१५ मे १६७७छत्रपती शिवाजी महाराज पोपोलमवरुन जिंजीकडे रवाना.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१५ मे १६६६
रामसिंगाने जामीनाबाबत छत्रपती शिवाजीराजांना सांगितले. १५ मे रोजी सकाळीच शिवाजीमहाराज शुचिर्भूत होऊन रामसिंगाच्या डेऱ्यात आले आणि महादेवाची पूजा करून त्यांनी त्यावरील बेल-तुळशी हातात घेऊन रामसिंगाला वचन दिले की, 'मी आग्रा सोडून जाणार नाही किंवा काही बिघाडही करणार नाही!'
त्याप्रमाणे रामसिंगाने त्याच्या लेखनिकास जामीनपत्र लिहिण्यास सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळच्या दरबारात हे जामीनपत्र घेऊन रामसिंग गेला. घुसलखान्यात त्याने ते मीरबक्षी अमीनखानाच्या स्वाधीन केले. अमीनखानाने ते औरंगजेब बादशहाला सुपूर्द केले.
यामुळे आता शिवाजीमहाराज रामसिंगाच्या नैतिक बंधनात अडकले. जोपर्यंत हा जामीन कायम होता तोपर्यंत काही शिवाजीराजे आग्र्यातुन सुटणार नव्हते. औरंगजेबाने धुर्तपणे ही खेळी केली. शस्त्र न चालवता, शह काटशह, डाव प्रतिडाव खेळण्यास दोन्ही बाजुंनी सुरुवात झाली होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१५ मे १६७७
छत्रपती शिवाजी महाराज पोपोलमवरुन जिंजीकडे रवाना.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१५ मे १७३१
छत्रपती शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाऊन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे सात्वन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१५ मे १७३७
पोर्तुगीजांनी किल्ले धारावीवर जोरदार हल्ला केला
मराठा सरदारांच्या या अभिप्रायानंतर चिमाजीअप्पांच्या फौजेने त्वरीत सन १७३७ च्या मध्यात "धारावी" हे ठाणे हस्तगत केले.
"नारायणजी नाईक व गोपाळजी व पाचशे मनुष्ये धारावीस जाऊन बसली."
धारावी मराठ्यांनी घेतली हे कळताच पोर्तुगीजांनी दिनांक १५ मे सन १७३७ रोजी आठशे सैन्यासह जोरदार हल्ला केला. वर नमुद केल्यानुसार वसई हे समोरच असल्याने पोर्तुगीजांना रसद पुरवठ्यास कोणताच अडथळा आला नाही. मराठ्यांनी जोरदार प्रतीकार केला परंतु अखेर मराठ्यांना माघार घ्यावी लागली. या समरात अणजूरकर नाईकांनी मोठा पराक्रम केला. मात्र अणजूरकरांकडील लोक मोठ्यासंख्येने धारातिर्थी पडले. मराठ्यांनी माघार घेतली परंतु ते जवळपासच्याच भागात दडून राहीले
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१५ मे १७३७
मनोर (अशेरीगड) किल्ल्याला वेढा
मराठ्यांनी तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१५ मे १८६९
कोल्हापूरच्या चिमाजी महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे.
१८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला होता त्या उठावाचे हिरो होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब !!!
२६ डिसेंबर १८३० साली बुवासाहेब महाराज आणि आनंदीबाई यांच्या पोटी शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचा जन्म झाला. तर बुवासाहेब महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी शाहू उर्फ चिमासाहेब महाराजांचा जन्म झाला.
१५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांच निधन झालं. लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांनी स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. आजही कराचीमध्ये ती समाधी आहे.
कोल्हापूरच्या रक्तात ज्यांनी क्रांतीची बीजे पेरली त्या महाराजांनी ती समाधी !!!
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment