४ मे १६७७दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट दिली.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
४ मे १६४९
मोगलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर राजपूत छत्रसाल बुंदेला याचा जन्म.
औरंगजेबासारख्या कट्टर इस्लामी बादशहालाही शह या छत्रसालाने दिला. छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रसालाची भेटही इतिहासात झाली होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ मे १६७७
दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट दिली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ मे १७३९
वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ मे १७५८
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशे पावतो पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षी अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे –
"आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे." मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ मे १७९३
फिरंग्यानी वसई किल्ल्यावर तहाचे निशान फडकावले
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ मे १७९९
हैदरअलीचा थोरला मुलगा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment