६ आॅगस्ट १६४८छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

६ आॅगस्ट १६४८
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

६ आॅगस्ट १६५७
छत्रपती शिवरायांनी अहमदनगरच्या मुघल छावणीवर हल्ला केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

६ आॅगस्ट १६५९
ठाण्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर ने गोव्याच्या प्रमुख गव्हर्नर ला मराठ्यांच्या आरमारापासून सावध राहण्याबाबतचे पत्र पाठवले.
सदर पत्राचा मराठी अनुवाद-
"शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चौल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाऊ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४