१३ फेब्रुवारी १६७२छत्रपती शिवराय विश्रांतीसाठी रायगडला मुक्कामी आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १५६७
इ.स.१५६७ मध्ये अकबराने चीतोडवर आक्रमण करून चीतोडला मोघली फौजांचा वेढा दिला. मेवाडच्या सर्व सामंतांच्या सल्याने महाराणा उदयसिंह यांना चितोड सोडून अरवली पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यात व जंगलात आश्रयास जावे लागले. १३ फेब्रुवारी १५६७ रोजी अकबर व मेवाडी सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले त्यात मेवाडचा पराभव झाला तसेच राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराणा उदयसिंह यांनी कुंभलगडावर आपली राजधानी स्थापन केली परंतु मोगली आक्रमणाचा धोका ओळखून त्यांनी आपली राजधानी गोगुंदा येथे प्रस्थापित केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १६३०
मुघल बादशाह शाहजहाँन आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुऱ्हाणपुर येथे पोचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १६५८
महाराजांचे वाकनीसांना समर्थांना मदत पाठवण्यासाठी पत्र
भास्कर गोसावी श्री गुरुमवतपरायण मोक्षश्रिया विराजित दिवाकर गोसावी श्री चे उछाहा होनु पनास भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावी बराबर पाठविले पावतील शिवाजीराजे यांच्याकडे भिक्षेस गेलो. त्यांनी विचारिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी, श्री समर्थांचे शिष्य चाफळास हो. मग ते बोलले ते कोठे राहतात व मुळ गाव कोण? त्याजवरून मी सांगितले की गंगातीरी जांबचे राहणे. प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून महोत्साव चालू करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा. सांगितल्यावरून आम्ही हिंडत अहो असे बोलता राजेश्रेंनी दत्ताजीपंत वाकनीस यास प्रतिवर्षी श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते हो ++ स येतील हे विनंती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १६६०
राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी 
"हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे.. 
त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो..... 
"शिवाजी हिंदुसेनाधीपती" 
म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १६६०
छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १६७२
छत्रपती शिवराय विश्रांतीसाठी रायगडला मुक्कामी आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


१३ फेब्रुवारी १७१२
कान्होजी आणि इंग्रजांत तह
कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १७२२
निजामाला दिल्ली दरबारात वजीर नेमण्यात आले. या कालावधीत श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी बागलाण, खानदेश,  नाशीक गोंडवन, वऱ्हाड आणि माळवा येथे तीन स्वाऱ्या करून चौथाई व सरदेशमुखी च्या वसूलासाठी गुजरातेत पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, माळव्यात उदाजी पवार यांची नियुक्ती केली. उदाजी पवार यांनी माळव्यात धार येथे मराठी ठाणे निर्माण केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १७२३
दिनांक १३ फेब्रुवारी सन १७२३ रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी माळव्यात बोलशा येथे दुसरी भेट झाली. मोगली सुभेदार दयाबहादूर मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्यास विरोध करू लागला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी त्याच्याकडे वकीलही पाठवीला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १७३९
कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १७४७
गोव्याच्या विजरईने जुआव द सौज फेर्राज यास लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे 
जर इंग्रज, डच व आम्ही एकत्र झालो, तर तुळाजी आंग्रे व त्याच्या बंदरात किंवा इतर ठिकाणी हल्ला करू. कारण तो इतका उद्धट (Insolent) झाला आहे की त्याच्यापुढे कन्याकुमारीपर्यंत कोणीच (उभे) राहत नाही ! तुम्ही हा विषय गुप्त रीतीने मुंबई बेटाच्या जनरलच्या कानी घाला. तो ह्या बाबतीत हालचाल करण्यास तयार असला, तर यंदाच्या पावसाळ्यात आम्ही पुढील बेत ठरवू म्हणजे उन्हाळाच्या सुरवातीला सर्व तयारी होईल. सर्वत्र आपल्या कर्तुत्वाचा डंका असणाऱ्या आंग्रे घराण्याला शह देण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून या देशावर खरी नामुष्की ओढवली, प्लासीच्या लढाईत हिंदुस्थानचे भवितव्य ठरले असे म्हणतात; परंतु वस्तुतः ते इ. स. १७५६ सालीच - की जेव्हा आंग्र्यांचा दारुण पराभव करण्यात आला; तेव्हाच ठरून गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १८८३
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी तुरुंगाचे दार बिजागिरी तोडून मोडले व पळून गेले पण परक्या मुलखात ते लगेचच पकडले गेले. त्यानंतर त्यांनी उपोषण सुरु केले व त्यातच त्यांचा १७ फेब्रुवारी१८८३ रोजी अंत झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १८५६
१८५४ मध्यें डलहौसीनें लखनौ येथील रेसिडेंटाच्या जागीं जनरल औट्रामची नेमणूक केली. यानें त्या प्रांतांत फिरून तेथील कच्ची हकीकत डलहौसीला कळविली. अयोध्येचे राज्य इंग्रजसरकारने एकदम आपल्या ताब्यांत घ्यावे अशीहि त्याने डलहौसीला शिफारस केली. तिजवर कौन्सिलदारांचे अभिप्राय होऊन हें प्रकरण डलहौसीपुढे आलें. त्यावर आपले मत लिहून डलहौसीने ते प्रकरण विलायतेस पाठविले. विलायतेहून राज्य खालसा करण्याचा हुकूम आल्यानंतर औट्राग्गच्या हाताखालीं फौज पाठवून तें राज्य डलहौसीने खालसा केले (१३ फेब्रुवारी १८५६) व अयोध्येच्या नबाबास सालीना बारा लाखांची नेमणूक करून कलकत्त्यास ठेविले. अयोध्याप्रकरणाचा निकाल लावणे हेच डलहौसीचे हिंदुस्थानांतील शेवटचे कृत्य होय.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ फेब्रुवारी १८९६
वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म - पेण, रायगड 
छत्रपती संभाजी राजांचे साधार, वास्तववादी, ऐतिहासिक चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९६ रोजी मुंबई येथे झाला. शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड अतिशय गाजला. छत्रपती संभाजी महाराजांविषयी तत्कालीन समाजात असणाऱ्या गैरसमजुतीना धक्का देणाऱ्या त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ १९६० मध्ये प्रसिध्द झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज, मालोजीराजे व शहाजीराजे, गोवळकोंड्याची कुतुबशाही, महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरीयड हे त्यांचे इतर ग्रंथ. तर तारीख इ इलाही, राजाराम चरितम हे त्यांनी संपादन केलेले ग्रंथ.
इतिहास संशोधकाचा पिंड असणाऱ्या बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचा कालखंड व जीवन यावरही प्रकाश टाकला. दंतकथांवर आधारित तुकारामांच्या परंपरागत चरित्रापेक्षा वेगळे चरित्र लेखन करून तुकारामाविषयीच्या अभ्यासाला त्यांनी शास्त्रशुद्ध बैठक दिली आहे. तुकारामांचे संतसांगाती, तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, संत तुकाराम हे त्यांचे विशेष ग्रंथ.
असे या इतिहाचासे भीष्माचार्य यांचे दि. १६ जुलै १९८६ रोजी निधन झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट जय सह्याद्री" 🚩

Comments