महाराणी चिमणीबाई सयाजीराव गायकवाड यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏⛳
घोड नदीच्या काठावर वसलेले इनामगाव ऐतिहासिक प्राचीन मध्ययुगीन वारसा लाभलेलं गाव. बडोद्याचे लोकहितवादी लोकराजा महाराजा सर सयाजीराव गायकवाड यांची सासुरवाडी. अनेकांना हे अपरिचित असेल पण हे सत्य आहे.महाराणी चिमणाबाई गायकवाड यांच्या वर्गणीतून इनामगावात त्यांनी प्राथमिक शाळा बांधली तसेच आजही देवासचे सरदार राजे घाटगे परिवाराचा वाडा इनामगाव मध्ये वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. The position of women in indian life ह्या इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका. ज्या काळात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत संघर्ष करावा लागत होता त्या काळात भारतीय स्त्रीयांच्या जीवनावर राणी साहेबांनी पुस्तक लिहिले.हे विशेष गौरवास्पद आहे.बडोदा संस्थानिकांच्या लोकहितवादी कार्याचा आजही गुजरात तसेच भारतात गौरव केला जातो. महाराणी चिमणीबाई सयाजीराव गायकवाड यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏⛳