२ सप्टेंबर १६६६आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पाठलागावर गेलेल्या "कुंवर रामसिंग" यांना औरंगजेब बादशहाने "चंबळ नदी" ओलांडताच माघारी बोलवले.कारण बादशहाला भीती होती की "कुंवर रामसिंग" मराठ्यांना जाऊन मिळतील.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ सप्टेंबर १६६०
आत्ताच्या भोर तालुक्यातील आणि तत्कालिन बारा मावळातील "रोहीड खोरे" चे वतनदार आणि स्वराज्याचे इमानी सेवक "कान्होजी नाईक-जेधे" हे आजारी असल्याचे समजताच आज छत्रपती शिवरायांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणारे आपुलकीचे पत्र पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ सप्टेंबर १६६६
आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पाठलागावर गेलेल्या "कुंवर रामसिंग" यांना औरंगजेब बादशहाने "चंबळ नदी" ओलांडताच माघारी बोलवले.
कारण बादशहाला भीती होती की "कुंवर रामसिंग" मराठ्यांना जाऊन मिळतील.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ सप्टेंबर १६७९
इंग्रजांचा खांदेरी बेटावर कब्जा करण्याचा हेतू होता, पण मराठ्यांनी तटावर जोरदार बांधकाम केले आणि इंग्रजाच्या जहाजांना प्रवेश बंदी केली. त्यामुळे इंग्रजांचा मराठ्यांपुढे निभाव लागला नाही.
२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे तातडीची बैठक घेवून इंग्रजांनी ‘एनसाईन ह्युजेस’ याच्या अधिपत्याखाली सैनिकांच्या ६ तुकड्या घेऊन, तोफा बसवून ३ शिबाडे खांदेरी व भूमी यांच्या दरम्यान गस्त घालण्याकरिता पाठीवली कारण बांधकाम सुरु झाल्यापासून थळच्या किनाऱ्यापासून खांदेरीला सामानाचा पुरवठा सुरु होता. इंग्रजांचे असे ठाम मत होते की हे बेट इंग्लंडच्या राजाचे आहे व यावर मराठ्यांनी हक्क सांगू नये. ह्युजेस याला ताकीद देण्यात आली की शिवाजीच्या माणसांना शांततेने सांगावे की हे बेट इंग्लंडच्या राजाचे असून मराठ्यांनी ताबडतोप निघून जावे. ह्युजेसला मराठ्यांवर थेट हल्ला करण्याची परवानगी नव्हती. त्याप्रमाणे ह्युजेस निघाला व ४ सप्टें रोजी तो खांदेरी आणि मुख्य भूमी दरम्यान गस्त घालीत ३ शिबडे घेऊन सज्ज झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ सप्टेंबर १६८६
औरंगजेब बादशहाच्या आदेशाने मुघल सैन्याने विजापूरच्या आदिलशहाचा काही भाग जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...