१२ आॅगस्ट १६८३आदीलशाही सैनिकांनी पंचगंगा नदीपात्रावर लावलेल्या पहाऱ्यातून "छत्रपती संभाजीराजे" फकीर बाबाच्या वेशात येऊन पंचगंगा नदी पार करून गेले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१२ ऑगस्ट १३४७
बहमनी साम्राज्याची स्थापना
हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही.
दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते.
इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या सरदारांनी हसनच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध बंड केले. हा उठाव यशस्वी झाला आणि दख्खनचा प्रांत स्वतंत्र झाला. पुढे १२ ऑगस्ट १३४७ रोजी दक्षिणेला हसनने जे राज्य स्थापन केले त्याला इतर मुसलमान "ब्राह्मणाचे राज्य" म्हणत. त्या "बम्मनशाही"चे नंतर झाले बहमनशाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१२ आॅगस्ट १६८३
आदीलशाही सैनिकांनी पंचगंगा नदीपात्रावर लावलेल्या पहाऱ्यातून "छत्रपती संभाजीराजे" फकीर बाबाच्या वेशात येऊन पंचगंगा नदी पार करून गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१२ ऑगस्ट १८०३
अहमदनगरजवळचा भुईकोट किल्ला हा हुसेन निजामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे 'घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४