हात (?) जंजिरा आहे त्याजवरी गची व कोनाडा बांधोन नैव्यद्य व पूजा चाले सारिखी करणे. याविसी अंतर न करणे जाणिजे र|| छ १५ माहे जमादिलावल लेखन सीमा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर १८५३*
लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने घोषणा केली. लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ नोव्हेंबर इ.स.१९५६*
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांचे बलिदान
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४