२१ सप्टेंबर १६६५"छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२१ सप्टेंबर १६६५
"छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२१ सप्टेबर १६८४
औरंगजेबाने "छत्रपती शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२१ सप्टेंबर १६८७
औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२१ सप्टेंबर १७४३
जयपूरचा राजा सवाई जयसिंगाचा मृत्यू
जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा ! हा अंबेरच्या विष्णुसिंह कच्छवाहाचा मुलगा. १७०० मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले. बहादूरशाह व नंतरचा मुहम्मदशाह यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे १७२०-१७२२ व १७३२ मध्ये त्यास माळव्याचा सुभेदार म्हणून नेमण्यात आले. त्याने उदेपूर व जोधपूर संस्थानांची मैत्री संपादिली. तसेच १७३४ मध्ये माळवा मोगल बादशाहाकडून मराठ्यांना अधिकृतपणे मिळवून देण्यात यांचेच प्रयत्न विशेष कारणीभूत होते.
प्रजेच्या सुखासाठी जयसिंगाने धर्मशाळा, रस्ते, विहिरी बांधल्या; बादशाहाकडून जिझिया कर रद्द करविला; जाटांचा बंदोबस्त केला आणि नवीन कायदे तयार केले. १७२८ मध्ये जयपूर ही राजधानी वसवून त्या शहराची त्याने नवीन रचना केली.
जयसिंग संस्कृत, गणित, ज्योतिष, इतिहास वगैरे विषयांचा ज्ञाता होता. काशीच्या रत्नाकरभट्ट महाशब्दे याने लिहिलेला जयसिंहकल्पद्रुम, जगन्नाथ पंडिताचे सिद्धांत सम्राट व रेखागणित हे दोन ग्रंथ आणि जयपूर येथे वसविलेली स्वतंत्र ब्रह्मपुरी जयसिंगाने विद्वानांना दिलेल्या आश्रयाचे व प्रोत्साहनाचे फळ होय. जयसिंगाने जयपूर, दिल्ली, बनारस व उज्जयिनी या ठिकाणी वेधशाळा बांधून ग्रहांचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी जयप्रकाश, सम्राटयंत्र, भित्तियंत्र, वृत्तषष्ठांश ही उपकरणे तयार केली. त्यांवर ७-८ वर्षे विद्वान ज्योतिष्यांकडून वेध घेऊन सिद्धांत सम्राट हा संस्कृत व झिज-इ-मुहम्मद हा फार्सी असे दोन ग्रंथ लिहविले (१७२८). ग्रहांची सूची व त्यांच्या गतीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी त्याने बनविलेली गोलाकार व अर्धगोल ताशीव संगमरवराची उपकरणे अद्यापही प्रेक्षणीय आहेत.
२१ सप्टेंबर १७४३ रोजी त्याचे निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२१ सप्टेंबर १७४९
बाजीरावांची काशीबाईंचा मुलगा जनार्दन याचे निधन
काशी यात्रेहून परत आल्यावर चार महिन्यांनी काशीबाई यांचे पुत्र जनार्दन २१ सप्टेंबर १७४९ रोजी गुरुवारी वारले. सदाशिवरावभाऊ शंकराजी केशवना लिहितात : 'श्रीमंत राजश्री जनार्दनपंत यांसी आठ पंधरा दिवस ज्वर येत होता. त्यांस एकाएकी सन्निपात होऊन भाद्रपद बहुल सप्तमी,गुरुवारी सा घटिका रात्रीस देवाज्ञा जाहली.' नवज्वराने सातारा मुक्कामी वारले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment