८ आॅक्टोबर १६६८"छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह झाला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ ऑक्टोबर १६५९
छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडी दाखल
खान वळवळ करत होता त्याला अटकाव करणे गरजेचे होते. त्यामुळे मनी ठाम निश्चय करूनच राजे स्वदुःख बाजूला सारून अफजल मोहीमेसाठी जावळी परिसराची पाहणी करून प्रतापगडी पूर्व तयारी करण्यासाठी दाखल झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ आॅक्टोबर १६६८
"छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ ऑक्टोबर १६७९
केग्वीन खांदेरीला पोचला
मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा. आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ ऑक्टोबर १६८३
चौलच्या वेढ्यादिवशी इंग्रजांचे पत्र
पत्रातून मुंबईकर इंग्रज लिहीतात की चौलला खंबीर वेढा पडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने जवळील एका टेकडीचा ताबा घेतला असून त्यावर मराठे मोठ्या तोफा चढवून चौलवर जबरदस्त मारा करणार आहेत. सर्वांचा असा समज आहे. की तोफांचा मारा सुरू झाल्यावर किल्ला ५ पाच दिवसांपेक्षा जास्त लढवला जाणार नाही. चौलची अवस्था अतिशय वाईट झाली असून या चौलच्या वेढ्यात पोर्तुगीज हतबल झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ ऑक्टोबर १८०४
फत्तेपुराहून कूच करून यशवंतराव मथुरेस गेले. तेथे इंग्रजांचा सरंजाम होता, तो निघून परत आग्रास आला व मथुरेस पोचल्यावर महाराज दिनांक ८ ऑक्टोबरला (१८०४) दिल्लीच्या तटबंदीखाली आले. यावेळी दिल्लीचा नामधारी बादशहा इंग्रजांचे अंकित होता. बादशहाच्या नावाचे बळ आपल्या सत्तेस जोडणे हा हेतू होता. “आपण बादशहाचे सेवक” अशा अर्थाचा नवा शिक्का यशवंतरावानी पाडला व उपयोगात आणला तो बादशहासंबंधीचा लोकादर आपल्याकडे वळावा या हेतूचा होता. दिल्लीत इंग्रजांची फौज थोडी असल्याने, दिल्ली काबीज करून बादशहास ताब्यात घेता आल्यास इंग्रजांवर कडी होईल, अशी महाराजांना आशा वाटत होती. परंतु, दिल्लीचा पाडाव करावयास यशवंतरावांना पुरेशी सवड मिळाली नाही. दिल्लीवर यशवंतरावानी बरेच लहान मोठे हल्ले करून पाहिले. दिनांक १४ ऑक्टोबरला सर्व फौजेनिशी मोठा हल्ला चढविला. हे सारे हल्ले वाया गेले आणि नवे हल्ले करावे तर इंग्रज सेनापती लांब लांब मजला मारून दिल्लीनजीक आल्याची खबर यशवंतरावांच्या कानी आली. तेव्हा त्यांनी दिल्लीचा नाद सोडला. ते यमुना ओलांडून दुआबांत घुसले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment