२ आॅक्टोबर १६७०दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी छत्रपती शिवराय १५००० फौजेनिशी सुरतजवळ ५ कोस अंतरावर येऊन पोचले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ आॅक्टोबर १६७०
दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी छत्रपती शिवराय १५००० फौजेनिशी सुरतजवळ ५ कोस अंतरावर येऊन पोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ ऑक्टोबर १६७०
मोघलांच्या वतीने औरंगाबादला छावणी करून शहाजादा मुअज्जम कारभार बघत होता. पण तो शिवाजी महाराजांना फितूर असल्याची औरंगजेबाला शंका होती. म्हणून त्याने मुअज्जमला परत बोलावून त्या जागी दिलेरखानाची नेमणूक केली. या संदर्भात मुंबईकर इंग्रजांकडून सुरतेच्या इंग्रजांना पत्र गेले. 
"सुलतान मुअज्जमने शिवाजी महाराज व इतर राजे यांच्या मदतीने बापाशी लढण्याकरिता मोठे सैन्य उभारले. कित्येकांच्या मते तो औरंगजेबावर स्वारी करण्याकरिता आग्र्याला गेला. दुसरे कित्येक म्हणतात की, बापाने तह करून त्यास दख्खनचे राज्य व गुजरात प्रांत दिल्याने तो परत फिरला."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ ऑक्टोबर १८०४
२ ऑक्टोबर १८०४ मध्ये पेशव्यांनी गायकवाडांस अहमदाबादचा इजारा वार्षिक रू. ४ लाखांच्या करारान १० वर्षाच्या बोलीने दिला. त्याची वहिवाट भगवंतराव गायकवाडांस सांगितली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ आॅक्टोबर १८६९
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ आॅक्टोबर १९०४
लालबहादुर शास्त्री जयंती.
लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...