Posts

Showing posts from 2023

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ डिसेंबर १६००* ३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली.  डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ डिसेंबर १६६३* छत्रपती शिवराय सुरतवर छाप्यासाठी जाताना वाटेत ३१ डिसेंबर रोजी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे महापूजा व दानधर्म केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ डिसेंबर १६७९* जलदुर्ग खांदेरी आणि इंग्रजांची शरणागती.... सुरतकर इंग्रजांनी मात्र सतत तिकडून मुंबईकर इंग्रजांना सुनावणे सुरु केले. ३१ डिसेंबर ला शेवटी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला कळवले की, “खांदेरी प्रकरणी कंपनीला विनाकारण खूप खर्च झाला. आम्हाला काही यश आले नाही. मराठ्यांच्या चपळ होड्या सहज कुठेही जाऊ शकतात, कुठूनही हल्ला करू शकतात मात्र आमच्या युद्धनौका अगदीच निरुपयोगी ठरल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करण्याची

२६ डिसेंबर १६६५*सेनापती नेताजी पालकरांनी विजापुरकरांचे महत्वाचे ठाणे असलेले मंगळवेढ़े जिंकून घेतले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ डिसेंबर १५३०* मोगल सत्तेचा संस्थापक मोहम्मद झहीरुद्दीन बाबर याचा मृत्यू. इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैमूरलंगाचा हा वंशज त्याच्या पूर्वजांप्रमाणेच क्रूर असाच होता. १५२८ मध्ये बाबराने अयोध्येतील राममंदीर पाडले आणि मशीद उभारली आणि तीच ती वादग्रस्त अशी "बाबरी मशीद" इब्राहिम लोदी आणि राणा सांगाच्या पराभवानंतर बाबरने भारतात मुगल साम्राज्याची स्थापना केली आणि आग्रा राजधानी केली. त्याआधी सुलतानांची राजधानी दिल्ली होती. मात्र बाबरने ती राजधानी केली नाही, कारण तो पठाण होता आणि तुर्कांची सत्ता त्याला मान्य नव्हती. प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाबरला दिल्लीपेक्षा आग्रा योग्य वाटले. भारतात मुस्लिम शासकांना 'सुलतान' म्हटले जात होते, बाबरने स्वतःला 'बादशहा' घोषित केले. बाबर फक्त चार वर्षे भारतावर राज्य करु शकला. त्याचा मृत्यू २६ डिसेंबर १५३० मध्ये आग्रा येथे झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ डिसेंबर १६६५* सेनापती नेताजी पालकरांनी विजापुरकरांचे महत्वाचे ठाणे असलेले मंगळवेढ़े जिंकून घेतले. 🏇🚩

*२० डिसेंबर १६७८*छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी बेलवडीच्या किल्ल्याला वेढा घातला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० डिसेंबर १६२५* किल्ले पुरंदर हक्काचा महजर फतहखानने छत्रपती शिवरायांवर चाल केली तेव्हा पुरंदर किल्ला महादजी नीळकंठरावाकडे होता. महादजीचे शाहजीबरोबर चांगले संबंध होते त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांना संकटकाळी गडाचा वापर करु दिला. साधारण १६२५ पासून महादजीच्या घराण्याकडे पुरंदरचा ताबा होता. २० डिसेंबर १६२५ चा एक महजर आहे ज्यात पुरंदरच्या नीळकंठरावाचा उल्लेख येतो. त्यातून हे स्पष्ट होते की मीरासदारीने नीळकंठरावांकडे पुरंदरचा ताबा होता. पुण्याच्या कऱ्हेपठार तरफेत पुरंदर किल्ला येतो. हा परगणा शाहजी राजांना मुकासा म्हणून मिळाला होता. त्यामुळे अप्रत्यक्षपणे शाहजी राजांचा ह्या भागावर हक्क होता. तसेच शाहजी राजांचा प्रतिनिधी म्हणून छत्रपती शिवरायांचा त्या भागावर हक्क होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० डिसेंबर १६७८* छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी बेलवडीच्या किल्ल्याला वेढा घातला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० डिसेंबर १७०३* संताजी शिळिमकर हे द्वितीय छत्रपती शिवाजी महाराज (राजाराम महाराज पुत्र) ह्यांच्या काळात राजगडवर सुवेळा माचीचे

*१६ डिसेंबर १६६५*"सरसेनापती नेताजी पालकर" यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून "खटाव" हे ठाणे जिंकले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ डिसेंबर १६६५* "सरसेनापती नेताजी पालकर" यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून "खटाव" हे ठाणे जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ डिसेंबर १६६८* कारवारकर इंग्रजांनी आपल्या बातमीपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोवा जिंकण्याच्या योजनेची दिलेली बातमी या नोंदीची तारीख आहे १६ डिसेंबर १६६८. निरनिराळ्या सबबीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे चार पाचशे लोक गोव्यात घुसून दिले होते. थोड्याच वेळात ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्री त्यांनी एकदम उठाव केला असता तर कोणताही दरवाजा ताब्यात घेऊन पोर्तुगीजांनी पुरेसे सैन्य रणांगणावर उभे करण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आज फिरून त्यांनी गोवा काबीज केला असता यात शंकाच नव्हती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज गोव्यापर्यंत आल्यावर आपला कट उघडकीस आला, आपली लोक पकडले गेले आणि पोर्तुगीज लोकही सज्ज होऊन राहिले हे पाहून मुळचा बेत बदलून त्या भागातील आपल्या किल्ल्यांची तो पाहणी करू लागला. इकडील सर्व मुर्खात सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त झाला असून आपल्याला प्रवेश मिळणे शक्

★★मुकासा /मोकासा ★★ मुकासा /मोकासा म्हणजे काय? सरंजामी सरदारांच्या पदरी असलेल्या तैनात सैन्याच्या खर्चाचा .

★★★★मुकासा /मोकासा ★★          मुकासा /मोकासा म्हणजे काय? सरंजामी सरदारांच्या   पदरी असलेल्या तैनात सैन्याच्या खर्चाचा मोबदला म्हणुन नगद अथवा रोखीने पैसे न देता तेवढ्या कर वसुली उत्पन्नाचा मुलुख तोडुन दिला जात असे.त्या प्रदेशाला मुकासा आणी ज्या सरदाराला तो मोकासा प्रदेश दिला जात असे,त्यास मुकासदार किंवा मोकासदार ही संज्ञा होती.     मोकासादार सरदार आपल्या मूकासाप्राप्त प्रदेशातुन कर स्वरुपातुन वसुल करुन ठरलेली रक्कम स्वतःकडे ठेऊन शिल्लक राहिलेले उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा करीत असत. जहागिर अथवा मूकासा देणे ,जप्त करणे अथवा काढुन घेणे ,एकाचा दुसर्याला देणे,बढती देणे अथवा तैनात सैन्य कमी करणे आदी अधिकार हे सर्वस्वी छत्रपती कडे असत....छत्रपती शिवराय महाराज यानी ही पद्धत बंद करुन पगारी पद्धत चालु केली होती....छत्रपती संभाजी महाराज काळात देखिल हिच पद्धत होती....ती वतनदार व सरंजामदारी बंद करण्यासाठी खुप महत्वपुर्ण ठरली व यशस्वी देखिल झाली.....परंतु औरंगजेब खुद्द महाराष्ट्रात स्वराज्यात ठाण मांडुन बसला असता त्याने मराठा सरदाराना परत वतन व सरंजाम देणे चालु केले.....त्यामुळे नाईलाजाने छत्रपती राजा

येळकोट... येळकोट... जय मल्हार...

येळकोट... येळकोट... जय मल्हार...  अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबा आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत जळगावपासून बेळगावपर्यंत प्रत्येक बहुजन घरात हेचं कुलदैवत आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी आणि निमगाव दावडी साताऱ्यात पाली, अहमदनगर जिल्ह्यात शेगुड, सोलापूर जिल्ह्यातील बाळ्याचा खंडोबा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सातारे,  नांदेड जिल्ह्यात माळेगाव, काहींचं कुलदैवत थेट कर्नाटकात बेळगाव, धारवाड जिल्ह्यात आहे. माझ्या अल्प अभ्यासानुसार महाराष्ट्रात असं एकही गाव किंवा देव्हारा नसेल जिथं खंडोबा पुजला जात नाही. लग्नात पहिला मान खंडोबाचा असतो.खंडोबाचं वैशिष्ट्य म्हणजे लग्नानंतरचे जागरण गोंधळ वगळता, कुठलाही नवस वगैरे करावा लागत नाहीं.विशेष म्हणजे जागरण - गोंधळाच्या कार्यक्रमासाठी मांसाहाराच्या बेताचे आयोजन केलं जातं होतं.(गेलीं काहीं वर्षे गोबर पट्ट्यातील धर्म - संस्कृतीने अतिक्रमण करायला सुरूवात केल्यापासून जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गोड जेवण दिलं जातं.)पंढरीचा पांडुरंग आणि जेजुरीच्या खंडोबाला कुठलही व्रत - वैकल्ये करावा लागत नाहीं.वर्षातून एकदा वारी केली (अगदी मनोरंजन म्हणून वन डे ट्रीप म्

*७ डिसेंबर १६६५*सर सेनापती नेताजी पालकरांनी विजापूरकरांकडून फलटण जिंकले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ डिसेंबर १६६५* सर सेनापती नेताजी पालकरांनी विजापूरकरांकडून फलटण जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ डिसेंबर १६७२* बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र - प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२ - साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ डिसेंबर १७१५* मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे

क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतीदिना निमित्त*🌹🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🌹

*क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतीदिना निमित्त* 🌹🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🌹 ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड (बापू) आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्य

*४ डिसेंबर १६७३*छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ डिसेंबर १६७३* छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ डिसेंबर १६७९* शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले. औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की, "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा...!" अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली...! संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं. अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले (दि.२० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले. तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले (दि.३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि.४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला. ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ डिसेंबर १६८०* सुरतेहून इंग्रजांच्या दुसऱ्या एका वखारीला लिहिलेल्या पत्रातून संभाजीच्या सैन्याचा त्यांनी धस्का घेतल्याचे दिसते. बहादुरखानचे मुघल सैन्य ह्या काफिल्याजवळपास असल्याने बहुदा माल सुर

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१ डिसेंबर १६६१*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६१* छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६३* छत्रपती शिवरायांच्या भीतीने व दहशतीने घाबरून मुघल सरदार शाहीस्तेखान औरंगाबाद सोडून बंगालकडे रवाना झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६४* छत्रपती शिवरायांनी कोकणातील राजापूर व दाभोळ जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६७५* छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसेंबर-जानेवारीम

कार्तिक स्वामी

Image
फक्त दर्शनाने शक्य होईल.... मानवाला अथक परिश्रम करुनही मनाजोगे लक्ष्मी प्राप्त होत नाही. परंतु कार्तिक स्वामी ही एकमेव अशी देवता आहे की, त्यांचे वर्षातून एकदाच दर्शन घेतल्याने आपली गरीबी नष्ट होवून लक्ष्मी प्राप्त होते. कार्तिक स्वामी हे शिवपार्वतीचे मोठे पूत्र व भगवान गणेशाचे बंधू आहेत. महाराष्ट्रात त्यांना कार्तिक स्वामी व सहा तोंडे असल्याने षन्मुखानंद व कर्नाटकात षडानन म्हणून ओळखले जाते.  देशामध्ये स्वामीचे दुर्मिळ मंदीर असून कर्नाटकात सांडूर व महाराष्ट्रात पुणे येथे पर्वती, नाशिक, कोल्हापूर, कसबा संगमेश्र्वर, चिपळून येथे मंदिरे आहेत पण हे सर्व मंदिरे मानवनिर्मित आहेत.  18 पुराणापैकी स्कंद पुराणातील उल्लेखाप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राने नरोणा या क्षेत्री मंदिराची निर्मिती केली असून प्रत्यक्ष अनेक देवांसह कार्तिक स्वामीचे वास्तव्य याठिकाणी होते. म्हणून अशा पवित्र तिर्थक्षेत्री अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. पण हे पवित्र क्षेत्र प्रसिद्धी पासून दूर असल्याने अनेक भक्तांना याची माहिती नाही. कार्तिक स्वामींच्या दर्शनाने माणसाचे #दारिद्र्य नष्ट होवून तो #ऐश्र्वर्यस

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२८ नोव्हेंबर १६५७*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६५७* छत्रपती शिवरायांनी चौल काबिज केले. महाराज स्वत: जातीने कोकणात उतरले, ३ ओक्टोबर १६५७ रोजी महाराज कल्याणला पोहचले. कल्याण-भिवंडी एकाच दिवशी म्हणजे २४ ओक्टो १६५७ या दिवशी काबिज झाली. त्यानंतर महाराजांनी लगेचच एका महिन्याच्या आत २८ नोव्हेंबर १६५७ या दिवशी चौल काबिज केले. चौल पाठोपाठ माहूलीचा किल्ला राजांनी घेतला 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६५९* शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विशाळगड ठेवले. अफझलखान वधानंतर अवघ्या १८ दिवसांत छत्रपती शिवरायांवी "वाई" ते "कोल्हापूर" हा प्रदेश स्वराज्यात आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६७०* ३००० फौज सोबत घेऊन छत्रपती शिवरायांची दुर्ग बांधणी संदर्भात "खांदेरी" बेटाची पाहणी. पुढे लवकरच या ठीकाणी दुर्ग बांधणी सुरू झाली, त्यामुळे सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ नोव्हेंबर १६७९* इंग्रजांचे खांदेरीचा ताबा मिळवण्यासाठी पत्र इंग्रजांना ज्याप्रमाणे मराठे मुंबईच्य

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ नोव्हेंबर १६२९* छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी, जिजाबाई यांच्या सासूबाई उमाबाईसाहेब या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते त्यांनी फक्त ३ महिनेपूर्वी वेरुळच्या घृष्नेश्वराची अभिषेकपूजा तिमनभट शेडगे यांस सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असे मानतात, तर्क आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ नोव्हेंबर १६६४* छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली. पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती. महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या. फेब्रुवारी १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती. पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते. ते असे, "शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठ

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२५ नोव्हेंबर १६५४*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ नोव्हेंबर १६५४* छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते.  उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे.  मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.  उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ नोव्हेंबर १६५९* अफजलखान मोहीम फत्ते करून रात्री छत्रपती शिवाजी महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले. ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे, म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत ये

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ नोव्हेंबर १६५६* छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला २२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मसूरवरील छापा घातला असावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ नोव्हेंबर १६६५* किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ नोव्हेंबर १६८७* गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्याती

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ नोव्हेंबर १६५८* छत्रपती शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ नोव्हेंबर १६७९* मराठ्यांनी खांदेरी बेटाच्या सर्वात उंच टेकडीवर एक पांढरा ध्वज फडकावला. इंग्रज व सिद्दी या दोघांनी ते पहिले सिद्दी थळच्या जवळ नांगरून होता तर इंग्रज नागावच्या खाडीजवळ नांगरून होते. त्यांना वाटले की ही शरणागतीची खून आहे म्हणून दोघांनी दोन छोटे मचवे वेगवेगळ्या वेळी बेटाकडे पाठवले. इंग्रजांना मराठ्यांनी काहीच उत्तर दिले नाही व त्या माच्याकडे दुर्लक्ष केले. इंग्रजांनी मग मराठ्यांना परिचित असणारा सार्जंट कली या डच माणसाला मराठ्यांकडे पाठवले. मराठ्यांनी त्याला सांगितले की ही सांकेतिक खूण आमच्या किनाऱ्यावरील माणसांकरिता आहे तेव्हा आपण जावे. कलीने या वेळी आपण मायनाक भंडारींसाठी मुंबईहून एक पत्र आणले आहे व त्याने ते येऊन घेऊन जावे असा एक निरोप दिला यावर मराठ्यांनी त्याला ते आणून द्यावे असे सांगितले व मायनाकही त्याला उत्तर देईल असे सांगितले. त्यांने कलीला हे देखील सांगितले की तुम्ही बारा महिने इथे ता

१५ नोव्हेंबर १६६४*छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला पहिला जलदुर्ग "सिंधुदुर्ग" या गडाचा पाया घातला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ नोव्हेंबर १६६४* छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला  पहिला जलदुर्ग "सिंधुदुर्ग" या गडाचा पाया घातला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ नोव्हेंबर १६६७* "छत्रपती शिवराय" डिचोली (बिचोलिम), गोवा येथे मुक्कामी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ नोव्हेंबर १६७१* चौल सुभ्यामधले वतनदार, देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत.  "उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही. तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होइल. काही मुलाहिजा होणार नाही" असे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात रोखठोकपणे म्हटले आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ नोव्हेंबर १६७९* १५ नोव्हेंबर १६७९ रोजी संगमनेर येथे झालेल्या लढाई नंतर छत्रपती शिवरायांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी अगदी अल्पकाळ पट्टा या दुर्गावर वास्तव्य केले तेव्हापासून आजतागायत या दुर्गाचे नांवच विश्रामगड म्हणूनच रुढ झालेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ नोव्हेंबर १६७९* गव्हर

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ नोव्हेंबर १६७९* शंभूराजेंना घेऊन दिलेरखानाची नवी खेळी...! अत्यंत घातकी व क्रुरकर्मा दिलेरखानाने विजापुरच्या वेढा घालून विजापूरच्या नाड्या करकचुन आवळल्या. राजकारणात माहीर असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी दिलेरखानाची खोड चांगलीच सोडायचे ठरविले. विजापूरला वेढा घालून बसलेल्या दिलेरखानास शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी  मुघलांच्या दक्षिण सुभ्यात जबरदस्त उठावणी करुन मुघलांनी "दे माय धरणी ठाय" करून सोडले. दक्षिणचा सुभेदार शहजादा मुअज्जम औरंगाबादेस असतांना सुध्दा त्याची कोणतीही पर्वा न करता छत्रपती शिवरायांनी औरंगाबादपासुन (संभाजीनगर) अवघ्या ६४ कि.मी. वरील अत्यंत सम्रृद्ध व संपन्न व्यापारी पेठला अत्यंत त्वरेने हल्ला करून सतत ४ दिवस खणत्या लावुन लुटले. ही बातमी समजल्यावर दिलेरखान विजापुर किल्ला काबीज करने जमत नाही हे पाहून दुय्यम सरदाराला विजापूरचा वेढा कायम ठेवुन संभाजी महाराजांना आघाडीवर ठेवून मराठ्यांचा मिरज-पन्हाळा हा प्रदेश जिंकून घेण्यासाठी कुच केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ नोव्हेंबर १६७९* पठाण बहलोलखान मरण पावल