२० नोव्हेंबर १६७०छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कूच.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६३५ शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६६६ ९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६७० छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कू...