श्री सिद्धनाथ यात्रा निमसोडता. खटाव जि. सातारा
गावात सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. मंदिरासमोर तुळशीविवाह लावला जातो. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित असतात. दिपमाळला तेल घातला जात.तुळशी विवाह दिवशी छबिना निघतो. दुसरा दिवस म्हणजे मुख्य दिवस सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत उत्साहात यात्रा पार पडते. हजारो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात.सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत निमसोड नगरी दुमदुमून जाते. रथावर अक्षरशहा पैशाचा पाऊस पडतो. नाथबाबा चा वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असतो. सकाळी मानकरीयांचे धज दीप माळ ते मंदिराचा कळस असे वाजत गाजत मिरवणूकीत बांधले जातात. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उत्सवाला सुरुवात होते. गावातील ग्रामस्थ मानकरी उपस्थित श्रीफळ वाढवून पूजन केले जाते. निमसोड चे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेला हजारो भाविक उपस्थित असतात. गुलाल खोबऱ्याची उधळन होते. रथोत्सवाच्या मार्गामध्ये रांगोळी व फटाके अतिश बाजीत रथाचे स्वागत होते. रथाला दिशा देणारे सुकान चालवण्यासाठी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो. गावातील भाविक भक्त तो गावातील भाविक भक्त रथ ओडण्याचे ओडतात. भाविक रथावर पाच रुपयापासून ते लाखापर्यंत यथाशक्ति पैशाचे तोरणे बांधतात. देवाला चांदीच्या वस्तू भक्तीभावाने अर्पण केल्या जातात. गावातील माहेर वासिनी सह महिला वर्ग उपस्थित असतो. पाहुणे, ग्रामस्थ नकरदार वर्ग, उद्योजक, सोना चांदी ते व्यावसायिक, शेतकरी रथावर देणगी देतात. रथासमोर मानाचे अश्व, पालखी, लेझीम पथके, बँड पथके आदि वाद्याच्या गजरामध्ये रथ मिरवणूक चावडी चौक मेन बाजार पेठ, मंदिर चौक, शनिवार पेठ, कन्या शाळा, भैरव टाका, देशमुख आळी, हरिजन वस्ती, चावडी चौक, चंद्रसेन मंदिर, घाडगे आळी, बडेबाबा माळ मार्ग, ते मुख्य बाजारपेठ मार्गे दहा तास मिरवणूक चालते. रात्री साडेनऊच्या दरम्यान रथ मुख्य मंदिरासमोर आणला जातो. यात्रा मध्ये मेवा मिठाई खेळणी, पाळणे, फिरती व्यवसायिक, विविध प्रकारच्या हॉटेल, रसवंती गृह दुकाने मोठ्या प्रमाणात असतात. यात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी गावातील जेष्ठ नागरिक तरुणवर्ग यात्रा कमिटी, भरपूर मेहनत घेतात. निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी डॉक्टर यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी सज्ज असतात. तसेच पोलिस प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करतात. सर्व राजकीय पक्ष त्यांचे सामाजिक कार्यकर्ते हातात हात घालून देवाच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करत नाहीत. परत उत्सवाच्या रात्री रथावरील रक्कम मोजण्यासाठी ग्रामस्थ तरुणवर्ग यात्रा कमिटी मार्गदर्शक उपस्थित असतात. ऑर्केस्ट्रा, तमाशा, सिनेमा गृह, करमणुकीसाठी यात्रा कमिटी आयोजित केलेल्या असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरासमोर लोकनाट्य तमाशा असतो. दुपारी दोन दरम्यान जंगी कुस्त्यांचे मैदान चे आयोजन यात्रा कंपनीतर्फे केली जाते. दहा रुपये पासून ते पाच लाखापर्यंत नॅशनल लेव्हलच्या जंगी कुस्त्या भरवल्या जातात. हजारोच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित असतात. पंचक्रोशीतील सर्वात मोठे जंगी कुस्त्यांचे मैदान निमसोड ला असते. पूर्वी यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत अड्डा असायचा. रथ उत्सव गेल्या कित्येक वर्षापासून निमसोड करांनी चालू केलेली परंपरा नुसत्या निमसोड नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यातून, मुंबई पुणे, संपूर्ण भारताभर पसरलेले निमसोड ते सोन्या-चांदीचे व्यवसायिक, सासुरवाशीण असणाऱ्या लेकीबाळी, तसेच वा वर्षभर वाट बघत असलेले नात भक्त यंदा यात्रेवर पासून वंचित राहिले. या सर्व भक्तजनांच्या ला साकडे घालू या. लवकरात लवकर कोरोनावर लस यावी आणि कोरणा रुपी राक्षसाचा नाश व्हावा. सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं आई जोगेश्वरी च्या नावानं चांगभलं.
@नितीन घाडगे
Comments
Post a Comment