२० जुलै १६६२मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १६६२
मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १६८०
छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजांचे किल्ले रायगडवर "मंचकारोहण" झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १६८५
गुजरातच्या मार्गाने आग्र्यास प्रयाण करण्याची तयारी शहजादा अकबराने केली आहे अशी बातमी औरंगजेबास कळली तेव्हा त्याने अहमदाबादच्या सुभेदार कारातलबखान यास हुकुम पाठवला कि, "अकबर त्या बाजूस आढळला कि त्यास एकदम पकडून द्यावा बिलकुल हयगय करू नये".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १६९१
आसदखान व कामबक्ष यास जिंजीवर स्वारी करण्याचा औरंगजेबाचा आदेश.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १७६१
माधवराव यांनी पेशवेपदाची सुत्रे हाती घेतली.
पानीपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवरावांना पेशवेपद मिळाले.
खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यासाठी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी माधवराव पेशवे झाले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १८३७
नाशिकचा नासक हिरा
या दिवशी लंडनमध्ये अनेक मौल्यवान रत्ने लिलावात विकली गेली. त्यांमध्ये 'नासक' नावाचा एक हिरा आणि एकेकाळी अर्काटच्या नबाबाच्या तिजोरीत असलेले काही दागदागिने ह्यांचाहि समावेश होता. 'नासक' हिरा 'डेक्कन प्रा‍ईझ मनी'चे विश्वस्त ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या आज्ञेवरून विक्रीस आला. ब्रिटिश साम्राज्याच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यात अगदी ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंडपर्यंतच्या वृत्तपत्रांनी ह्या हिराखरेदीची दखल घेतली.
'नासक' ह्या नावानं आजहि ओळखल्या जाणाऱ्या हिऱ्याचं हे नाव आपल्या नाशिक ह्या गावावरून पडलेलं आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १८७९
इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १९४२
बाबासाहेबांना मजूर मंत्री करण्यात आले
१९३८ साली काँग्रेसने आद्योगिक कलहाचे विधायक मुंबई विधिमंडळात विचारासाठी मांडले. कामगारांच्या हक्कावर गदा येणारे विधायक मांडण्यात येणार होते. या विधायकात कामगारांचा संप बेकायदेशीर ठरविण्याच्या तरतुदी बरोबरच मालकांनी जर टाळेबंदी जाहीर केली आणि कारखाना बंद झाला तर मालकांवर काहीही कारवाई करता येणार नव्हती. हा कायदा कामगारांच्या हक्काच्या विरोधात असल्यामुळे बाबासाहेबांनी या कायद्यांवर कडाडून हल्ला चढविला. "हा कायदा काळा आहे" असे म्हणत बाबासाहेबांनी आणि जमनादास मेहता यांनी या कायद्याला विरोध केला. मात्र विधिमंडळात बहुमताच्या जोरावर हा कायदा संमत झाला. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने आणि गिरणी कामगार यांनी संयुक्तरित्या संपाचे हत्यार उपसले. संपूर्ण मुंबई प्रांत या संपात सहभागी झाला. या संपाचे पडसाद भारतभर उमटले व हा कायदा रदबद्दल करण्यात आला. या यशामुळे बाबासाहेबांवर सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. पुढे २० जुलै १९४२ साली बाबासाहेबांना मजूर मंत्री करण्यात आले. सर्व कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला जो अतिशय दूरगामी ठरला. या निर्णयानुसार जे अनुभवी मात्र अर्धशिक्षित तंत्रज्ञ तयार होत होते त्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून बाबासाहेबांनी Employment Exchange स्थापन केले. त्यामुळे अनेक तरुण तरुणींना नोकरीसाठी अनेक ठिकाणांवरून बोलावणे येऊ लागले. त्यांच्या नोकरीचा प्रश्न सुकर झाला. मंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांनी काही क्रांतिकारक निर्णय घेतले ज्याच्या फायदा समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० जुलै १९६५
क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त ह्यांचा आज स्मृतिदिन !
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता. कानपूरच्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
१९६४ साली कसल्याश्या आजाराने त्रस्त हा क्रांतिवीर पाटण्याच्या सरकारी दवाखान्यात खितपत पडला होता,शेवटी त्यांचे आझाद नावाचे मित्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून या उपेक्षेविरुद्ध आवाज उठावाला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली,पण तोवर वेळ निघून गेली होती.त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली.
पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा बटुकेश्वर दत्तांनी व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली त्यांनी आपले प्राण त्यागले.
ह्या महान क्रांतिकारकास विनम्र आदरांजली !!!!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...