१३ जुलै १६६०घोडखिंड उर्फ पावनखिंड रणसंग्राम"बांदल सेना शौर्य दिन""बाजीप्रभू-फुलाजी देशपांडे वीरमरण"
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१३ जुलै १६६०
घोडखिंड उर्फ पावनखिंड रणसंग्राम
"बांदल सेना शौर्य दिन"
"बाजीप्रभू-फुलाजी देशपांडे वीरमरण"
"शंभुसिंह जाधवराव उर्फ संभाजी जाधव वीरमरण" (सरसेनापती धनाजी जाधव यांचे वडील व लखोजी जाधवराव यांचे वंशज)
"छत्रपती शिवराय" पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले असताना वाटेत गजापूरच्या खिंडीत भयंकर रणसंग्राम घडला.
"हिरडस मावळ" मधील "रायाजी बांदल" हे शिवरायांसोबत ३०० मावळे घेऊन विशाळगडाकडे निघाले.
आणि रायाजी बांदल यांचे पिता "बाजी बांदल" हे ३०० मावळे घेऊन स्वता खिंडीत गनिमीला रोखण्यासाठी सज्ज झाले. सिद्दी मसूद आणि त्याची फौज खिंडीत आली व सर्वत्र एकच कापाकापी सुरू झाली.
या रणसंग्रामात "बाजी बांदल", शंभुसिंह जाधवराव
आणि त्यांचे साथीदार धारातिर्थी पडले. गजापूरची खिंड पावन झाली.
त्यामध्ये बाजीप्रभू व फुलाजी देशपांडे हे सुद्धा होते.
ते "बांदल" याच्याकडे कारकून म्हणून काम करत असत.
या युद्धात धारातिर्थी पडलेल्या बाजी बांदल आणि त्यांच्या पराक्रमी सेनेचा स्वता छत्रपती शिवरायांनी "बांदल सेना" असा उल्लेख केला होता.
पुढे महीन्याभरात स्वता छत्रपती शिवराय हे भोर तालुक्यातील "पिसावरे" या "बांदल" यांच्या गावी जाऊन "बाजी बांदल" यांच्या मातोश्री "दिपाही बांदल" यांचं सांत्वन केले. तसेच "बाजी बांदल" यांचे पुत्र "रायाजी बांदल" यांना स्वराज्यातील मानाचं पहिल पान(मानाची तलवार) देऊन त्यांना सरदारकी दीली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१३ जुलै १६६२
१३ जुलै १६६२ चं हे पत्र बाजी सर्जेराव जेधे यांनी मराठी सैनिकांना उद्देशून लिहिले आहे. या पत्राचा सारांश शिवकालीन पत्रसार संग्रह खंड ३ मध्ये क्रमांक २६६३ वर छापला आहे तो असा:-
"पंताजी पंडित (पंताजी गोपीनाथ बोकील. एका शिवकालीन महजरामध्ये (निवाड्यामध्ये) यांची कीर्ती, "अफझलखानास ज्यांनी जावळीमध्ये आणले ते" अशी दिली आहे. हे कुलकर्णी होते, ) अंबोडा आहेत. (अंबोडा या गावी आहेत) रायाजी देशमुख व पंडित मशारइले (पंताजी गोपीनाथ बोकील) मधे कलागती (भांडण) जाली ते बख्ती (त्या वेळी) त्या पोराने मशारइलेवर ( पंताजी गोपीनाथ बोकील यांच्यावर) चालोन घेऊन बेअदबी केली (अपमान केला) तरी हे कैसे सहले ? (कसे सहन झाले?) तुम्ही लहान लोकी त्यासी बेअदबी केली . तरी साहेबांची ( छत्रपती शिवाजी महाराजांची) रवेशी ( रिवाज किंवा पद्धत) ठावकीच आहे. साहेब तमाम रजपुतांचे ( या ठिकाणी रजपूत या शब्दाचा अर्थ हिंदू सैनिक असा होतो ) पायी बेडिया घालूनू गलां तोग ( साखळदंड) घालूनू किले राजगडा वरी ठेऊनू धोंडे वाहवितील. पंडित मशारइले (पंताजी गोपीनाथ बोकील यांना) साहेबाचे जागी समजोनू ( शिवाजी महाराजांच्या जागी समजून) अदब बरखुद राखत जाणे.
साहेब ( छत्रपती शिवाजी महाराज ) तमाम रजपुतांचे पायी बेडिया घालूनू गलां तोग घालूनू किले राजगडा वरी ठेऊनू धोंडे वाहवितील !
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१३ जुलै १६८३
१६८३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी चौलच्या किल्ल्यास वेढा घातला. तसेच काही मराठी सैन्य गोव्यावर चालून गेले. एक हजार घोडेस्वार व दोनशे पायदळ यांच्या साहाय्याने छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील तारापूरवर हल्ला करून ते जमीनदोस्त केले. चौलला घातलेला मराठ्यांचा वेढा तसाच चालू होता. करंजा, पंचबेट ताब्यात घेतले. ते मराठ्यांच्या ताब्यात वर्षभर राहिले. पोर्तुगिजांच्या ताब्यातील वसई आणि दमण यांच्या अनेक स्थळावर छत्रपती संभाजी महाराजांनी हल्ले करून त्यांचा नाश केला. छत्रपती संभाजी महाराजांचे पेशवा निळू मोरेश्वर याने चौलच्या किल्ल्यास वेढा घातला तो सहा महिने चालला. दिनांक १३ जुलै १६८३ रोजी मराठ्यांनी रेवदंडा किल्ल्यावर हल्ला चढविला पण पोर्तुगिजांनी तो परतवून लाविला. डॉन मनोन दोपोडो सिल्वेरीया हा वसईचा पोर्तुगीज अधिकारी होता. त्याने जंजिऱ्याच्या सिद्धी याकूब खानाकडे चारशे माणसांची मदत मागितली. ती त्याने दिली. तेव्हा ही चारशे माणसे समुद्रामार्गे पोर्तुगिजांनी रेवदंडा किल्ल्यावर पोहोचवली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट" 🚩
Comments
Post a Comment