Posts

Showing posts from July, 2025

३१ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती"ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम"ला शिवशंकराचे दर्शन घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जुलै १६५७ दंडाराजपुरी मोहिम दंडा-राजपुरीचा किल्ला हा अरबी समुद्रकिनाऱ्यावर आहे. किनाऱ्यालगतच दंडा व राजपुरी अशी दोन गावे आहेत. या किल्ल्याच्या जवळच खाडीमधे एका बेटावर जंजिरा किल्ला आहे. तो किल्ला वर्षानुवर्षे सिद्दीच्या ताब्यात होता व तो स्वराज्याला उपद्रव देत होता. तसेच, स्वराज्याच्या रक्षणासाठी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक होते. म्हणुन मग १६५७ मधे ऐन पावसाळ्यात शिवाजीराजांनी सिद्द्यावर मोहिम काढली व त्याप्रमाणे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना नियुक्त केले. रघुनाथराव दंडा राजपुरीवर चालुन गेले ती तिथी होती शके १५७९, श्रावण शुद्ध १, शुक्रवार दि. ३१ जुलै १६५७. रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. जंजिर्यावरची ही शिवाजीराजांची पहिलीच मोहीम. यापुढेही काही वेळा शिवाजीराजांनी व नंतर संभाजीराजांनीही जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने शक्य झाले नाही. १६५७ च्या मोहिमेत सिद्दीला मा...

२७ जुलै १६७३भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजी महाराजांनी" "सातारा प्रांत" जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जुलै १६७३ भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजी महाराजांनी"  "सातारा प्रांत" जिंकला. अजिंक्यताऱ्याबरोबरच सज्जनगड पण बहुधा स्वराज्यात त्याचवेळी दाखल झाला असावा.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जुलै १६७७ कर्नाटक मोहिमेवर असता महाराजांनी आपला सावत्र भाऊ एकोजीराजे यांस पत्रे लिहिली.  तेव्हा महाराजांच्या भेटीस एकोजीराजे यांनी आपल्यातर्फे काही पोक्त लोक पाठविले. या मंडळीशी महाराजांनी व्यवहाराची योग्यतीच बोलणी केली. “कैलासवासी शहाजी महाराजांच्या कष्टाच्या धनदौलतीत जसा एकोजीराजांचा वाटा आहे तसाच आपलाही वाटा आहे. तेव्हा अर्धावाटा बऱ्या बोलाने द्या” असे महाराजांनी सांगून पाठविले. आणि हा निरोप त्यांनी एकोजीराजांची जी माणसे भेटावयास आली त्याज बरोबर एकोजीराजांच्या भेटीस आपलेकडील थोर माणसे, बाळंभट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी अशी तिघेजण पाठविले. त्याजबरोबर महाराजांनी एकोजी राजांस पत्र दिले व त्यात लिहिले की शहाजी राजांच्या जहागिरीचा अर्धा वाटा एकोजी राजे यानी संभाजी (शिवरायांचे बंधू) पुत्र उमाजी यास द्यावयास हवा आणि त्...

२५ जुलै १६७८छत्रपती शिवरायांनी (आत्ताच्या नवी मुंबई जवळील) उलवे ताब्यात घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६२९ छत्रपती शिवरायांचे आजोबा आणि "राजमाता जिजाऊ" यांचे पिता "लखुजीराजे जाधवराव" यांचा मृत्यू. निजामशहाच्या आदेशाने दौलताबादच्या किल्ल्यातील त्याच्याच दरबारात लखुजीराव, त्यांची मुले आणि त्यांच्या पुतण्यांचा विश्वासघाताने खून करण्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६४८ विजापूरच्या आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने "किल्ले जिंजी" जवळ शहाजीराजेंना कैद केले. शहाजीराजांना कैद करून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या व राजांची रवानगी कैदी म्हणून विजापूरास झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने मंजूर करून शिवरायांकडे आजच्या दिवशी सुपूर्द केले. या परवान्यानुसार शिवरायांना आपल्यासोबत आलेल्या मराठा फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६७८ छत्रपती शिवरायांनी (आत्ताच्या नवी मुंबई जवळील) उलवे ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १७०० भुषनगड औरंगजेबाच्या ताब्यात  परळी...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून संयमित व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून आक्रमकता घेऊन ४२ वर्षे हिदुस्थानचे राज्य कारभारी करणार एकमेव छत्रपती थोरले छत्रपती शाहू याना मानचा मुजरा........।।

Image
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून संयमित व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून आक्रमकता घेऊन ४२ वर्षे हिदुस्थानचे राज्य कारभारी करणार एकमेव छत्रपती थोरले छत्रपती शाहू याना मानचा मुजरा........।। १८_मे_१६८२ "संभाजीराजांना" महाराणी येसुबाई पोटी 'गांगवली' उत्तर कोकण रायगड माणगाव येथे पुत्ररत्न प्राप्त झाले. "शिवाजीराजे" नाव ठेवले व नंतर "शाहू" प्रचलित झाले असे उल्लेख वाचनात आहेत. 👉मुद्रा:- श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।। शंभूसुतोरिव।। ।।मुद्रा शिवराजस्य राजते ।। 👉 मातोश्री महाराणी येसूबाई व शाहूराजे 👉छत्रपती संभाजीराजांच्या १६८९ साली झालेल्या मृत्यूनंतर शाहूराजे आणि त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेत सापडल्या.  👉छत्रपती शाहू महाराज  तब्बल 18 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते. 👉शाहूराजांची पुढे तब्बल १८ वर्षे कैदेत राहून १७०७ साली औंरंगजेबाच्या मृत्यूनंतरच सुटका झाली. ज्या व्यक्तीच बालपण जितक्या खडतर आणि जास्त जबाबदारीतून जात ती व्यक्ती मोठेपणी तितकीच कर्तुत्ववान होते. 👉 छत्रपती शाहू महाराजांचं बालपण...

२४ जुलै १६७१मुघलांविरूद्ध भर पावसात सुरू असलेल्या मोहीमेसाठी "सरसेनापती प्रतापराव गुजर" यांना छत्रपती शिवरायांनी आणखी मावळ्यांची तुकडी आणि १०,००० होनांची रसद पाठवली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जुलै १२०६ मोहम्मद घोरीचा गुलाम म्हणून प्रसिद्ध असलेला कुतुबुद्दीन ऐबकाने दिल्लीची सत्ता हस्तगत केली. कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा मुसलमान असूनही त्याच्या घरावर मुसलमानांनी दरोडा घालून त्याला पळवून नेले होते. नंतर कुतुबुद्दीन मोहम्मद घोरीच्या घोडदळाचा एक प्रमुख म्हणून काम करत होता. शत्रू प्रांतावर दरोडे घालून लूटमार करण्याचे काम त्याच्याकडे होते. ११९१ साली तो त्याच्या सेनेसह भारतात शिरला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जुलै १६६६ छत्रपती शिवाजीराजांबद्दल गौरवोद्गार या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती २४ ते २७ जुलै १६६६ दरम्यानची आहे. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतुन कसे सुटावे याचा विचार करत होते. २४ जुलै रोजी रामसिंग बादशहा औरंगजेबसोबत तीन दिवसांसाठी शिकारीला गेला. त्याच्या माघारी एक दिवस त्याचीच चार माणसे शिवाजीराजांबद्दल चर्चा करत होती. त्यांची नावे होती: महासिंग शेखावत, बल्लुशाह, तेजसिंग व रणसिंग महासिंग म्हणाला 'शिवाजी खरोखरच खुप शहाणा व समंजस आहे. तो जे बोलतो ते उचितच बोलतो. त्यावर कोणी अधिक काही बोलण्याची आवश्यकताच पडत ना...

२२ जुलै १६७८किल्ले वेल्लोर स्वराज्यात दाखल

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६५७ मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल - आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६६६ सत्पुरुष कवींद्र परमानंदांचा सत्कार आग्रा कैदेत असताना थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या...

२१ जुलै १६७२"अब्राहम लेफेबर" हा डच वकील किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांसमोर हजर.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६५८ औरंगजेब दिल्लीमधे तख्तनशीन गेल्याच महिन्यात औरंगजेबाने बाप शहाजहानला आग्र्यात तुरूंगात टाकले होते व त्यानंतर ६ जुलै रोजी औरंगजेब दिल्लीला आला व तेथील व्यवस्था लावुन तो २१ जुलै रोजी तख्तनशीन झाला. याच दिवशी त्याने स्वतःला 'आलमगीर गाझी' अशी पदवी धारण केली. आलमगीर म्हणजे जग जिंकणारा व गाझी म्हणजे धर्मवीर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६६२ देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन !  विजापूरची राणी बडी बेगम साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देशबांधवा...

शिंदे घराण्याने मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळील कण्हेर-खेडे या गावचे पाटील होते. राणोजीराव शिदे हे येथील घराण्यातील होते.हेच या शिंदे राजवंशाचे मूळ पुरुष ‌.

Image
शिंदे अथवा हिन्दी मध्ये सिंधिया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होते.    👉शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने छत्रपती शाहूराजे शी त्यांची सोयरीक करून दिली होती. छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंदे ची मुलगी मरण पावली. दत्ताजीराव चा मुलगा जनकोजी हा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पदरी होता मात्र त्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. ह्याचा मुलगा राणोजीराव होय. राणोजी राव शिंदे पासूनच शिंदे घराणे पुढे आले. 👉राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते.  👉मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळील कण्हेर-खेडे या गावचे पाटील होते. राणोजीराव शिदे हे येथील घराण्यातील होते.    👉बाळाजी विश्वनाथ यांच्या पदरी पायदळात राणोजीराव होत (१७१६). पहिल्या बाजीराव पेशव्याने त्यांना बारगीर केले (१७२२).  निजामा बरोबर झालेल्या १७२४ साली साखर खेड येथील लढाईत राणोजीराव शिंदे यांनी भाग घेतला. ते १७२५ मध्ये शिलेदार झाले . कर्नाटकच्या मोहिमेत ते आघाडीवर होते....

बाजीराव पेशव्यांचे शिंदे, होळकर आणि पवारांसह प्रमुख 46 सरदार. पैकी 32 मराठा, आठ ब्राह्मण, तीन मुसलमान, दोन धनगर. अस्सल संपूर्ण यादी ! - विश्वास पाटील

बाजीराव पेशव्यांचे शिंदे, होळकर आणि पवारांसह प्रमुख 46 सरदार. पैकी 32 मराठा, आठ ब्राह्मण, तीन मुसलमान, दोन धनगर. अस्सल संपूर्ण  यादी !               - विश्वास पाटील       जातीने ब्राह्मण, वृत्तीने बेदरकार, कृतीने सर्वसमावेशक आणि अवघे जीवन रणांगणावर घालवलेल्या बाजीरावाने सातारकर शाहू महाराजांच्या आशीर्वादाखाली काम करताना निवडलेल्या सरदारांची यादी मोठी  वेधक आणि आजही अनेकांना विचार करायला लावणारी आहे. मस्तानीच्या फिल्मी गोष्टी  पल्याड ह्या योद्धाची  जीवन कहानी आणि कर्तबगारी खूप उंच आहे.       तर पाहूयात बाजीराव साहेबांचे प्रमुख सरदार . 1 सुभेदार मल्हारराव होळकर_ सतराशे एकवीसमध्ये पेशवाईत प्रवेश.  सन1725 मध्ये बाजीरावानी  त्यांना 500 स्वारांची  सरदारी पहिल्यांदा दिली. पुढे 1729 सप्टेंबर पासून  माळवा प्रांतातल्या वसुलीचा 30 टक्के वाटा त्यांना देऊ केला. 2. राणोजी शिंदे __हे प्रथम बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे खाजगी सेवक खिजमतगार होते. नंतर त्यांना  बारगिरी मिळाली. पुढे 1724 मध्ये बाजीर...

१६ जुलै १६७७दक्षिण दिग्विजय मोहीम छत्रपती शिवराय आणि त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची तंजावर येथे भेट झाली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ जुलै १६७७ दक्षिण दिग्विजय मोहीम छत्रपती शिवराय आणि त्यांचे  सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची तंजावर येथे भेट झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ जुलै १६८१ मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!  "शहजादा अकबराचे सैन्य दिवसेंदिवस वाढत असून त्याच्याजवळ १५०० स्वार असून त्र्यंबकहून आणखी पाच सहा हजार घोडेस्वार मिळणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज त्याच्या भेटीस येण्याची रोज शक्यता वाटते. आणि असे बोलले जाते की, बुऱ्हाणपुर मोहिमेसाठी त्यास ते बरोबर घेऊन जातील. तेथे त्यांना आणखी काही हिंदुराजे व त्यांचे मित्र मिळतील. तेथून त्यांना तडख दिल्लीला धडक मारण्याचा बेत असावा. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १६ जुलै १७२९ मराठे व छत्रसाल यांचा समाचार घेण्यासाठी अलाहाबादचा सुभेदार महंमद बंगश यास हुकूम दिला. सन १७२८ च्या डिसेंबरात जैतपूरनजीक बंगशाने छत्रसालावर हल्ला करून त्यास शरण आणले. बंगशाचा पराभव करण्याकरिता छत्रसालाने अंतस्थ रीतीने पेशवे बाजीराव यांची मदत मागितली. त्यानुसार बाजीराव पेशवे पंचवीस हजार सैन्यानिशी छत्रसालाचे मुलुख...

१५ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"१५ जुलैला सहीसलामत सोडण्याबदल्यात शेरखानने राजांशी तह केला, तहानुसार खानाने राजांनात्याचा सर्व मुलुख आणि २० हजार होन रोख दिले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जुलै १५८३ दोन पराभव पत्करले तरी पोर्तुगीज सैन्य आणि मिशनरी नाउमेद झाले नाहीत... ते आता पुरते हट्टास पेटले होते. दि.१५ जुलै १५८३ या दिवशी ते मोठ्या संख्येने कुकल्लीवर तिसऱ्यांदा चालून आले परंतु हिंदू आता थकले होते. त्यांना बाहेरुन कुमक येण्याची आशा नव्हती त्यांनी कुकल्लीचा कोट खाली करून आपल्या बायका मुलांसह आदिलशाही अंमलाखालच्या बाल्ली महालात स्थलांतर केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जुलै १६११  मिर्झा राजा जयसिंग यांचा अंबर (सध्याचे जयपूर) येथे जन्म. वडील महासिंह आणि आई दमयंती यांच्या पोटी जन्म घेतलेले मिर्झा राजे जयसिंग हे अतिशय पराक्रमी सरदार होते. वंशपरंपरेने चालत आलेली सरदारी मान आणी सन्मान यामुळे एक स्वतंत्र राजा अशी प्रतिमा त्यांची तयार झाली. त्यांच्या ४ पिढ्यांनी मोगलांची चाकरी केली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जुलै १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला त्यासमयी मोगलांचे दोन सरदार दिलेरखान आणि बहादुरखान हे मोगल साम्राज्याचे संरक्षण करत होते. यावेळी काही कारणास्तव औरंगाजेब याने दिलेरखान...

१३ जुलै १६६०घोडखिंड उर्फ पावनखिंड रणसंग्राम"बांदल सेना शौर्य दिन""बाजीप्रभू-फुलाजी देशपांडे वीरमरण"

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ जुलै १६६० घोडखिंड उर्फ पावनखिंड रणसंग्राम "बांदल सेना शौर्य दिन" "बाजीप्रभू-फुलाजी देशपांडे वीरमरण" "शंभुसिंह जाधवराव उर्फ संभाजी जाधव वीरमरण" (सरसेनापती धनाजी जाधव यांचे वडील व लखोजी जाधवराव यांचे वंशज) "छत्रपती शिवराय" पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले असताना वाटेत गजापूरच्या खिंडीत भयंकर रणसंग्राम घडला. "हिरडस मावळ" मधील "रायाजी बांदल" हे शिवरायांसोबत ३०० मावळे घेऊन विशाळगडाकडे निघाले. आणि रायाजी बांदल यांचे पिता "बाजी बांदल" हे ३०० मावळे घेऊन स्वता खिंडीत गनिमीला रोखण्यासाठी सज्ज झाले. सिद्दी मसूद आणि त्याची फौज खिंडीत आली व सर्वत्र एकच कापाकापी सुरू झाली. या रणसंग्रामात "बाजी बांदल", शंभुसिंह जाधवराव आणि त्यांचे साथीदार धारातिर्थी पडले. गजापूरची खिंड पावन झाली. त्यामध्ये बाजीप्रभू व फुलाजी देशपांडे हे सुद्धा होते. ते "बांदल" याच्याकडे कारकून म्हणून काम करत असत. या युद्धात धारातिर्थी पडलेल्या बाजी बांदल आणि त्यांच्या पराक्रमी सेनेचा...

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित खालील 12 गड-किल्ल्यांचा समावेश "मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया" (Maratha Military Landscapes of India) या थीम अंतर्गत करण्यात आला आहे. ही यादी 11 जुलै 2025 रोजी पॅरिस येथे झालेल्या घोषणेनुसार निश्चित झाली आहे.*

*युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित खालील 12 गड-किल्ल्यांचा समावेश "मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया" (Maratha Military Landscapes of India) या थीम अंतर्गत करण्यात आला आहे. ही यादी 11 जुलै 2025 रोजी पॅरिस येथे झालेल्या घोषणेनुसार निश्चित झाली आहे.* 1. रायगड (Raigad) - मराठा साम्राज्याची राजधानी, जिथे 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 2. राजगड (Rajgad) - मराठा साम्राज्याची पहिली राजधानी, जवळपास 26 वर्षे शिवाजी महाराजांचे मुख्य केंद्र. 3. प्रतापगड (Pratapgad) - 1659 मध्ये अफझल खान याच्याविरुद्धच्या लढाईसाठी प्रसिद्ध. 4. पन्हाळा (Panhala) - कोल्हापूरजवळ असलेला हा किल्ला मराठा इतिहासात महत्त्वाचा आहे. 5. शिवनेरी (Shivneri) - शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये येथे झाला, पुणे जिल्ह्यातील हा किल्ला. 6. लोहगड (Lohagad) - पुणे आणि खंडाळा मार्गावरील व्यापारी मार्गाचे रक्षण करणारा किल्ला. 7. साल्हेर (Salher) - नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक, 1672 मध्ये मराठ्यांनी मुघलांविरुद्ध विजय मिळवला. 8....

९ जुलै १६५५छत्रपती शिवरायांनी पुरंदर किल्ल्याची जबाबदारी सरसेनापती नेताजी पालकर यांना सोपवली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ जुलै १५८३ पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. १५८२ कॅप्टन फिगेरे दों हा पोर्तुगीज आधिकारी तहाचा प्रस्ताव घेऊन कुकल्लीकरांकडे आला. ते एकून ५ जण होते आणि निःशस्त्र होते. कॅप्टन फिगेरेदला मोडकीतोडकी कोकणी भाषा अवगत होती. आपल्या लाघवी बोलण्याने कुकल्लीकर हिंदू पुढाऱ्यांची मने काबीज करण्यात तो यशस्वी झाला. ठरलेल्या दिवशी कुकल्लीकर हिंदुंचे १६ पुढारी पोर्तुगिजांशी सलोख्याच्या पुढील वाटाघाटी असोळण्याच्या कोटांत करण्याचे ठरवून, मात्र पोर्तुगिजांनी विश्वासघाताने या सर्वांना हालहाल करून ठार मारले. त्यातील कानू नाईक या पुढाऱ्याच्या अंगात विरश्री संचारून त्याने तटावर चढून साळ नदीत उडी टाकून अदृश्य झाला. काळू नायकाने असोळणेच्या कोटात घडलेला प्रसंग आपल्या भाऊबंधूंना विदीत केला. पाद्री यांची तुकडी आणि पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. त्यांनी "भिवसा" येथील शंभु महादेव मंदिर आणि "असणी कट्टा" येथील श्रीरामाच्या देवळा समोरील तलाव भ्रष्ट केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ९ जुलै १६५५ छत्रपती शिवरायांनी...

८ जुलै १६६१*छत्रपती शिवरायांनी व्याघ्रगड (वासोटा किल्ला), सोनगड जिंकले.

*८ जुलै १६६१* छत्रपती शिवरायांनी व्याघ्रगड (वासोटा किल्ला), सोनगड जिंकले.

६ जुलै इ.स.१६७७**दक्षिण दिग्विजय मोहीम दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि फ्रेंच मुत्सद्दी मंडळ यांची भेट झाली.*

*६ जुलै इ.स.१६७७* *दक्षिण दिग्विजय मोहीम दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि फ्रेंच मुत्सद्दी मंडळ यांची भेट झाली.*

५ जुलै १६७७दक्षिण दिग्विजय मोहीमेत पळून गेलेला मुघल सरदार शेरखान शिवरायांनां विनाशर्थ शरण आला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ जुलै १६६७ छत्रपती शिवाजीराजे आग्र्याहून सुटून आले, ही घटना हिंदुस्थानांतील परकीयास आश्चर्याचा धक्का देणारी होती. गोव्याच्या व्हाइसरॉयने तर आपला वकील छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिनंदन करण्यासाठी रायगडावर धाडला. मोगल बादशहाच्या दहशतीने पोर्तुगीज इतके दिवस छत्रपती शिवाजी महाराजांशी सलोखा ठेवीत नसत. तहाच्या वाटाघाटीस १५ मे १६६७ रोजी सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आपला वकील सखोपंत यांस गोव्यास धाडले होते. त्यांचेबरोबर पोर्तुगीझ वकील गोंझालो मार्टिन रायगडास आला. ५ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज व पोर्तुगीझ यामधील तहाच्या अटी ठरल्या आणि ११ डिसें. १६६७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अटी रायगडवरच पूर्ण करून दिल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ जुलै १६६७ छत्रपती शिवरायांनी मनोहरगड (शिरशिंगे) जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ जुलै १६७७ दक्षिण दिग्विजय मोहीमेत पळून गेलेला मुघल सरदार शेरखान शिवरायांनां विनाशर्थ शरण आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ जुलै १६७९ दि. ५ जुलै १६७९ रोजीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळच्या सुभेदाराला लिहिलेले पत्रं...

३ जुलै १६७३छत्रपती शिवरायांचे राजापूरच्या मोहिमेवरुन रायगड किल्ल्यावर सुखरूप आगमन.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जुलै १३५० संत नामदेव यांचा मृत्यू संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जुलै १६७३ छत्रपती शिवरायांचे राजापूरच्या मोहिमेवरुन  रायगड किल्ल्यावर सुखरूप आगमन. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जुलै १६८६ औरंगजेब विजापुरच्या वेशीवर पोहोचला  स्वतः औरंगजेब हा १४ जून १६८६ रोजी सोलापूराहून निघून ३ जुलै रोजी विजापुरजवळ पोहचला. ह्यावेळी शहाजादा अकबराने उत्तरेस जाऊन राजपुतांस आपलेसे करून औरंगजेबाविरुद्ध उठाव करावा असा विचार केला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या विचारास उचलून धरले नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जुन १६८७ किल्ले हातगड मोगलांनी जिंकला किल्ले होलगड (हातगड) हा बागलाणमध्ये असून तो कठीण अशा पाषाणाचा मजबूत किल्ला आहे. सय्यद अब्दुल्ला याने त्याचा मुल...