Posts

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१ डिसेंबर १६६१*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६१* छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६३* छत्रपती शिवरायांच्या भीतीने व दहशतीने घाबरून मुघल सरदार शाहीस्तेखान औरंगाबाद सोडून बंगालकडे रवाना झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६४* छत्रपती शिवरायांनी कोकणातील राजापूर व दाभोळ जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६७५* छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसेंबर-जानेवारीम

कार्तिक स्वामी

Image
फक्त दर्शनाने शक्य होईल.... मानवाला अथक परिश्रम करुनही मनाजोगे लक्ष्मी प्राप्त होत नाही. परंतु कार्तिक स्वामी ही एकमेव अशी देवता आहे की, त्यांचे वर्षातून एकदाच दर्शन घेतल्याने आपली गरीबी नष्ट होवून लक्ष्मी प्राप्त होते. कार्तिक स्वामी हे शिवपार्वतीचे मोठे पूत्र व भगवान गणेशाचे बंधू आहेत. महाराष्ट्रात त्यांना कार्तिक स्वामी व सहा तोंडे असल्याने षन्मुखानंद व कर्नाटकात षडानन म्हणून ओळखले जाते.  देशामध्ये स्वामीचे दुर्मिळ मंदीर असून कर्नाटकात सांडूर व महाराष्ट्रात पुणे येथे पर्वती, नाशिक, कोल्हापूर, कसबा संगमेश्र्वर, चिपळून येथे मंदिरे आहेत पण हे सर्व मंदिरे मानवनिर्मित आहेत.  18 पुराणापैकी स्कंद पुराणातील उल्लेखाप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राने नरोणा या क्षेत्री मंदिराची निर्मिती केली असून प्रत्यक्ष अनेक देवांसह कार्तिक स्वामीचे वास्तव्य याठिकाणी होते. म्हणून अशा पवित्र तिर्थक्षेत्री अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. पण हे पवित्र क्षेत्र प्रसिद्धी पासून दूर असल्याने अनेक भक्तांना याची माहिती नाही. कार्तिक स्वामींच्या दर्शनाने माणसाचे #दारिद्र्य नष्ट होवून तो #ऐश्र्वर्यस

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२८ नोव्हेंबर १६५७*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६५७* छत्रपती शिवरायांनी चौल काबिज केले. महाराज स्वत: जातीने कोकणात उतरले, ३ ओक्टोबर १६५७ रोजी महाराज कल्याणला पोहचले. कल्याण-भिवंडी एकाच दिवशी म्हणजे २४ ओक्टो १६५७ या दिवशी काबिज झाली. त्यानंतर महाराजांनी लगेचच एका महिन्याच्या आत २८ नोव्हेंबर १६५७ या दिवशी चौल काबिज केले. चौल पाठोपाठ माहूलीचा किल्ला राजांनी घेतला 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६५९* शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विशाळगड ठेवले. अफझलखान वधानंतर अवघ्या १८ दिवसांत छत्रपती शिवरायांवी "वाई" ते "कोल्हापूर" हा प्रदेश स्वराज्यात आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६७०* ३००० फौज सोबत घेऊन छत्रपती शिवरायांची दुर्ग बांधणी संदर्भात "खांदेरी" बेटाची पाहणी. पुढे लवकरच या ठीकाणी दुर्ग बांधणी सुरू झाली, त्यामुळे सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६७९* इंग्रजांचे खांदेरीचा ताबा मिळवण्यासाठी पत्र इंग्रजांना ज्याप्रमाणे मराठे मुंबईच्य

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ नोव्हेंबर १६२९* छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी, जिजाबाई यांच्या सासूबाई उमाबाईसाहेब या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते त्यांनी फक्त ३ महिनेपूर्वी वेरुळच्या घृष्नेश्वराची अभिषेकपूजा तिमनभट शेडगे यांस सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असे मानतात, तर्क आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ नोव्हेंबर १६६४* छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली. पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती. महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या. फेब्रुवारी १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती. पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते. ते असे, "शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठ

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२५ नोव्हेंबर १६५४*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ नोव्हेंबर १६५४* छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते.  उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे.  मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.  उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ नोव्हेंबर १६५९* अफजलखान मोहीम फत्ते करून रात्री छत्रपती शिवाजी महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले. ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे, म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत ये

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ नोव्हेंबर १६५६* छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला २२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मसूरवरील छापा घातला असावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ नोव्हेंबर १६६५* किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ नोव्हेंबर १६८७* गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्याती

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ नोव्हेंबर १६५८* छत्रपती शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ नोव्हेंबर १६७९* मराठ्यांनी खांदेरी बेटाच्या सर्वात उंच टेकडीवर एक पांढरा ध्वज फडकावला. इंग्रज व सिद्दी या दोघांनी ते पहिले सिद्दी थळच्या जवळ नांगरून होता तर इंग्रज नागावच्या खाडीजवळ नांगरून होते. त्यांना वाटले की ही शरणागतीची खून आहे म्हणून दोघांनी दोन छोटे मचवे वेगवेगळ्या वेळी बेटाकडे पाठवले. इंग्रजांना मराठ्यांनी काहीच उत्तर दिले नाही व त्या माच्याकडे दुर्लक्ष केले. इंग्रजांनी मग मराठ्यांना परिचित असणारा सार्जंट कली या डच माणसाला मराठ्यांकडे पाठवले. मराठ्यांनी त्याला सांगितले की ही सांकेतिक खूण आमच्या किनाऱ्यावरील माणसांकरिता आहे तेव्हा आपण जावे. कलीने या वेळी आपण मायनाक भंडारींसाठी मुंबईहून एक पत्र आणले आहे व त्याने ते येऊन घेऊन जावे असा एक निरोप दिला यावर मराठ्यांनी त्याला ते आणून द्यावे असे सांगितले व मायनाकही त्याला उत्तर देईल असे सांगितले. त्यांने कलीला हे देखील सांगितले की तुम्ही बारा महिने इथे ता