२ आॅगस्ट १६४८छत्रपती शिवरायांनी "शिरवळ" ठाणे ताब्यात घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ आॅगस्ट १६४८
छत्रपती शिवरायांनी "शिरवळ" ठाणे ताब्यात घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ आॅगस्ट १६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "वेलवान्सोरचा किल्ला" ताब्यात घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ ऑगस्ट १६८०
२ ऑगस्टला डिचोलीच्या मराठी सुभेदाराने बारदेश मधील सिओलीम गाव लुटले. 
५ मे १६८० दरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही छत्रपती संभाजीराजेंना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती. शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटून तेथील तीन माणसांना पकडले होते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ ऑगस्ट १६८१
सिद्दी संबळने जंजिऱ्याचा बंदोबस्त वाढविला 
सिद्दी व इंग्रजांचेही बिनसले होते. मात्र हे सिद्दी व इंग्रज दोघे सुद्धा सागरी सर्प. आपल्या भक्षासाठी सदैव त्यांचा संचार सागरात अविरत सुरू असे. अशातच सिद्दी संबळचा मुलगा सिद्दी मिस्त्री हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमारात दाखल झाला. त्यामुळे मनातून हादरलेल्या सिद्दीने जंजिऱ्याचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 

२ आॅगस्ट १७६०
२ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...