आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १६७९*
शंभूराजेंना घेऊन दिलेरखानाची नवी खेळी...!
अत्यंत घातकी व क्रुरकर्मा दिलेरखानाने विजापुरच्या वेढा घालून विजापूरच्या नाड्या करकचुन आवळल्या. राजकारणात माहीर असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी दिलेरखानाची खोड चांगलीच सोडायचे ठरविले. विजापूरला वेढा घालून बसलेल्या दिलेरखानास शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या दक्षिण सुभ्यात जबरदस्त उठावणी करुन मुघलांनी "दे माय धरणी ठाय" करून सोडले. दक्षिणचा सुभेदार शहजादा मुअज्जम औरंगाबादेस असतांना सुध्दा त्याची कोणतीही पर्वा न करता छत्रपती शिवरायांनी औरंगाबादपासुन (संभाजीनगर) अवघ्या ६४ कि.मी. वरील अत्यंत सम्रृद्ध व संपन्न व्यापारी पेठला अत्यंत त्वरेने हल्ला करून सतत ४ दिवस खणत्या लावुन लुटले. ही बातमी समजल्यावर दिलेरखान विजापुर किल्ला काबीज करने जमत नाही हे पाहून दुय्यम सरदाराला विजापूरचा वेढा कायम ठेवुन संभाजी महाराजांना आघाडीवर ठेवून मराठ्यांचा मिरज-पन्हाळा हा प्रदेश जिंकून घेण्यासाठी कुच केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १६७९*
पठाण बहलोलखान मरण पावला होता. त्यामुळे आता 'सिद्दी मसूद' हा आदिलशहाचा वजीर होता. याच मसूदने (जौहरचा जावई) पूर्वी महाराजांना विशाळगडच्या वाटेवर पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. परंतु आता हाच मसूद दिलेरला प्रचंड घाबरला अन् त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मदतीची साद घातली. आदिलशहाने महाराजांनी आजपर्यंत घेतलेल्या शाही मुलखाला ‘अधिकृत' परवानगीच देऊन टाकली. महाराजांच्या दक्षिणी पंथाच्या एकजुटीतला' दुसरा महत्त्वाचा दुवादेखील आज साध्य झाला. महाराजांनी आदिलशहाला निर्धास्त राहायला सांगितले आणि त्यांनी गनिमीकाव्याने दिलेरची अक्षरशः लांडगेतोड सुरू केली. शेवटी विजापूरचा नाद सोडून दि. १४ नोव्हेंबर १६७९ रोजी दिलेरच्या फौजा तिकोट्याच्या रोखाने वळल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १६८३*
कर्नाटक प्रांतात म्हैसूरकर चिक्कदेवराय हा प्रबळ सत्ताधीश होता. त्याने मदुरेच्या राज्याचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला होता. चिक्कदेवरायाने त्रिचनापल्ली घेतली असती तर मराठ्यांच्या जिंजी आणि तंजावरला धोका निर्माण झाला असता, म्हणून चिक्कदेवरायला आवर घालण्यासाठी संभाजीराजेंनी म्हैसूर राज्यात स्वारी करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इक्केरीचा नायक आणि कुतुबशहाशी तह केला आणि त्यांच्या साहाय्याने म्हैसूरवर आक्रमण केले. या लढाईत शंभुराजेंनी आपल्या बाजूला बसप्पा नायक, कुतुबशहा, एकोजीराजे, हरजीराजे एवढे सेनानी एकत्र केले व म्हैसूरकर चिक्कदेवरायाला एकटे पाडले, त्यामुळे त्याला मुघलांची मदत मागावी लागली. पण ती मदत येईपर्यंत मराठ्यांनी बराचसा मुलुख काबीज केला होता. पुढे बेदनुरच्या राणीनेही मराठ्यांना सहाय्य केले. त्यामुळे मराठ्याविरोधात आपला टिकाव लागत नाही हे पाहून त्याने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरू करून खंडणी देण्याचे कबूल केले. चिक्कदेवराय तह करणार असल्याची बातमी देणारे पत्र कुडालोर येथून फोर्ट सेंट जॉर्जला पाठवण्यात आले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १६९३*
संताजी विजापूरकडील मोगली प्रदेशात असतांना त्यांच्या पाठावर बादशहाने ताबडतोब हिम्मतखानास पाठवले.
माणगावजवळ संताजी व खान यांची गाठ पडली. हिम्मतखानाच्या मदतीस आणखी मोगल सरदार येऊन मिळाले. विक्रमदली जवळ लढाई होऊन संताजींचा पराभव झाला. यावेळी अमृतराव निंबाळकर हे संताजी सोबत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १७०३*
कोकणचे सुभेदार कृष्णाजी अनंत यांना व्हिसेरेईने पाठविलेले पत्र!
"मेलुंदी (सिंधुदुर्ग) बंदरात आणि खांदेरी बेटालगत आमच्या लोकांवर हल्ले होऊन त्यांची चीजवस्तू लुटली गेली. ती लुट आम्हाला परत मिळाली पाहिजे व ह्या प्रकाराला जबाबदार असलेल्या, अधिकाऱ्यांची आणि सुभेदारांची डोकी उडविली पाहीजेत". व्हिसेरेईने वरिल पत्र कोकणचे सुभेदार क्रुष्णाजी अनंत यांना पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १७३४*
बाजीरावाचे सुभानजी शिंदे यास खरमरीत पत्र
बाजीराव पेशव्यांची जरब जरब म्हणजे काय असायचं ते आपल्याला बाजीरावांच्या जंजिरा स्वारीनंतर एका प्रसंगात दिसून येतं. बाजी भिवराव रेठरेकरांना छत्रपती शाहू महाराजांनी गोवळकोटला जायला सांगितल्याने त्यांच्या बदली बाजीरावांनी बाणकोटवर नामजाद म्हणून सुभानजी शिंदे यांची नेमणूक केली. पण शिंद्यांकडून हवी तशी कामगिरी होत नव्हती आणि सिद्दीवरही जरब बसत नव्हती. यामुळे नारो बल्लाळ, धोंडजी नाईक बने वगैरे इतर सरदारांनी बाजीरावांना पत्रं लिहून सुभानजींना इथून काढा त्याशिवाय लोकांवर दबाव राहणार नाही असं कळवलं. यानंतर सुवर्णदुर्गाहून सरखेल संभाजी आंग्र्यांतर्फे हरजी नाईक कदम आणि बाजीरावांतर्फे सुभानजी शिंदे हब्श्याच्या मुलुखातून वसूल करत होते. यावेळी हरजी नाईक हे पूर्ण वसूल घेत होते, पण सुभानजी शिंदे मात्र वसुल मिळाला तर मिळाला, नाहीतर अर्धाच घ्यायचा अशा पद्धतीने काम करत होते. बाजीरावांना हे जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी दि. १४ नोव्हेंबर १७३४ रोजी सुभानजी शिंदे यांना एक खरमरीत पत्र लिहून खरडपट्टी काढली. बाजीराव लिहितात, "सुवर्णदुर्गकरी दुतर्फा वसूल केलसी वेसवीचा घेतात आणि तुम्ही हबसीयाकडील वसूल जुजबी घेता म्हणोन कलो आले. यैशास त्यांणी शेर घेतलीया तुम्हीही सेर घ्यावा. जे सुवर्णदुर्गाकरी घेतील ते तुम्ही घेणे. गई न करणे. तुम्हांस काम रेटत नसेल ते चिरंजीव राजश्री आपा यास लेहून पाठविणे. ते आणखी लोक पाठवितील. तुम्हांजवल बारासे माणोस असोन तुम्ही त्यास वदता हे गोष्ट अपूर्व आहे. सिपायेगिरी कैशास करिता? रांडा जाहले असतेत तरी कामास येते. तुम्ही त्यास दबाल तरी परिछिन तुमचा मुलाहिजा होणार नाही". बाजीराव इथे म्हणतात की तुम्हाला जमत नसल्यास चिमाजीअप्पांना स्पष्ट सांगा, ते आणखी कुमक पाठवतील. पण तुमच्याकडे बाराशे माणसं असूनही तुम्ही शत्रूला घाबरत असाल तर उपयोग काय? मग शिपाईगिरी करता तरी कशाला? जर यापुढे तुम्ही शत्रूला दबून राहिलात तर तुमची काही खैर नाही. हे सगळं वाचल्यावर सुभानजींची बोबडी वळाली असेल निश्चितच. कारण, यानंतर केवळ ४ दिवसात चिमाजीअप्पांनी सुभानजी शिंद्यांना पत्रं लिहिलं आहे, त्यात स्पष्ट दिसतं की श्रीवर्धनकडे जाताना सिद्दीची अचानक धाड आली. यावेळी सुभानजी शिंद्यांनी उत्तम प्रकारे प्रतिकार करून सिद्दीची दोन माणसं मारली आणि एक जिवंत पकडला. शिवाय धान्याच्या पंधरा गोण्या आणि बैलही जप्त केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १७८४*
महादजी शिंदे आणि शहाआलम यांची भेट
पानिपत झाले मराठे पडले आणि मराठा स्वराज्याला उतरती कळा सुरु झाली आणि मग तिथून पुढे इंग्रजांचे अंमल भारतावर चालू झाले, मुळात पानिपतानंतरच मराठ्यांनी जी गरुड भरारी घेतली त्याला इतिहासात तोड नाही.
हिंदुस्थानचा पाटील म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या अलिजाबहाद्दर महादजी शिंदे यांच्या जीवावर मराठा स्वराज्याची गरुड भरारी म्हणायला हरकत नाही.
१७८४च्या ऑक्टोबर महिन्यात, ग्वाल्हेरहून आग्रा येथे महादजी शिंदे आले, तेव्हा मोगल सरदार अफरासियाबखान याने त्यांचे वीरोचीत स्वागत केले. पण हे मुह्हमद बेग हमदानी या मोगल अधिकाऱ्यास आजीबात सहन झाले नाही. त्याने अफरासियाब खान याची ३ नोव्हेंबर रोजी हत्या घडवून आणली. यामुळे मराठे सावध झाले शिंद्यांचा सरदार अम्बुजी इंगळे यांनी हमदानीवर आक्रमण केले. व त्याला पकडून आग्र्याचा किल्ल्यात अतिशय कडक बंदोबस्तात कैदेत डांबले.
महादजीच्या आग्रा आगमनाचे वृत्त कळताच, मोगल सम्राट शहाआलं खुद्द जातीने दिल्लीहून आग्रा येथे आला. शहाआलम आणि महादजी यांची फत्तेपूर सिक्री येथे १४ नोव्हेंबर १७८४ आतिशय थाटात भेट झाली. यावेळी महादजी यांनी १२१ सुवर्ण मोहरा शहाआलम यास नजर केल्या काही दिवसांनी शहा आलम आणि महादजी शिंदे राजधानी दिल्ली वापस आले बादशहाणे महादजीला वकील-इ-मुतालिक (साम्राज्याचा सर्व श्रेष्ठ प्रशासकीय अधिकारी) या पदावर नेमले..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ नोव्हेंबर १७९४*
सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या २२७ वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८१ (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment