संभाजीराजे (दुसरे) करवीर संस्थान"🙏🏻⚔️🚩
🚩⚔️🙏🏻"संभाजीराजे (दुसरे) करवीर संस्थान"🙏🏻⚔️🚩
छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे कर्तृत्ववान सुपुत्र, हिंदवी स्वराज्याचे पाचवे छत्रपती संभाजीराजे (दुसरे) २३ मे १६९८ रोजी त्यांचा जन्म झाला. शिवरायांनी ज्या हेतूने स्वराज्याची स्थापना केली, शंभूराजांनी, राजाराम महाराजांनी आणि ताराऊंनी ज्या हेतूने ते प्राणपणाने टिकवून ठेवले, तो हेतू , ती परंपरा, तो वारसा संभाजीराजांनी प्रभावीपणे जोपासला. शिवरायांनी सुरु केलेल्या प्रथा, राज्यकारभाराचे नियम, आदर्श हे संभाजीराजांनी पुर्णपणे अंगीकारले होते. "सार्वभौमत्व" हे मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याचे सर्वात मोठे मानचिन्ह होते. या सर्वभौमत्वासाठी लाखो वीरांनी आपले रक्त सांडले होते. स्वराज्याचे हे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचे काम राजारामपूत्र संभाजीराजे (दुसरे) यांनी केले.
सदर फोटोमधील मूर्ती ही छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची असून ती पेठ वडगांव नजिकच्या टोप-संभापूर या गावामधील छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या समाधी मंदीरामधील आहे.
Comments
Post a Comment