Posts

Showing posts from April, 2021

रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष यांनी

कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली 

शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली.

शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी बारा शिवालये बांधली. संदर्भ : १. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.            २. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४. देशपांडे, सु. र.

शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली

शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी बारा शिवालये बांधली.

हेमांडपंती शैलीची मंदिरे

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमांडपंती शैलीची मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच 'भूमीज' स्थापत्य शैली असेही म्हणतात. सर्वच पुरातन मंदिरांना 'हेमांडपंती' शैलीची मंदिरे म्हणण्याच्या सवयच लोकांना लागून राहिलेली आहे. जुने मंदिर दिसले की हेमांडपंती मंदिर असल्याचे छातीठोकपणे लोकं सांगतात. देवगिरीच्या यादवांच्या काळातील वास्तुविशारद हेमाद्री पंडित अथवा हेमांडपंत यांनी मंदिर बांधण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली होती. त्या पद्धतीला हेमांडपंती शैली म्हणतात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते.

शिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर

★ शिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर ★ अंबरनाथ या शहराला प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे ते येथील प्रख्यात अंबरनाथ शिवमंदिरामुळे. संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने  जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ हे एक प्राचीन मंदिर. युनेस्कोने १९९९ साली या मंदिराला दर्जा दिला. हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार छित्तराज (इ.स. १०२०-१०३५) याने बांधण्यास प्रारंभ केला व त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी बांधकाम पूर्ण झाले. मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली.  शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली. अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर केवळ पाहण्यासारखे आहे. मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर म्हणतात. याच नावावरून गावाचे नावे अंबरनाथ  पडले असावे.       भूमिज पद्धतीचे बांधकाम : महाराष्ट्रात देवांचे देव शंकराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे गड किल्ल्यांवर उभारली गेली आहेत. तर काही जमिनीवरही बांधली गेली. औरंगाबादजवळील घृष्णेश्वर मंदिर, भीमाशंकर येथील मंदिर, पुण्याजवळील भुलेश्वर

कराड विषयी शिलाहार

इतिहासातील कऱ्हाड..                                                   ...यादवांच्या पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट इत्यादी सम्राटांचे मांडलिकत्व अखेर पर्यंत पत्करून, आपल्या मर्यादित राज्यात तीन चारशे वर्षे चिवटपणे तग धरून राहिलेल्या शिलाहार घराण्याचे, महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतरात यादवांच्या खालोखाल महत्त्व आहे. अनेक शाखा असलेल्या या राजवंशाच्या प्रमुख शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे तिसरे घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. याइतिहासातील कऱ्हाड..                                                   ...यादवांच्या पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट इत्यादी सम्राटांचे मांडलिकत्व अखेर पर्यंत पत्करून, आपल्या मर्यादित राज्यात तीन चारशे वर्षे चिवटपणे तग धरून राहिलेल्या शिलाहार घराण्याचे, महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतरात यादवांच्या खालोखाल महत्त्व आहे. अनेक शाखा असलेल्या या राजवंशाच्या प्रमुख शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे तिसरे घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. या राजघराण्याचा आद्यपुरुष जिमूतवाहन, राजचिन्ह गरुड, आणि मूळ गाव तेर,जिल्हा उस्मानाबाद असल्याने ते स्वतः ला 'तगरपुरवराधीश्वर' असे म्ह

शिलाहार घराणे तिसरे

शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव ह्या जिल्ह्यांचा काही भाग ह्या प्रदेशांवर राज्य करीत होते. त्यांची राजधानी वळिवाड येथे होती. हे कोल्हापूच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी. वर असलेले वळवडे असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे आता राधानगरीत रूपांतर झाले आहे. काही जुन्या लेखांत कोल्हापूर आणि प्रणालक (पन्हाळा किल्ला) यांचाही राजधानी म्हणून उल्लेख येतो, तर काहींच्या मते कोल्हापूरच्या पूर्वेकडील वळिवडे हे विद्यमान खेडे त्यांच्या राजशिबिराचे स्थान असण्याची शक्यता आहे. ही तिन्ही घराणी आपणास विद्याधर जीमूतवाहनाचे वंशज म्हणवीत. या जीमूतवाहनाने एका नागाला वाचविण्याकरिता स्वतःचा देह एका शिलेवर बसून गरुडाला अर्पण केला होता म्हणून या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे नाव पडले, ही आख्यायिका शिलाहारांच्या लेखात सापडते.👆

धार्मिक क्षेत्रात राष्ट्रकूट राजे सहिष्णू आणि उदार होते. बौद्ध, जैन, मुस्लिम, शैव, वैष्णव या सर्वांना त्यांनी समभावाने वागविले व सहकार्य दिले.

Image
अमात्याने काही द्रम्मांच्या देणग्या दिल्या होत्या. गुजरातेतील  गंगा, दशावतार गुहा, वेरूळ. सामंत राष्ट्रकूट शाखेच्या दंतिवर्म्याने कांपिल्य तीर्थातील विहाराला ग्राम दान केले होते. पहिला अमोघवर्ष व त्याचा पुत्र दुसरा कृष्ण यांनी जैन देवालयांना देणग्या दिल्या होत्या. जैनमुनी जिनसेन आणि गुणभद्र हे अनुक्रमे त्यांचे गुरू होते. हिंदू धर्म तर अत्यंत ऊर्जितावस्थेस पोचला होता. पहिल्या कृष्णाच्या काळात वेरूळ येथे जगातले एक आश्चर्य म्हणून गणलेले कैलास लेणे कोरले होते. राष्ट्रकूटांच्या ताम्रपटाच्या आरंभी विष्णू व शिव या दोन्ही देवांना नमन केले आहे. राष्ट्रकूटांच्या काळी श्रौत यज्ञ प्रचारातून गेले होते पण त्या राजांनी अनेक महादाने करून ब्राह्मणांना पंचमहायज्ञांच्या अनुष्ठानाकरिता शेकडो गावे आणि हजारो सुवर्ण आणि द्रम्म नाणी दिली होती. चौथ्या गोविंदाला त्याच्या अनन्यसाधारण दातृत्वामुळे सुवर्णवर्ष नामक बिरुद मिळाले होते. धार्मिक क्षेत्रात राष्ट्रकूट राजे सहिष्णू आणि उदार होते. बौद्ध, जैन, मुस्लिम, शैव, वैष्णव या सर्वांना त्यांनी समभावाने वागविले व सहकार्य दिले. मुसलमानी धर्माच्याही बाबतीत त्यांनी उदार

राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण (सु. कार. ९३९–६७) हा

तिसरा कृष्ण (सु. कार. ९३९–६७) हा महाप्रतापी होता. त्याने आपला मेहुणा बूतुग याला गंगवाडीच्या गादीवर बसविले, उत्तरेत स्वाऱ्या करून कालंजर व चित्रकूट येते राष्ट्रकूटांची ठाणी बसविली आणि नंतर दक्षिणेत परत येऊन कांची आणि तंजावर ही स्थळे काबीज केली. पुढे सहा वर्षांनंतर तक्‌कोलम् येथे झालेल्या घनघोर लढाईत चोल युवराज राजादित्य याला गंग सामंत बूतुगाने ठार केले. नंतर कृष्णाने रामेश्वरपर्यंत चाल करून तेथे आपला जयस्तंभ उभारला. पुढे चोलांनी आपला काही प्रदेश जिंकून परत घेतला पण त्यांचा तोंडइमंडल (अर्काट, चिंगलपुट आणि वेल्लोर जिल्ह्यांचा) प्रदेश राष्ट्रकूटांच्या हाती राहिला.                 कृष्णाने पुन्हा ९६३ मध्ये उत्तरेत स्वारी केली. त्याने माळवा काबीज करून बुंदेलखंडवर आक्रमण केले. या स्वारीत कोरलेला त्याचा शिलालेख मेहर रेल्वे स्टेशनजवळ जूरा येथे सापडला आहे. त्यात चोलवंशाचे उन्मूलन केल्याचा उल्लेख आहे.                  कृष्णानंतर त्याचा धाकटा भाऊ खोट्टिग (सु. कार. ९६७–७२) गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत माळव्याच्या परमार सीयकाने मान्यखेटवर इ. स. ९७२ मध्ये स्वारी करून ते नगर लुटले. शतकातील  राष्ट्र

राष्ट्रकूट नरेश अमोघवर्ष राजाचा शिलालेख

Image
राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष याचा शिलालेख जो ८७६ ई में पुरातन कन्नड भाषा मध्ये कोरला आहे.कुम्सी येथील वीरभद्र मन्दिर येथे.

दन्तिदुर्ग राष्ट्रकूट साम्राज्य संस्थापक

Image
दन्तिदुर्ग  (राष्ट्रकूट साम्राज्य) (736-756) चालुक्य साम्राज्याचा पराभव करून दंतिदुर्ग यांनी राष्ट्रकूट राजवटीची स्थापना केली.दंतिदुर्ग यांनी उज्जयिनी ला हिरण्यगर्भ दान केला होता. महाराजाधिराज,परमेश्वर परमंभट्टारक इत्यादि उपाधियाँ अर्थात पदवी धारण केल्या होत्या. दंतिदुर्ग याचा उतराधिकारी कृष्ण प्रथम होते. यांनी येलोरा चे सुप्रसिद्ध कैलास मंदिर निर्माण केल होत. लेखक &माहिती संकलक ©नितीन घाडगे  संदर्भ history of Rajasthan rim hooja - pg 272-273

राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते. अनेक शिवमंदिरे निर्माण केली असं उल्लेख मिळतात.

राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते. कृष्णराजाचे कृष्णेश्वर हे कैलासलेणे हे एक शिवमंदिरच आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी अठरा शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या कोरीव लेखांतून येतो. वेरूळाप्रमाणेच घारापुरी येथे राष्ट्रकूट राजांनी कित्येक शिवकथा प्रसंग साकार केलेले आहेत याशिवाय इतरही अनेक शिवमंदिरे राष्ट्रकूट राजांनी बांधलेली होती.               त्यांच्या मंदिरांपैकी पहिल्या अमोघवर्षाने  वसविलेल्या मान्यखेट राजधानीजवळ कागना व वेण्णीतोरा या नद्यांच्या संगमाजवळ राष्ट्रकूट काळातील एका दगडी दुर्गाचे अवशेष आढळले. आता गावही ओसाड झाला आहे. त्यात एक महादेवाचे व दुसरे जैन मंदिर आहे. जैन मंदिरात पार्श्वनाथ, महावीर आदी तीर्थंकरांच्या त्यांच्या लांछनांसह प्रमाणबद्ध मूर्ती आहेत. तिसरा कृष्ण (कार. ९३९-६७) या राजाने रामेश्वरम्‌पर्यंत प्रदेश पादाक्रांत करून तिथे आपला विजयस्तंभ उभारला.       रामेश्वरम्‌जवळ त्याने कृष्णेश्वर आणि गंडमार्तंडा ही दोन आणि कांची येथे कालप्रियाचे मंदिर बांधण्यासाठी गावे दान दिली. मार्कंडादेव येथील मार्कंडी अथवा मार्कंडेश्वर हे मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगेच्या ती

राष्ट्रकूट याचा कालखंड.

राष्ट्रकूट राजे  दंतिदुर्ग (७३५-७५६) कृष्ण राष्ट्रकूट पहिला (७५६-७७४) गोविंद राष्ट्रकूट दुसरा (७७४-७८०) ध्रुव धरावर्ष (७८०-७९३) गोविंद राष्ट्रकूट तिसरा (७९३-८१४) अमोघवर्ष (८१४-८७८) कृष्ण राष्ट्रकूट तिसरा (८७८-९१४) इंद्र राष्ट्रकूट तिसरा (९१४-९२९) अमोघवर्ष दुसरा (९२९-९३०) गोविंद राष्ट्रकूट चौथा (९३०-९३६) अमोघवर्ष तिसरा (९३६-९३९) कृष्ण राष्ट्रकूट तिसरा (९३९-९६७) खोट्टिग अमोघवर्ष (९६७-९७२) कर्क राष्ट्रकूट दुसरा (९७२-९७३) इंद्र राष्ट्रकूट चौथा (९७३-९८२) तैलप दुसरा ( पश्चिम चालुक्य ) (९७३-९९७)

अजिंठा वेरूळ

 अजिंठा वेरूळ  येथील लेणी राष्ट्रकूटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्रकूटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली. राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्ग हा पहिला पराक्रमी शासक होता राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग यानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली त्याने सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले. संदर्भ : 1. Altekar, A. S.  Rashtrakutas and Their Times , Poona, 1967. 2. Ganguli, O. C. Goswami, A.  The Art

वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर निर्माण राष्ट्रकुट कृष्ण राजा

 वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर राष्ट्रकूट राजे यांनी निर्माण केल. राष्ट्रकूट  हे इ. स 753 - 982 या कालखंडादरम्यान भारताच्या दक्षिण व मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे       या काललखंडात राष्ट्रकूटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्रकूटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती.         दंतीदुर्ग घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्ण राजा पहिला  याने वेरुळचे  सुप्रसिद्ध कैलास मंदिर निर्माण केले.

तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती;

तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती; पण तिचेही ठिकाण निश्चित नाही. ⇨पहिल्या अमोघवर्षा ने नवव्या शतकात ती मान्यखेट (मालखेड) येथे नेली. तेथे ही घराणे शेवटपर्यंत राज्य करीत होते. या घराण्याचा पहिला विख्यात राजा दंतिदुर्ग (कार. ७१३– ५८) हा होय. हा प्रथम बादामीच्या चालुक्यांचा मांडलिक होता; पण पुढे त्याने त्यांचे जूं झुगारून दिले. याने सु. ४५ वर्षे राज्य केले. याने लाट (दक्षिण गुजरात), महाराष्ट्र, विदर्भ हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. नंतर त्याने मालव, कोसल (छत्तीसगड), कलिंग (ओरिसा), श्रीशैलम् वगैरे दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या; पण त्यांपासून त्याच्या राज्याचा विस्तार झालेला दिसत नाही. त्याने चालुक्य कीर्तिवर्म्याचा ७५३ च्या सुमारास पराभव केला. दंतिदुर्गानंतर त्याचा चुलता पहिला कृष्ण (सु. कार. ७५६–७३) याने चालुक्य सम्राट दुसरा कीर्तिवर्मा याचा पुन्हा पराभव करून चालुक्य राजवटीचा अंत केला. नंतर त्याने गंगवाडीच्या गंगांचा आणि वेंगीच्या पूर्वचालुक्यांचा पराभव केला.

दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतका उदयास पावले

दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतकात कलचुरींचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्याचे काही ताम्रपट रामटेकजवळ नंदिवर्धन, अकोला व मुलताई येथे सापडले आहेत. कलचुरींच्या उच्छेदानंतर त्यांनी बादामीच्या चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले आणि पुढे ते राष्ट्रकूटांचे मांडलिक झाले. त्यांची राजधानी प्रथम नंदिवर्धन, नंतर भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर (पद्मनगर) आणि शेवटी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होती. हे घराणे दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले.

सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते.

सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते. त्याचा मूळ पुरुष मानांक (सु. कार. ३५०–७५) हा होय. याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली. हे मानपूर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्याचे माण असावे. ह्या राष्ट्रकूट नृपतींना कुंतलेश्वर म्हणत. विदर्भाचे वाकाटक आणि कुंतलचे राष्ट्रकूट यांची राज्ये एकमेकांना लागून असल्याने त्यांच्यामध्ये वारंवार कटकटीचे प्रसंग उद्‌भवत. मानांकाने विदर्भाला त्रस्त केले होते, असे राष्ट्रकूटांच्या पांडरंगपल्ली ताम्रपटात म्हटले आहे; तर वत्सगुल्म (वाशीम) च्या विंध्यसेन वाकाटकाने कुंतलेशाचा पराजय केल्याचा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे. मानांकाचा पुत्र देवराज याच्या काळी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने आपला राजकवी कालिदास याला या कुंतलेश राष्ट्रकूटांच्या दरबारी वकील म्हणून पाठविले होते. या प्रसंगाने कालिदासानेकुंतलेश्वरदौत्य रचले होते. ते आता उपलब्ध नाही; पण त्यातील काही उतारे राजशेखर व भोज यांच्या अलंकार ग्रंथांत आले आहेत. मानपूर येथे हे घराणे बादामीच्या दुसऱ्या पुलकेशीच्या (कार. ६१

या अवशेषांतून नव्याने उलगडलेल्या राष्ट्रकुटांच्या इतिहासाची ही ओळख…नांदेड‌ जिल्ह्यातील कंधार येथील राष्ट्रकूट राजधानी

Image
गेल्या एक-दोन वर्षांत नांदेड‌ जिल्ह्यातील कंधार परिसरातल्या विविध उत्खननांत अनेक शिल्पावशेष सापडले आहेत. या अवशेषांतून नव्याने उलगडलेल्या राष्ट्रकुटांच्या इतिहासाची ही ओळख… 👉 महराष्ट्रात उत्तरेकडील बलाढ्य  राष्ट्रकूट यांचे नांदेड जिल्ह्यातील कंधार राजधानी   खरंतर, राष्ट्रकूट काळात  जाणीवपूर्वक नागरीकरणाची प्रक्रिया रूढ होती, त्यातून विविध वसाहतींची आणि नगरांची निर्मिती होत होती. सातवाहन काळात प्रतिष्ठान, तुंगर, सोपारासारख्या स्थानांचा विकास होत होता, वाकाटक काळात नगरधन, रामटेक, मांढळ यासारखी स्थानं विदर्भात विकसित झाली. राष्ट्रकूट काळात वेरूळ परिसरातील स्थानं, विशेषतः माण्याखेटक नंतर उत्तरेकडील सत्ताकेंद्र म्हणून कंधार या स्थानाचा विकास राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्यापासूनच होऊ लागला. 👉राष्ट्रकुटांचे साम्राज्य आणि त्यांचा संघर्ष हा बंगालपासून - तामिळनाडू, गुजरात, आंध्र-कर्नाटकातील सत्तांच्या बरोबर झाला आहे. 👉जगतुंग समुद्र' या जलाशयाची निर्मिती  स्थानाचा विकास राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्यापासूनच होऊ लागला. राष्ट्रकूट राजा कृष्ण दुसरा याचा मुलगा जगतुंग हा अ

मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते राजवंशाचा कुलाचार

👉  मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते       राजवंशाचा कुलाचार ----------------- --------------नितीन घाडगे  @............     चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते          राजवंशाचा कुलाचार   कुळातील तसेच पडनावाने राहणाऱ्या इतर सर्व वंशजांसाठी त्यांचा कुलाचार अथवा वंशजांसाठीची मंगल कार्यात उपयुक्त असलेली आवश्यक माहिती खाली दिली आहे..... 👉 टीप : कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला चव्हाण, मोहिते राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी... 👉 कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते          राजवंशाचा कुलाचार 👉 👉 मराठ्यांच्या ९६ कुळी घराण्याच्या यादीतील मोहिते घराणे . 👉मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण 👉वंश -सूर्य वंश                                                  👉वेद =  ऋग्वेद 👉गादी = सांबरींगड रणथंब 👉निशाण = श्वेत 👉देवक - अष्टव, कळंब. 👉सिंहासन- पांढरे 👉 निशाण- पांढरे 👉मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण (चौहान) राजांचे वंशज. 👉 विशेष सूचना :.तर काही भागात पाचपालवी सुद्धा देवक म्हणून सांगितली जाते पुरोहित याच्या कडून. कारण देवक माहित नसेल तर बऱ्याच लोकांना कॉमन अ

राम नवमी

Image
#राम_नवमी          प्रभू रामचंद्र यांचे 6000 वर्षापूर्वीचे सिलेमानिया इराक येथील शिल्प.  राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे ऐश्वर्य ,राम म्हणजे नितिमत्ता , राम म्हणजे सत्य, राम म्हणजे पावित्र्य, राम म्हणजे धर्म, राम म्हणजे धैर्य, राम म्हणजे संयम, राम म्हणजे शिस्त, राम म्हणजे वचन ,राम म्हणजे पराक्रम, राम म्हणजे शौर्य, राम म्हणजे किर्ती, राम म्हणजे यश,राम म्हणजे सुख ,राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे ऋजुता ,राम म्हणजे नम्रता, राम म्हणजे योद्धा ,राम म्हणजे भगवंत ,राम म्हणजे आराध्य, राम म्हणजे ज्ञान, राम म्हणजे करुणा ,राम म्हणजे गांभीर्य, राम म्हणजे कारुण्य ,राम म्हणजे आचरण ,राम म्हणजे परमसत्य ,राम म्हणजे परमात्मा, राम म्हणजे प्रतापसूर्य, राम म्हणजे विजयश्री, राम म्हणजे सितापती ,राम म्हणजे रघुकुलभुषण ,राम म्हणजे अयोध्यापती ....              अशा परमपुरुषोत्तम भगवान प्रभु श्रीरामचंद्रांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌺 #श्रीरामजयरामजयजयराम❤️🙏🌸

ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे.

Image
ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे. --------------------------------------------------              पाटणकर उर्फ साळुंखे घराणे हे स्वराज्यस्थापनेच्या पूर्वीपासूनच एक पराक्रमी घराणं म्हणून नावारुपास होते.साळुंखे हे त्यांचे पूर्वीचे आडनाव. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील या घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर पाटण परगण्याची जहागिरी मिळवली.पुढे याच पाटण वरून त्यांना पाटणकर नाव पडले.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याच्या सेवेसाठी पिढ्यानपिढ्या मोलाचे योगदान दिले.                     सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार सरदार नागोजीराव साळुंखे उर्फ पाटणकर,सरदार  ज्योत्याजीराव साळुंखे,सरदार बहिरजीराव साळुंखे या मुळपुरुषांपासुन झालेला आपल्याला पहायला मिळतो. पुढे यांच्याच वंशातील सरदार हिरोजीराव पाटणकर, सरदार चांदजीराव पाटणकर,सरदार हणमंतराव पाटणकर,सरदार रामराव पाटणकर यांनी स्वराज्याची सेवा केली.वंशविस्तारामुळे सरदार पाटणकरांच्या शिक्केकरी वाडा पाटण, बीबी, केर,वाजेगाव, रामपूर,दिवशी बुद्रुक व खुर्द शाखा, सावंतवाडी, सातभाई(भा

मनमोहन राजवाडा फलटण "

Image
🚩मनमोहन राजवाडा फलटण " 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, थोरल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे माहेर, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ, बडोदा नरेश प्रतापसिंह महाराजांचे आजोळ अशा अनेक आठवणींची साक्ष देत फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडा आजही दिमाखात उभा आहे. या राजवाड्याचे जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फुट इतके बांधकाम असून, मुधोजीराव जानोजीराव नाईक-निंबाळकर यांनी हा राजवाडा बांधला आहे.. राजवाड्यात रामाचा चौक, दसर्‍याचा चौक, देवीचा चौक, तुळशीचा चौक, मुदपाक चौक, खासगीचा हॉल, पागा चौक व नजरबाग असे चौक आहेत, तसेच गुलाबी हॉल, हिरवा हॉल, बदामी हॉल, दरबार हॉल, सुरुच हॉल, हमखासे हॉल, इंग्रजी हॉल अशा बैठकिच्या खोल्या असून, एनंदर 24 शयनगृहे आहेत. सात खणी, चार खणी, गोल खणी, लक्ष्मी टेरेस, टॉवर हुजुर ऑफीस, खासगी, फड, तालीम , देवघर, माजघर, खजिना असेही भाग आहेत. मुधोजी महाराजांनी बसवलेले ब्रिटीश बनावटीचे उच्च प्रतीचे नक्षीदार फर्निचर मन मोहून टाकते, तसेच भिंतीवरील मोठे बिलोरी आरसे झेकोस्लोव्हाकीचन बनावटीची हवेच्या झुळूक आल्याबरोबर किणकिणारी क्रिस्टलची झुंबरे, वेगवेगळ्या आकाराच्या व रंगाच्या हं