१७ मे १७१५मराठ्यांनी निरनिराळ्या युद्धात वापरलेले घोडदळइ.स. १७१५ मध्ये कान्होजी भोसले या मराठा सरदाराने चंद्रपूरच्या युद्धात वापरलेल्या घोडदळाचा उल्लेख मिळतो तो याप्रमाणे, "१७ मे, १७१५ रोजी, जयपूरचा राजा जयसिंगाने पिलसूदच्या लढाईमध्ये कान्होजी भोसल्यांचा पराभव केला. त्यामुळे कान्होजींनी आपला उत्तरेतील मार्ग आडलेला पाहून चंद्रपूर प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून सहा हजार घोडेस्वारांनिशी चंद्रपूरवर आक्रमण केले. चंद्रपूरचा पराभव करून अर्धे राज्य हस्तगत केले. छत्रपती शाहू महाराजांना एक हत्ती नजराणा म्हणून पाठवून कान्होजी उत्तरेकडे वळले."
🚩 आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष 🚩
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
१७ मे १६६६
शब्दांनी उधळून लावलेले औरंगजेबाचे कारस्थान
शिवाजीराजांना घेऊन काबूलच्या स्वारीवर जाण्याची तयारी रामसिंह करीत होता. बादशाहाचा लाडका क्रूर सरदार शुजाअतखान हा आपल्याबरोबर येणार आहे याचा धसका रामसिंहाला होताच. कूच करण्यास अजून पाच-सात दिवस लागणार होते. महाराज स्वत: या औरंगजेबी डावामुळे अस्वस्थ होते. त्यांनी एक वेगळेच रान यावेळी उठविले. कोणते ?
महाराजांकडे रोज दिवसातून अनेकदा शाही सरदारमंडळी भेटावयास यायची. आजपर्यंत (दि. १७ मे १६६६ ) महाराज या सरदारांशी छान हसून, गोडीने बोलायचे. पण काबूलच्या वातेर्ने चिडलेले महाराज, काबूलचा विषय न काढता या येणाऱ्या सरदारांशी औरंगजेबाबद्दल सरळसरळ टीकात्मक बोलावयास लागले. त्यात चीड होती. राजांचा आशय असा होता, ‘ बादशाहांच्या वतीने केवढी वचने दिली. पण इथे आल्यापासून तुमचे बादशाह आमचा सतत अपमानच करीत आहेत. आम्हाला दिलेल्या वचनांचं काय ? हाच शाही रितरिवाज आहे काय ? शब्दांची किंमत नाही ? आम्ही उघडउघड फसलो आहोत. हे बादशाही प्रतिष्ठेला शोभतं का ?’
भेटीस येणाऱ्या सरदारमंडळींशी हे असंच रोज अन् सतत महाराज वैतागून बोलत होते. ते सरदारही चकीत होत होते कारण अतिशय खानदानी नम्रतेने गोड बोलणारे महाराज बादशाहाबद्दलच वैतागून बोलताना पाहून त्यांना धक्काच बसत होता. बादशाहाबद्दल असं गुपचूप बोलण्याचं धाडसही कुणी करीत नसे. इथे तर महाराजांनी ती आघाडीच उघडली. या सर्व गोष्टींचा वृत्तांत हेच सरदारलोक बादशाहाला भेटून सांगत होते. आपल्याच विरुद्ध ऐन आग्ऱ्यात आपल्याच सरदारांना हा सीवा बिघडवतो आहे अशी भीती बादशाहालाच वाटायला लागली. हे सरदार बादशाहाच्याच हुकुमावरून महाराजांना भेटत होते. यातून बादशाहाच गोंधळला. कारण साऱ्या दरबारी लोकांत हा उघडउघड बादशाहाविरोधी प्रचार धुमसू लागला. बादशाहाला अशीही भीती वाटू लागली की, खैबरखिंडीकडील प्रवासमार्गावर कदाचित हे विरोधी प्रचाराचे भडक बंड अधिकच मोकाट सुटेल. खैबरखिंडीपर्यंत तरी या शिवाजीचा मुडदा पाडता येणार नाही. तोपर्यंत प्रचाराचा वणवा जनतेत पसरेल. त्यातून पुन्हा शाहजादा शुजा याचीही लटकती धास्ती बादशाहाच्या डोक्यावर होतीच. काय करावे ते त्याला कळेना. ‘ वचने देऊन बादशाहाने मला आग्ऱ्यात आणले. ही वचने मिर्झाराजांच्यामार्फत मला दिली गेली आणि आता माझी साफ साफ फसवणूक केली जात आहे. हे बादशाहांना शोभतं का ?’ हा महाराजांचा मुद्दा असंख्य कानांमनांपर्यंत रोज केवळ बेरजेने नव्हे तर गुणाकाराने पेटत चालला होता. बादशाह यामुळेच कमालीचा अस्वस्थ होता. सीवाला ताबडतोब ठार मारावे का ? अशक्य आहे. कारण राजपुताचा शब्द!
काबुलची मोहिम रद्द करावी का ? अशक्य आहे. कारण शाही प्रतिष्ठेला धक्का लागतोय. काय करावं ?
अखेर बेचैन बादशाहाने रामसिंहाला बोलावून जाब विचारला की, ‘हा सीवा, आम्ही वचने मोडली, आमचा विश्वासघात झाला असे आमच्याविरुद्ध सतत बोलतो आहे. तुमच्या वडिलांनी सीवाला वचने तरी कोणची दिली होती‘
रामसिंहाला त्याचे उत्तरही देता येईना. महाराज स्वत:ही वचनांचा तपशील सांगेनात. प्रचाराचा प्रचंड कांगावखोर कल्लोळ महाराजांनी शाही सरदारांच्या समोर चालूच ठेवला होता. बादशाहाच्या भोवती गांधील माश्यांचं मोहोळ उठलं होतं.
अखेर बादशाहाने उसने अवसान आणून रामसिंहाला असा हुकुम दिला की, ‘काबूलच्या मोहिमेवर निघण्याचा बेत आम्ही हुकुम देईपर्यंत पुढे ढकला.‘
ढकलला. किंबहुना रद्दच झाला. म्हणजेच महाराजांना बेमालूमरित्या खैबरखिंडीच्या आसमंतात गाठून ठार मारण्याचा शाही बेत आपोआप बारगळला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
१७ मे १७१५
मराठ्यांनी निरनिराळ्या युद्धात वापरलेले घोडदळ
इ.स. १७१५ मध्ये कान्होजी भोसले या मराठा सरदाराने चंद्रपूरच्या युद्धात वापरलेल्या घोडदळाचा उल्लेख मिळतो तो याप्रमाणे, "१७ मे, १७१५ रोजी, जयपूरचा राजा जयसिंगाने पिलसूदच्या लढाईमध्ये कान्होजी भोसल्यांचा पराभव केला. त्यामुळे कान्होजींनी आपला उत्तरेतील मार्ग आडलेला पाहून चंद्रपूर प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून सहा हजार घोडेस्वारांनिशी चंद्रपूरवर आक्रमण केले. चंद्रपूरचा पराभव करून अर्धे राज्य हस्तगत केले. छत्रपती शाहू महाराजांना एक हत्ती नजराणा म्हणून पाठवून कान्होजी उत्तरेकडे वळले."
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
१७ मे १७८२
सालबाईचा तह
हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment