१ सप्टेंबर १६६०छत्रपती शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१ सप्टेंबर १४३६
अहमदशहा याने १ सप्टेंबर १४३६ रोजी मुख्य वजीर दिलावर खान याला संगमेश्वरच्या मोहिमेवर पाठवले. रायरीचा अधिपती शिर्के यांच्याशी थोड्याफार चकमकी आणि वाटाघाटी नंतर दिलावरखानाने मोहिम आटोपती घेतली. त्याने त्या बदल्यात रायरीच्या शिर्के व जावळीच्या मोऱ्यांकडुन अगणित संपत्ती व संगमेश्वर अधिपतीची कन्या घेतली. ही अगणित संपत्ती व मोऱ्यांची कन्या त्याने अल्लाउद्दीन अहमदशहा याला अर्पण केली. मोऱ्यांच्या त्या कन्येशी सुलतानाने विवाह केला व तिचे नाव ‘जेब-चेहरा’अथवा परी चेहरा ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१ सप्टेंबर १६६०
छत्रपती शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१ सप्टेंबर १७६०
सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात,
"माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत,
कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत
आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी".
दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण झालं आणि अहमदशहाअब्दाली, नजीबखान व शुजाउद्दोला यांनी दिल्लीकडे कूच केलं. अब्दाली आपल्या सैन्यासह, यमुनेच्या एका बाजूस शहादऱ्याजवळ तळ ठोकून होता, तर मराठे यमुनेच्या दुसऱ्या बाजूस दिल्लीत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१ सप्टेंबर १९३०
धुळय़ाचा पाठीराखा लळींग
लळिंगच्या डोंगरावर अनेक खुरटी झाडे आहेत. पावसाळय़ानंतर यामध्ये गवताळ कुरण तयार होते. या गवतातून अनेक रानफुलेही उमलतात, कोंबडतुरे डोकावू लागतात. लळींगच्या या गवतालाही खरेतर ऐतिहासिक संदर्भ! महात्मा गांधींनी ज्या वेळी 'मिठाचा सत्याग्रह'चे आंदोलन जाहीर केले, त्या वेळी त्याच्या समर्थनार्थ खान्देशातही चळवळ उभी राहिली. फक्त अडचण आली, ती इथे समुद्र-मीठ कुठून आणायचे? मग या भिल्ल, आदिवासी जनतेने ब्रिटिशांनी गवत कापण्याविरोधात केलेला कायदा मोडण्याचे ठरवले. १ सप्टेंबर १९३० रोजी ही सारी जनता इथे लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाली आणि गवताची कापणी करत त्यांनी सविनय कायदेभंग केला. लळींगच्या गवताला जणू दांडीच्या मिठाचे महत्त्व आले!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment