कार्तिक स्वामी

फक्त दर्शनाने शक्य होईल....
मानवाला अथक परिश्रम करुनही मनाजोगे लक्ष्मी प्राप्त होत नाही. परंतु कार्तिक स्वामी ही एकमेव अशी देवता आहे की, त्यांचे वर्षातून एकदाच दर्शन घेतल्याने आपली गरीबी नष्ट होवून लक्ष्मी प्राप्त होते.

कार्तिक स्वामी हे शिवपार्वतीचे मोठे पूत्र व भगवान गणेशाचे बंधू आहेत. महाराष्ट्रात त्यांना कार्तिक स्वामी व सहा तोंडे असल्याने षन्मुखानंद व कर्नाटकात षडानन म्हणून ओळखले जाते.

 देशामध्ये स्वामीचे दुर्मिळ मंदीर असून कर्नाटकात सांडूर व महाराष्ट्रात पुणे येथे पर्वती, नाशिक, कोल्हापूर, कसबा संगमेश्र्वर, चिपळून येथे मंदिरे आहेत पण हे सर्व मंदिरे मानवनिर्मित आहेत.

 18 पुराणापैकी स्कंद पुराणातील उल्लेखाप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राने नरोणा या क्षेत्री मंदिराची निर्मिती केली असून प्रत्यक्ष अनेक देवांसह कार्तिक स्वामीचे वास्तव्य याठिकाणी होते. म्हणून अशा पवित्र तिर्थक्षेत्री अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. पण हे पवित्र क्षेत्र प्रसिद्धी पासून दूर असल्याने अनेक भक्तांना याची माहिती नाही. कार्तिक स्वामींच्या दर्शनाने माणसाचे #दारिद्र्य नष्ट होवून तो #ऐश्र्वर्यसंपन्न होतो. नौकरीत बढती मिळते, संपत्ती प्राप्त होते, लग्नाची समस्या सुटते, राजकीय क्षेत्रात सत्ता मिळते. माधवराव पेशवे यांनी आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी पुणे येथील पर्वतीवर कार्तिक स्वामीचे मंदिर बांधले आहे.

कार्तिक स्वामींचे कार्तिक महिन्यात #कृतिका नक्षत्राच्या वेळेतच वर्षातून एकदाच दर्शन घेतल्याने भक्तांना लाभ मिळतो. पण वर्षभरच त्यांचा कृपाशिर्वाद पाठीशी असतो. महाराष्ट्रात कार्तिक पौर्णिमा सोडून इतर वेळी महिला स्वामींचे दर्शन घेत नाही. पण कृतिका नक्षत्राच्या दिवशी महिलांनाही दर्शन घेता येते. दर्शनावेळी भाविकांनी दर्भ, तिर्थ, जानवे, मोराचे पीस, धुप, गोपीचंद, रुद्राक्ष माळ, पाण्याने भरलेला कमंडलु, पांढऱ्या फुलाचा हार, पेढे यापैकी जे कांही मिळेल ते घेवून यावे.

पुराणातील उल्लेखानुसार प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. रावण हा शिवभक्त व ब्राह्मण होता. या ब्रह्मत्त्येच्या मुक्तीसाठी व मानवाच्या कल्याणासाठी आपल्या गुरुच्या आदेशानुसार तत्कालीन चिमनापूर या दंडकारण्यात भारतीय खंडात फार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते व तिथे आठ तिर्थ निर्माण करुन देशातील पवित्र नद्याचे पाणी आपल्या मंत्र सामर्थ्याने आणले व महादेवाची उपासना केली. यावेळी प्रत्यक्ष आई तुळजाभवानी, लक्ष्मी, सरस्वतीसह कार्तिक स्वामीही या क्षेत्री उपस्थित राहून रावणाच्या आत्म्याला शांती मिळवून दिली व प्रभू श्रीरामचंद्रालाही या ब्रह्म हत्त्येतून मुक्त केले ते क्षेत्र म्हणजे आजचे नरोणा.

निसर्गरम्य अशा परिसरात नरोणा येथून अवघ्या एक किलोमीटर लांबीवर असलेल्या क्षेमलिंगेश्र्वर या क्षेत्री भव्य असे शिवमंदीर असून या परिसरात 8 पाण्याचे मोठे कुंड असून शिवमंदिरासमोरील कार्तिक तिर्थ कुंडात पाण्यामध्येच कार्तिक स्वामींचे भव्य मंदीर आहे. स्वामीची पूर्वाभूमिक नैसर्गिक मूर्ती आहे. त्यांच्या डोक्यावर मल्लिकार्जून मंदिर आहे. तसेच रामतिर्थ, लक्ष्मी तिर्थ, सरस्वती तिर्थ, भवानी तिर्थ, नरसिंह तिर्थ, रुद्रतिर्थ, सत्पऋषी तिर्थ असे आठ जलकुंड असून यात स्नान करुन भक्तांनी दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते व मनोकामना पूर्ण होते. तसेच येथे विर हनुमान, गणेश मंदिर, सत्पऋषी पादुका कट्टा, अक्कमहादेवी मंदीर पाहण्यासारखे आहे. संपूर्ण मंदिराचे परिसर पाण्याखाली असून निसर्गाचा अद्‌भूत चमत्कार असून भक्तांना क्षणभर आपण कोकणात आल्याचा भास होतो. नैसर्गिक आणि धार्मिक गंगोलीचा अनमोल संगम म्हणजे नरोणा. महाराष्ट्रातील-कर्नाटक सिमेलगत असलेल्या आळंद तालुक्यात नरोणा हे गाव आहे.

 सोलापूर, अक्कलकोट पासून आळंदहून गाणगापूर-गुलबर्गा रोडवर कडगंची पाटी लागते. तेथून डावीकडे 10 किलोमीटर अंतरावर नरोणा तिर्थक्षेत्र असून गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ घेता येतो. रेल्वेने सोलापूर-गुलबर्गा पर्यंत येवून बसने कडगंची पाटीला उतरून नरोण्याला जाता येते. भक्तांना येथे राहण्याची व प्रसादाची वर्षभर मोफत व्यवस्था आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४