२६ नोव्हेंबर १६७०बागलाणची मोहिमदुसऱ्या सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाण प्रांतावर निघाले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६२९ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी, जिजाबाई यांच्या सासूबाई उमाबाईसाहेब या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते त्यांनी फक्त ३ महिनेपूर्वी वेरुळच्या घृष्नेश्वराची अभिषेकपूजा तिमनभट शेडगे यांस सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असे मानतात, तर्क आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली. पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती. महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या. फेब्रुवारी १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती. पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते. ते असे, "शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत