Posts

२१ सप्टेंबर १६६५"छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १६६५ "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेबर १६८४ औरंगजेबाने "छत्रपती शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १६८७ औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १७४३ जयपूरचा राजा सवाई जयसिंगाचा मृत्यू  जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा !  हा अंबेरच्या विष्णुसिंह कच्छवाहाचा मुलगा. १७०० मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले. बहादूरशाह व नंतरचा मुहम्मदशाह यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे १७२०-१७२२ व १७३२ मध्ये त्यास माळव्

१९ सप्टेंबर १६७९खांदेरी बेटावर इंग्रजाची मराठ्यांशी पुन्हा भर समुद्रात चकमक उडाली, यात इंग्रज लेफ्टनंट "फ्रांसिस थोर्प" हा अधिकारी मारला गेला आणि मराठ्यांनी पुन्हा "खांदेरी"वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ सप्टेंबर १६६१ कोकणातील बंदरे विजापूरच्या आदिलशहाच्या अधिसत्तेखाली होती. पोर्तुगिजांनी १५ डिसेंबर १६३८ ला विजापूरकरांशी तह केला होता. या तहनाम्यास एकंदर बारा कलमे आहेत. अकराव्या कलमान्वये विजापूरकर व पोर्तुगीज यांच्यामध्ये असे ठरले होते की जहाजे, गलबते व होड्या राजेसाहेबांच्या शाही बंदरातून सफर करतील त्यांस पोर्तुगिजांनी मलबारी व इतर यांच्यापासून संरक्षण दिले पाहिजे व त्यास सोबत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजेत आणि ज्या अर्थी पोर्तुगिजांना या तहनाम्याचे पालन करणे अपरिहार्य होते, त्या अर्थी पोर्तुगिजांनी राजेसाहेबांच्या जहाजांना संरक्षणाच्या दृष्टीने अभय दिले व चाच्यांच्या भीतीने विजापूरकरांना सवलत म्हणून आपली जहाजे त्यांच्या प्रदेशात पाठविण्याचे सोडून दिले. विजापूरकर व शिवाजी महाराज यांच्यामध्ये तद्नंतर झालेल्या शांतता करारानुसार (१९ सप्टेंबर १६६१) पोर्तुगिजांचे समुद्रमार्गे त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांना मुक्त वाट द्यावी असे ठरले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ सप्टेंबर १६७९ खांदेरी बेटावर

१५ सप्टेंबर १६७५खांदेरी व इतर ठिकाणी इंग्रजांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन छत्रपती शिवराय व इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची रायगडावर पुन्हा भेट.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ सप्टेंबर १६७५ खांदेरी व इतर ठिकाणी इंग्रजांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन छत्रपती शिवराय व इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची रायगडावर पुन्हा भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ सप्टेंबर १६७८ छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी सनद लिहून दिली. ही सनद छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी अर्पण केल्याचा स्पष्ट उल्लेख सनदेत आहे, सनदेत आजुबाजुची काही गावे सुद्धा इनाम दिल्याचा उल्लेख आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ सप्टेंबर १६७९ मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून खांदेरी बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी ‘रिवेंज’ नामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली. मिन्चीन पोचताच ह्युजेसने ताबा मिन्चीन कडे सोपवला व तो लाकुडफाटा व इतर सामान मिळवण्याकरिता काही काळ मुंबईला परतला. ह्या कालावधीत मिन्चीन गस्त सांभाळीत होता परंतु मराठ्यांच्या छोट्या होड्या मोठ्या जहाजास चकवून वल्हव

२० जुलै १६६२मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६६२ मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६८० छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजांचे किल्ले रायगडवर "मंचकारोहण" झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६८५ गुजरातच्या मार्गाने आग्र्यास प्रयाण करण्याची तयारी शहजादा अकबराने केली आहे अशी बातमी औरंगजेबास कळली तेव्हा त्याने अहमदाबादच्या सुभेदार कारातलबखान यास हुकुम पाठवला कि, "अकबर त्या बाजूस आढळला कि त्यास एकदम पकडून द्यावा बिलकुल हयगय करू नये". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६९१ आसदखान व कामबक्ष यास जिंजीवर स्वारी करण्याचा औरंगजेबाचा आदेश. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १७६१ माधवराव यांनी पेशवेपदाची सुत्रे हाती घेतली. पानीपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवरावांना पेशवेपद मिळाले. खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यासाठी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी माधवराव पेशवे झाले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १८३७ नाशिकचा नासक हिरा या दिवशी ल

५ सप्टेंबर १६६१छत्रपती शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ सप्टेंबर १६५९ युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री, निंबाळकर घराण्याची लेक सौभाग्यवती, स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई राणीसाहेब यांचा आज स्मृतिदिन. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ सप्टेंबर १६६१ छत्रपती शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ सप्टेंबर १६६५ छत्रपती संभाजीराजेंच्या मनसबदारीचे फर्मान जारी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ सप्टेंबर १६६५ शिवाजी महाराजांनी १६६५ मध्ये मिर्झा राजा जयसिंग याच्याबरोबर तह करून आपले २३ किल्ले मुघलांना देण्याचे मान्य केले. त्यानंतर, जून १६६५ मध्ये त्यांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रातील काही भागाचा संक्षिप्त अनुवाद असा आहे: “हा गुन्हेगार आणि पापी मनुष्य सर्व प्रकारच्या शिक्षेला पात्र आहे…. तो आशा करतो की क्षमा करणाऱ्या आपणाकडून या सेवकाला जीवदान दिले जाईल आणि त्याचे गुन्हे माफ करणारे बादशाही फर्मान सादर केले जाईल….” त्यावर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पाठविलेल्या ५ सप्टेंबर १६६५ या तारखेच्या फर्मानातील सुरुवातीचा काही भाग अ

४ सप्टेंबर १६७९इंग्रजांचा "खांदेरी" ला वेढा पडला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १४६१ ४ सप्टेंबर १४६१ रोजी हुमायूनचा खून झाला. क्रूरकर्मा म्हणून त्याची इतिहासात ख्याती आहे. त्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा निजामुद्दीन (कार. ४ सप्टेंबर १४६१-३० जुलै १४६३) गादीवर आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १६५६ ४ सप्टेंबर १६५६ या दिवशी शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचे नवीन नामकरण केल्याची नोंद आहे. याचवेळी रायरीचे रायगड, तोरण्याचे प्रचंडगड, रोहिड्याचे विचित्रगड व चाकणच्या भुईकोट किल्ल्याचे संग्रामदुर्ग असे नाव ठेवण्यात आले असावे. तसेच काही महिन्यांपूर्वी जावळीतील भोरप्याच्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम चालु झाले होते त्याला महाराजांनी नाव दिले प्रतापगड!  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १६६० महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन निसटुन विशाळगडावर आले (जुलै १६६०), त्याच सुमारास किंवा लवकरच कान्होजींची प्रकृती ढासळत होती. दुर्दैवाने त्याच सुमारास कान्होजींच्या सहा मुलांमधे वाटणीवरून वाद सुरू होते. शिवाजीराजांना कान्होजींच्या आजारपणाची बातमी कळताच त्यांना एक मोठे पत्र लिहिले. त्यात ते कान्होजींना औषध व उपचार

१ सप्टेंबर १६६०छत्रपती शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ सप्टेंबर १४३६ अहमदशहा याने १ सप्टेंबर १४३६ रोजी मुख्य वजीर दिलावर खान याला संगमेश्वरच्या मोहिमेवर पाठवले. रायरीचा अधिपती शिर्के यांच्याशी थोड्याफार चकमकी आणि वाटाघाटी नंतर दिलावरखानाने मोहिम आटोपती घेतली. त्याने त्या बदल्यात रायरीच्या शिर्के व जावळीच्या मोऱ्यांकडुन अगणित संपत्ती व संगमेश्वर अधिपतीची कन्या घेतली. ही अगणित संपत्ती व मोऱ्यांची कन्या त्याने अल्लाउद्दीन अहमदशहा याला अर्पण केली. मोऱ्यांच्या त्या कन्येशी सुलतानाने विवाह केला व तिचे नाव ‘जेब-चेहरा’अथवा परी चेहरा ठेवले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ सप्टेंबर १६६० छत्रपती शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ सप्टेंबर १७६० सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात, "माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत, कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत  आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी". दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण