सप्टेंबर १६७५छत्रपती शिवरायांनी पारमाची तर्फे(तालुका) "शिवथर" येथे "रामनगर" पेठ(रामदास पठार) वसविली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ सप्टेंबर १६६६
छत्रपती आग्र्याहून निसटले प्रकरण
पेटाऱ्यांच्या कहाणीचा पहिला उल्लेख येतो तो राजस्थानी पत्रांत. हे पत्र परकालदासचे आहे आणि ते ३ सप्टेंबर १६६६चे आहे. तो लिहितो –
दिवस चार घटका वर आला असता बातमी आली, की शिवाजी पळाला. चौक्या-पहाऱ्यांवर एक हजार माणसे होती. तो नक्की कोणत्या क्षणी पळाला आणि कोणत्या चौकीतून पार झाला. त्यावेळी कुणाचा पहारा होता, हे कोणीही सांगू शकले नाही.
तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यरां कीं आमगरफ्त भी सो पट्यारा मे बैठ निकल्यो.
मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष निघाला की, पेटाऱ्यांची ये-जा होती. त्यामुळे तो पेटाऱ्यांत बसून निघाला असावा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ सप्टेंबर १६७५
छत्रपती शिवरायांनी पारमाची तर्फे(तालुका) "शिवथर" येथे "रामनगर" पेठ(रामदास पठार) वसविली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ सप्टेंबर १६७८
छत्रपती शिवरायांच्या सांगण्यावरून संभाजीराजे परळीकडे रवाना.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ सप्टेंबर १६८०
सुरतेचे मुंबईला पत्र
छत्रपती संभाजी राजाकडे कोणाला तरी पाठवून बोलणी करण्याबद्दलच्या तुमच्या विनंतीवर आम्ही विचार केला आहे. त्यावरून असे वाटते की तुरतास तुम्हाला शक्य असेल त्या कारणाखाली तीन ते चार महिन्यांसाठी ते टाळायचा प्रयास करा. तोवर आम्हाला कंपनीकडून हेन्ड्री केन्ड्री बद्दल व सिद्दीशी कसा व्यवहार ठेवायचा त्याची कल्पना मिळेल. त्यामुळे ह्या बाबतीत तुमचे सर्वतोपरी प्रयत्न आम्हाला दिसतील असेच काम करा, ज्यामुळे आमचे समाधान होईल.
सुरतेचे मुंबईला पत्र, ३ सप्टेंबर १६८०.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ सप्टेंबर १७२०
मंगळवार रोजी कॅप्टन ब्राऊन याच्या अधिपत्याखाली मुंबईकर इंग्रजांची लंडन, व्हिक्टोरिया आणि रिव्हेंज हि लढाऊ जहाजे घेरीयाच्या (विजयदुर्ग) स्वारीवर निघाली. मिस्त वॉल्टर ब्राऊनला सर्व फौजांच्या कमांडर-इन-चीफची पदवी देऊन त्याला ‍अ‍ॅडमिरलचा हुद्दा दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ सप्टेंबर १७४९
चंदासाहेब, मुजफ्फरजंग व फ्रेंच सेनापती बुसी यांची कर्नाटकावर स्वारी
कर्नाटकातील अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे झाले. भारतातील इंग्रज व फ्रेंच अधिकाऱ्यांनी यूरोपातील तहाकडे दुर्लक्ष करून व स्थानिक नबाबांच्या भांडणांचा लाभ घेऊन आपापल्या सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात त्रिचनापल्ली, तंजावर व म्हैसूर या तीन राज्यांत गादीसंबंधी तंटे चालू होते. तंजावरमध्ये शहाजी व प्रतापसिंह भोसले यांत भांडण चालू होते. इंग्रजांनी प्रतापसिंहास गादीवर बसवून त्याजकडून देवीकोटचा किल्ला मिळविला. सफदरअली हा कर्नाटकाचा नबाब असताना त्याचा मेहुणा चंदासाहेब बऱ्याच उलाढाली करीत असे. पण रघुजी व फत्तेसिंह भोसले यांनी कर्नाटकाच्या स्वारीत त्यास कैद करून साताऱ्यास पाठविले. नंतर सफदरअलीचा खून होताच निजामुल्मुल्कने अल्पवयी नबाबास अर्काटच्या गादीवर बसविले. त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने अन्वरुद्दीनला अर्काट  येथे पाठविले. दरम्यान चंदासाहेब सुटला व मराठ्यांचा दंड देऊन या गादीवर हक्क सांगू लागला. त्याचे व फ्रेंचांचे संबंध चांगले होते. द्यूप्लेक्सने अन्वरुद्दीन व चंदासाहेब यांच्या भांडणात पडून मुलूख मिळविण्याचा प्रयत्न केला. हैदराबादच्या निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नासिरजंग व नातू मुजफ्फरजंग यांत गादीसंबंधी तंटा सुरू झाला. चंदासाहेबाने मुजफ्फरजंगास फ्रेंचांच्या मदतीचे आश्वासन दिले. इंग्रजांनी नासिरजंगाचा पक्ष घेतला. द्यूप्लेक्सने चंदासाहेबास अर्काटच्या गादीवर व मुजफ्फरजंगास हैदराबादच्या गादीवर बसविण्याचे कबूल करून त्याच्याशी तह केला. ३ सप्टेंबर १७४९ रोजी चंदासाहेब, मुजफ्फरजंग व फ्रेंच सेनापती बुसी यांनी कर्नाटकावर स्वारी केली. अंबूर येथे झालेल्या लढाईत अन्वरुद्दीन मारला गेला. त्याचा मुलगा मुहम्मद अली त्रिचनापल्लीला पळाल्याने फ्रेंचांनी ते ठिकाण घ्यावयाचे ठरविले. इंग्रजांना या गोष्टीचे परिणाम कळले असले, तरी त्यांच्यामध्ये द्यूप्लेक्सइतके सामर्थ्य नव्हते. इंग्रजांनी नासिरजंगाला फ्रेंचांचा पाडाव करण्याची विनंती केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे द्यूप्लेक्सने मुजफ्फरजंगास दक्षिणेचा सुभेदार केले. बक्षिसादाखल त्याने द्यूप्लेक्सला कृष्णेच्या दक्षिणेकडच्या मोगली प्रदेशाचा गव्हर्नर केले व आपल्या दरबारी बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ सप्टेंबर १७६३
३ सप्टेंबर १७६३ ला पेशव्यांनी औरंगाबादवर चाल केली. निजाम औरंगाबादेत कोंडला गेला. अखेरीस २५ सप्टेंबरला निजाम पेशव्यांना शरण आला आणि उदगीरचा तह कायम करून नवा २२ लक्षांचा करार झाला. या तहानुसार पूर्वीच्या उदगीरच्या लढाईतील साठ लाख आणि आताचा २२ लाख रुपये उत्पन्नाचा एकूण ८२ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुख पेशव्यांना मिळाला. या लढाईनंतर
माधवराव जिवंत असेपर्यंत निजामाने डोके जराही वर काढले नाही. यावरूनच या युद्धाची कल्पना येते. राक्षसभुवनहून जवळच असणाऱ्या पालखेड येथे पूर्वी बाजीराव पेशव्यांनी याच निजामाच्या बापाचा पराभव केला होता. आता इथेच बाजीरावांच्या नातवाने निजामाला मात दिली होती. या युद्धानंतर रघुनाथराव गोपिकाबाईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत कमी केले नाही... यांचा पुढे (होणाऱ्या) कर्तेपणाचा भरवसा आम्हास आला. सांप्रत कारभार चिरंजीवच करतात. (परंतु) आमचे मर्जीप्रमाणे वर्ततात..." यानंतर रघुनाथराव व माधवराव पुण्यात परतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...