शिंदे घराण्याने मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळील कण्हेर-खेडे या गावचे पाटील होते. राणोजीराव शिदे हे येथील घराण्यातील होते.हेच या शिंदे राजवंशाचे मूळ पुरुष ‌.

शिंदे अथवा हिन्दी मध्ये सिंधिया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होते. 
 
👉शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने छत्रपती शाहूराजे शी त्यांची सोयरीक करून दिली होती. छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंदे ची मुलगी मरण पावली. दत्ताजीराव चा मुलगा जनकोजी हा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पदरी होता मात्र त्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. ह्याचा मुलगा राणोजीराव होय. राणोजी राव शिंदे पासूनच शिंदे घराणे पुढे आले.

👉राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. 

👉मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळील कण्हेर-खेडे या गावचे पाटील होते. राणोजीराव शिदे हे येथील घराण्यातील होते. 

 
👉बाळाजी विश्वनाथ यांच्या पदरी पायदळात राणोजीराव होत (१७१६). पहिल्या बाजीराव पेशव्याने त्यांना बारगीर केले (१७२२). 

निजामा बरोबर झालेल्या १७२४ साली साखर खेड येथील लढाईत राणोजीराव शिंदे यांनी भाग घेतला. ते १७२५ मध्ये शिलेदार झाले . कर्नाटकच्या मोहिमेत ते आघाडीवर होते.

👉 चिमाजी आप्पा ने १७२८-२९ दरम्यान शिंदे, होळकर व पवार यांच्या मदतीने माळवा जिंकून या तीन सरदार मध्ये त्याची वाटणी केली. राणोजी अत्यंत शूर व निष्ठावंत असल्यामुळे त्यास दीड कोटी वसु ला पैकी ६५·५ लाखांचा मुलूख वाटणीला आला. शिंद्यांनी माळव्यात जम बसविला. राणोजी ने निजामा विरुद्धच्या भोपाळ वेढ्यात (१७३७) तसेच वसईच्या प्रसिद्ध लढाईत (१७३७–३९) भाग घेतला होता.

👉 वसईच्या किल्ल्याला सुरुंग लावण्याची बहादुरी त्याने केली. राणोजीराव  सुजालपुर जवळ १९ जुलै १७४५ मध्ये निधन झाले. त्यामुळे राणोजीराव नंतर जयाप्पा कडे घराण्याची सूत्रे आली.

👉  शिंदे-होळकरांनी मिळून दिल्लीचा वजीर सफदरजंग याच्या मदतीसाठी गंगा-यमुना यांच्या  दुआबात जाऊन रोहिल्या ची खोड मोडली. तेव्हा सफदरजंगच्या सल्ल्यावरून बादशहाने मोगल सत्तेचे रक्षण करण्याचे काम मराठ्यांवर सोपवल आणि त्या बदल्यात काही प्रदेश व काही प्रदेशांचे वसुली अधिकार मराठ्यांना बहाल केले. याच कामगिरीवर राजस्थानात असताना,  जयाप्पा शिंदे  राजपुता विरुद्ध  नागोर येथे लढत असताना फसवणुक करून त्याची  हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ दत्ताजी व मुलगा जनकोजी हे शिंदे घराण्याचा कारभार पाहू लागले.

👉महाराज राणोजीराव शिंदे यांनी महा कालेश्वर  मंदिराचा जीर्णोद्धार केला, शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे यांचे दिवान रामचंद्र शेणवी यांनी उज्जैन मध्ये असलेले महाकाल मंदिर बांधले. 

👉१८१० मध्ये शिंदे घराण्याची राजधानी ग्वाल्हेर मध्ये आली.
 
👉 दत्ताजीराव शिंदे हे शूर होतें. अब्दालीने दिल्ली लुटल्या नंतर (१७५७) पेशव्यांनी त्यास उत्तर हिंदुस्थानचा कारभार सुधारण्याचा आदेश दिला. त्याच्यावर नजीब खानाचे पारिपत्य,    लाहोर चा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आणि  बंगाल पर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी पैसा उभा करणे इ. जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांपैकी नजीब खानास त्याने कैद केले पण मल्हारराव होळकरांच्या मदतीने नजीब खान सुटला. दत्ताजी रावा ने नंतर लाहोर चा बंदोबस्त केला व साबाजी शिंदे कडे तेथील व्यवस्था सोपविली. पेशव्यांची आज्ञा असूनही होळकरांनी दत्ताजी ला म्हणावे तसे सहकार्य दिले नाही किवा तत्कालीन परिस्थिती मुळे मदत करता आली नाही. अखेर दत्ताजी  नजीब खान  रोहिला यांच्या हाती सापडला. त्यातून तो सुटला पण १० जानेवारी १७६० रोजी  दिल्ली जवळ बुराडी  घाटात  अब्दाली शी लढताना त्याला वीरमरण आले.   जयाप्पा चा मुलगा जनकोजी हा पानिपतच्या लढाईत मरण पावला (१७६१). यावेळी त्याची पत्नी काशीबाई पानिपतच्या स्वारीत हजर होती.

👉 सरदार जयाप्पा, दत्ताजीराव, जनकोजी यांनी मर्दुमकी गाजविली पण महादजी (१७२७–९४) याने शिंदे घराण्याचे नाव इतिहासात अजरामर केले

👉मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोठे आहे. या घराण्यातील कर्तृत्ववान  पुरूषा मुळे, विशेषतः राणोजी-महादजी यांच्यामुळे पानिपतचे अपयश धुऊन निघाले आणि उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. 

👉१९ जुलै १७४५ रोजी राणोजीराव शिंदे यांचे निधन सुलतानपूर येथे झाले. त्यांच्या पुत्र  जयाप्पा शिंदे यांनी त्यांचे स्मारक उज्जैन येथे क्षिप्रा नदीकाठी उभारले आहे. 

त्यांच्या मातोश्री द्वारका बाई यांचे निधन पुढच्याच वर्षी कण्हेर खेड येथे झाले.

राणोजी शिंदे यांचा इतिहास खऱ्या अर्थाने ‘स्वयंभू' योद्धा चा इतिहास आहे. त्यांनी तलवारीच्या जोरावर मराठ्यांचे उत्तरेत सामर्थ्य उभे केले. हा वारसा पुढे महादजी शिंदे यांनी समर्थपणे चालवला.

आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.!!

साभार & संकलन  
नितीन घाडगे.
संदर्भ :-

ग्वाल्हेर संस्थान मराठा अंमल शिंदे, महादजी, होळकर घराणे.

खरे, ग. ह. कुलकर्णी, गो.त्र्य

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने